फक्त 1 रुपयात करा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजनासाठी

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

नमस्कार मित्रानो नेहमी प्रमाणे आज आपणा एका नवीन विषयीची माहिती आपल्या समोर MahitiA1 च्या माध्यमातून घेऊन येत आहोत.भारतात सामाजिक सुरक्षेसाठी अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारने आणल्या आहेत. पण मागील 10 वर्षापासून केद्र सरकार मार्फत विमा योजनेवर जास्त भर देण्यात येत आहे. आज आपण त्यापैकीच एका विमा योजेनेची माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना फक्त एक रुपया प्रीमियम भरून आपण आपल्या पिकाचा विमा उतरवू शकता आणि नैसर्गिकरित्या कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई झाल्यास तुम्हाला त्याचा मोबदला शासनाकडून देण्यात येईल तर आपण या लेखात याच योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

2022-23 या आर्थिक वर्षाच्या हंगामात, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत 67 कोटी शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यापैकी, 2.20 कोटी शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई आहे. ज्याच्या पिकांना अनेक कारणांमुळे नुकसान झाले होते. त्यांना एकून ₹1.15 लाख कोटी रक्कम नुकसान भरपाई शासनामार्फत वाटप करण्यात आली.

प्रधानमंत्री पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PM-FBY)

प्रधानमंत्री पिक  विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी पीक विमा योजना  असून हि योजना येण्येया मागे अनेक घटना घडल्थेया असून  त्याचा  तपशीलवार इतिहास पुढील प्रमाणे –

पार्श्वभूमी आणि गरज
  • भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य समुदाय उदरनिर्वाहसाठी शेतीवर अवलंबून आहेत.  तथापि, अप्रत्याशित हवामान, नैसर्गिक आपत्ती,  कीटक आणि रोगांमुळे शेतकरी अनेकदा आव्हानांना शेतकरी सामोरे जातात, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक हानीस सामोरे जावे लागते. या समस्यांचे उपाययोजना म्हणून 1985 मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना (CCIS), 1999 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना (NAIS) आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना (MNAIS) यासारख्या अनेक वर्षांमध्ये विविध पीक विमा योजना सुरू करण्यात आल्या. 2010. या प्रयत्नांना न जुमानता, उच्च प्रीमियम, विलंबित दावे आणि अपुरे कव्हरेज यासारख्या समस्यांमुळे पीक विम्याचा प्रवेश आणि परिणामकारकता मर्यादित राहिली. आणि या योजनेचा प्रत्येक्ष शेतकऱ्यांना जास्त फायदा झाला नाही.
  • म्हणून अधिक व्यापक आणि कार्यक्षम पीक विमा प्रदान करण्यासाठी, भारत सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) सुरू केली. ही योजना 2016 च्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आली.

योजनेची महत्वाची वैशिष्टे

  • परवडणारे प्रीमियम :- शेतकरी खरीप पिकांसाठी विम्याच्या रकमेच्या फक्त २%, रब्बी पिकांसाठी १.५% आणि व्यावसायिक/बागायती पिकांसाठी ५% इतका एकसमान प्रीमियम भरतात. उर्वरित प्रीमियम सरकार मार्फत भरल्या जाते. सद्य स्थितीत फक्त एका पिकासाठी एक रुपया प्रीमियम चालू आहे.
  • सर्वसमावेशक कव्हरेज – प्रधानमंत्री पीक विमा योजना हे पीक चक्राच्या सर्व टप्प्यांचा समावेश करते, ज्यामध्ये पेरणीपूर्व, काढणीनंतर आणि हंगामाच्या मध्यभागी ची प्रतिकूलता समाविष्ट आहे. यात गारपीट आणि भूस्खलन यांसारख्या कोणत्याही नैसर्गिक संकटाचे स्थानिक धोक्यांचाही समावेश होतो.
  • तंत्रज्ञानाचा वापर : ही योजना पीक नुकसानीचे अचूक आणि जलद मूल्यांकन करण्यासाठी आधुकीन तंत्रज्ञानाचा लाभ घेते. पारदर्शक आणि कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपग्रह मार्फत प्रतिमा,  ड्रोन आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती प्राप्त केल्या जाते.
  • नुकसान भरपाई :- नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीड यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी  शासन त्याची तपासणी करून  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते.
  • थेट लाभ लाभार्थाच्या खात्यात (DBT) :-  विलंब आणि चोरी कमी करण्यासाठी दावे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्या जातात.
  • या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे विमा काढला गेल्यास तो प्रस्ताव रद्द करण्यात येईल

प्रधानमंत्री पीक विमा योजना पात्रता :

  • भारतातील सर्व  शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत, तुमच्या कडे कितीही एकर शेती असली तरीही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  • शेतकऱ्यांनी त्यांचे पीक  वेळेत नोंदणी करणे आवश्यक आहे आणि वेळेत प्रिमियम भरावा.
वर्तमान स्थिती
  • 2024 पर्यंत,  PMFBY ही जगातील सर्वात मोठ्या पीक विमा योजनांपैकी एक आहे. याने लाखो शेतकऱ्यांना यशस्वीरित्या आर्थिक संरक्षण दिले आहे, त्यांना शेतीशी निगडीत जोखीम कमी करण्यात मदत केली आहे. या योजनेने शेतीचे उत्पन्न स्थिर ठेवण्यास आणि शेतीच्या शाश्वततेला चालना देण्यासही हातभार लावला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY साठी अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY मध्ये सहभागी होण्यासाठी, शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे:

हंगामानुसार अर्ज करणे गरजेचे आहे

  • खरीप हंगाम : जून ते ऑगस्ट
  • रब्बी हंगाम : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
  • उन्हाळी हंगाम:  फेब्रुवारी ते मे

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. नोंदणीकृत शेतकरी : अर्ज करण्यासाठी, शेतकरी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात (CSC) जाऊन नोंदणी करू शकता.जर तुमची नोंदणी झाली नसेल तर नव्याने नोंदणी करून घ्या.
  2. बँक खाते : पीक विमा भरणारा शेतकऱ्यांच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे. विमा प्रीमियमचे ऑनलाइन पेमेंट करता येईल. आणि शासनाकडून मिळणारा परतावा सुद्धा त्याच बँक खात्यात जमा होईल.
  3. पीक निवड :विमा काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या पिकाची निवड करायची आहे ते निवडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ते पिक किती शेत्रात आहे आणि तुमच्या क्षेत्रात कोणती पिके विमा संरक्षणासाठी उपलब्ध आहेत हे तुम्ही CSC मध्ये जाऊन किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना ला भेट देऊन तपासू शकता.
  4. विमा कंपनीची निवड : आपण आपल्या आवडीनुसार विमा कