महाराष्ट्राला संताची भूमी आसे म्हणतात.या भूमी वर अनेक थोर संत महात्मे होऊन गेले त्याचे ठसे आजही या भूमीवर आढळतात.संत ज्ञानोबा ,संत तुकाराम ,संत एकनाथ,संत नामदेव असे आजून कूप काही महान संत आहेत ज्यांनी आपले महान विचार जगाला दिले आहेत ज्यांनी दया,करूणा,वात्सल्य,भक्ती याची शिकवण तर दिलीच त्याच माध्यमातून समाजकल्याण व समाज प्रबोधन हि केले या मधीलच संतश्रेष्ठ जगतगुरू संत त्तुकाराम महाराज यांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत.
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
असा जयघोष प्रत्येक वारकरी कीर्तनात होतो त्यामध्ये तुकाराम महाराजांचा उलेख आवर्जून करतात वारकरी संप्रदाया मध्ये तुकाराम महाराजांना महत्वाचे स्थान आहे. त्यांचे अभंग हे प्रबोधनात्मक आहेत.मराठी भाषेतील एक महान कवी आणि भक्ती चळवळ साहित्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी मराठी साहित्य मध्ये अजरामर व मोल्यवान आशा साहित्याची भर टाकली आहे.
जन्म आणि कुटुंब :
संत तूकारामांचा जन्म २२ जानेवारी १६०८ मध्ये सध्याच्या महाराष्ट्रातील पुण्याजवळील खेड तालुक्यातील देहू या छोट्याश्या गावात झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आंबिले होते.ते विठ्ठलभक्त होते व त्आयांचा सावकारीचा व्यवसाय होता त्यांच्या आईचे नाव कनकाई आंबिले असे होते.त्यांच्या जातीबद्दल संभ्रम आहे कुठे ते वाणी समाजाचेत् तर कुठे कुणबी समाजाचा उलेख आहे तर काही साहित्यामध्ये ते शुद्र समाजाचे असल्याचेही सांगण्यात येते.पण तुकाराम महाराजांच्या साहित्य मधून सर्वधर्म समभाव दिसून येतो.त्यांनी स्वताला कोणत्याही समाजात बांधून घेतले नाही
त्यांच्या घराण्यातले आठवे पूर्वज विश्वम्बर बुवा हे होते.ते विठ्ठलाचे भक्त होते व आषाढी महिन्यात पंढरीची वारी करत होते त्यांच्यापसून तुकारामच्या कुळात वारीची परंपरा अखंड चालत राहिली.तुकाराम महाराजांना एक मोठा भाऊ होता त्याचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्होबा होते.तुकाराम महाराज १७-१८ वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले.तेव्हा त्या भावनेच्या आवेगात व विरक्तीची वृत्ती असलेला त्यांचा मोठा भाऊ सावजी हा तीर्थ क्षेत्राला निघून गेला.त्यामुळे घराची जबाबदारी हि तुकारामावर आली त्यांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला .त्यांचा सावकारी व्याव्साय होता एकदा दुष्काळ पडला असता त्यांच्या कडे असलेल्या सर्वाना त्यांनी सावकारी पाशातून मुक्त केले व सर्व गाहाण कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवल
संत तुकाराम यांचे पहिले लग्न त्यांच्या वडिलांनी तुकोबाचे मामाचे गाव असलेल्या लोहगावातील रुख्मिणीशी लावून दिले.रुख्मिणीचे दम्याच्या आजारपणामुळे अकाली निधन झाले.तसेच त्यांचा संतू नावाचा मुलगा हा हि दुष्काळात मरण पावला या मुळे तुकाराम महाराजांवर दुखाचा डोंगर कोसळला.त्यानंतर तुकाराम महाराजांचे दुसरे लग्न खेडच्या आपाजी गुळवे यांची मुलगी जिजाई सोबत झाले त्यांना आवली या नावाने पण ओळखतात.त्यांच्या पासून तुकारामांना तीन मुले महादेव,विठोबा,नारायण व काशी,भागीरथी,व गंगा आशा तीन मुली झाल्या.संत तुकारामांचा संसार निट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली.
भक्तिमार्गाला सुरुवात :
तुकाराम महाराजांचे 2 मुले दुष्काळात आजारपणामुळे गेली तसेच त्यांच्या पहिल्या बायकोचे अकाली निधन झाले या घटनामुळे त्यांच्या मनाला खूप दुख झाले निष्पाप मुलांचा आत्मा आणि कोमल मनाच्या पत्नीचा मृत्यू यामूळ त्यांना वाटू लागले कि जगात परमेश्वर असेल तर एवढे दुख का वाट्याला यावे ?हा विचार करून ते जवळ असलेल्या भामचंद्र गडावर ध्यानसाधना करायाल बसले .13 दिवस ध्यानधारणा करून त्यांनी स्वताला परमेश्वरच्या चिंतनात हरवून टाकले.त्यांनी स्वताचा संसार सुखी करण्यापेखा जगाच्या सुखाचा विचार केला व अभंग रचायला सुरवात केली.त्यांचे स्वताचे एक्वित्थळ मंदिर होते तेथे ते त्यांनी रचलेले अभंग म्हणत असत व तेथे येणारी वारकर्यांना ते समजून सांगत,वारकर्यांना ते सोप्या व स्पष्ट भाषेत समजून संगाल्याने तेथे ऐकायला लोकांची गर्दी जमू लागली
वेदांचा अर्थ तुकाराम महाराज जनसामान्य लोकांना सांगतायत हे काही कर्मठ लोकांना अजिबात आवडले नाही म्हणून रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ सर्भावसामान नागरिकांना सांगितल्यावरून त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.
तूकाराम महाराज हे संसारी पुरुष असून सुद्धा त्यांनी मुलाबाळाना सोडून आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. सावकारी पेश असून कर्जदाराचे कर्ज माफ करणारे ते जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची भावना होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.
संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संतकवी होते. 17 व्या शतकात जन्मलेले तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे प्रमुख स्तंभ होते. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आजही प्रसिद्ध आहेत आणि भक्ती, सामाजिक विचार आणि मराठी भाषेसाठी मौल्यवान मानले जातात.
तुकाराम महाराजांचे प्रमुख ग्रंथ:
- अभंग: हे तुकाराम महाराजांचे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय साहित्य आहे. २,५०० हून अधिक अभंगांमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यावरील प्रेम, सामाजिक भाष्य, दैनंदिन जीवन आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे.
- गाथा: यात विविध विषयांवरील ओव्यांचा समावेश आहे, जसे की भक्ती, नीतिमत्ता, आणि आध्यात्मिक शिकवण.
- स्तोत्रे: यात विविध देवतांची स्तुती करणारी गीते समाविष्ट आहेत.
- आरती: यात विविध देवदेवतांच्या आरत्यांचा समावेश आहे.
- अवतार: यात रामायण आणि महाभारतातील विविध अवतारांवर आधारित कथांचा समावेश आहे.
- कथा: यात संत आणि महापुरुषांच्या चरित्रावर आधारित कथांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त, तुकाराम महाराजांनी अनेक पत्रे आणि पत्रिका लिहिल्या.तुकाराम महाराजांनी सोपी आणि प्रभावी भाषा वापरली ज्यामुळे त्यांचे साहित्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकले. तुकाराम महाराजांनी आपल्या कल्पना व्यक्त करण्यासाठी अनेक रूपक आणि उपमांचा वापर केला. तुकाराम महाराजांच्या साहित्यामध्ये संगीतात्मकता आहे ज्यामुळे ते सहज लक्षात राहतात आणि गायले जातात. तुकाराम महाराजांचे साहित्य भक्तीने भरलेले आहे, विशेषतः विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यावरील प्रेम. तुकाराम महाराजांनी समाजातील वाईट गोष्टींवर टीका करून सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले.तुकाराम महाराजांचे साहित्य मराठी साहित्यावर प्रचंड प्रभाव पाडले आहे. त्यांच्या अभंगांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे आणि आजही ते जगभरातील वाचकांना प्रेरणा देतात.
संत तुकाराम महाराजांचे साहित्य हे मराठी साहित्यातील एक अमूल्य संपदा आहे. त्यांच्या लेखनातून भक्ती, सामाजिक जाणीव आणि मराठी भाषेतील प्रभुत्व यांचा अद्भुत मिलाफ दिसून येतो. आजही तुकाराम महाराजांचे साहित्य प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
संत तुकारामांचे काही अभंग :
संत तुकाराम महाराजांचे सगळेच अभंग विचार करण्यासारखे आहे .उपदेश पर आहेत. तरी त्यातील एक अभंग निवडणे म्हणजे कठीण काम आहे
माझे मज कळो येती अवगुण | काय करू मन अनावर ||
आता आड उभा राहे नारायण | दयासिंधू पणा साच करी ||
वाचा वदे परी करणे कठीण | इंद्रिया अधीन झालो देवा||
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास| न धरी उदास मायबापा ||
अर्थ: अभंगात तुकाराम महाराजांसारखा संत शरीरातील इंद्रियांमुळे त्रास ला गेला आहे ती इंद्रिये त्याला छळतात .महाराजांना सगळं समजतं अवगुण काय आहे त. ही जी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये चांगलं म्हणून करायला तयार नाहीत. एखादं लहान मूल घाणीत खेळायला बघतो तशी, ही इंद्रिये वाईट वागतात मला हे सगळं कळतं पण वळत नाही. इंद्रियांचा राजा मन हा माझं ऐकत नाही वाईट गोष्टी करायला तो अनावर होतो. देवा आता मी काय करू या सगळ्या वाईट गोष्टीच्या आड मला लपव. वाईट गोष्टी आणि मी याच्यामध्ये तू उभा राहशील एखाद्या भिंतीसारखा तरच माझी सुटका होईल असे तुकाराम महाराज काकुळतीला येऊन देवाला सांगतात.देवा तु खरोखर दयाळू आहेस दयेचा सागर आहेस तूच आम्हाला, आम्हा मानवांना या सगळ्या वाईट गोष्टी पासून वाचवू शकतोस.देवा मी मी अभंग लिहितो सगळं काही चांगलं बोलतो चांगले विचार आहेत परंतु बोलणं आणि कृती यामध्ये फरक आहे. कृती करताना मी तोकडा पडतो. कारण पण मी ह्या इंद्रियांच्या अधीन आहे इंनद्रिया पासून आम्हा मानवाची सुटका होणे शक्य नाही.शेवटच्या ओळीत महाराज म्हणतात तेव्हा तूच माय बाप आहेस जे काही करणार चांगलं-वाईट ते तूच करू शकतोस कारण मी मी तुझा दास आहे.
हेचि थोर भक्ति आवडते देवा। संकल्पावी माया संसाराची ।।
‘ठेविले अनंते तैसेची राहावे । चित्ती असो द्यावे समाधान’ ।।
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार । वाहू हा संसार देवापायी ।।
अर्थ: तुकोबाराय म्हणतात की, या संसाराची माया किंवा या जगावरचे प्रेम मनुष्याने देवाला अर्पण करावे किंबहुना आपले प्रेम ह्या संसारावर न जडता ते देवावर कसे जडेल हे पाहावे. त्याच्या चरणी कसे रुजू होईल हे पाहावे. ते करण्याचा येथे प्रत्येकाने संकल्पच करावा. आणि एवढेच नव्हे तर या संसारात अनंताने, म्हणजेच श्रीहरीने जसे आपल्याला ठेवले आहे तसेच राहावे. त्याविषयी खेद न बाळगता चित्तात त्याविषयी समाधान असू द्यावे.तुकाराम महाराज म्हणतात , हे असे वर्तन ठेवणे किंवा आचरण करणे हीदेखील देवाची केलेली भक्ती असून हीच थोर भक्ती देवाला अतिशय प्रियदेखील असते. संसारात लाभलेल्या दुःखाचे, संकटाचे जर का वाईट वाटून घेतले किंवा त्याविषयी उद्वेग व्यक्त केला तर तशाने काहीही लाभ होत नाही. उलट त्याद्वारे पदरात केवळ दुःखच पडते, मन अधिकच कष्टी होते. कारण संचिताचे फळ भोगण्यावाचून येथे दुसरा पर्यायच नसतो.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की त्यापेक्षा सर्वांनी आपला सर्व भार त्याच्यावर टाकून किंबहुना सर्व संसारच देवापायी वाहून ह्या संसारात अतिशय निश्चिंत मनाने राहावे.
जें का रंजलें गांजलें ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तोचि साधु ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत ।
तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं ।
त्यासि धरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती ।
तोचि भगवंताची मूर्ती ॥५॥
ह्या अभंगात महाराज साधुपुरुषाची लक्षणे सांगत आहे. रंजल्या गांजल्या लोकांना आपलं मानणारा,लोण्यासारखे मृदू मन असणारा, ज्याचा कुणी वाली नाही त्याचा सांभाळ करणारा, नोकर चाकर यांना पुत्रवत सांभाळणारा, तो साधूपुरुष आहे असे समजावे.
तुकाराम महाराजांचा मृत्यू :
इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना ‘आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला’ असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.
सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।।
अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.’या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. ‘तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. अशी कथा संतसाहित्य मध्ये आहे.असे म्हणतात कि तुकोबांनी इंद्रायणी नदीमध्ये जलसमाधी घेतली तर कुणी म्हणत तुकोबांचा खून केला पण या बद्दल कुठेही स्पष्ट पुरावा दिलेला नाही.त्यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस हा “तुकाराम बीज” म्हणून साजरा करतात.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून जाणून घ्या संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल सविस्तर माहितीव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- जाणून घ्या का केली ७३ वी घटनादुरुस्ती आणि पंचायत राज व्यवस्थे बद्दल संपूर्ण माहिती
- Shivaji Maharaj History शिवाजी महाराज इतिहास
- अंशकालीन प्रमाणपत्र नमुना तुम्ही तुमचे प्रमाणपत्र बनवले आहे का ?
- bharat ratna award भारत रत्न इतिहास,मिळणारे लाभ व सुविधा आणि प्राप्तकर्त्यांची यादी …..
- पदवीधर अंशकालीन उमेदवार याच्या कामस्वरूपी नेमणुकीवर शासनात करणार विचार…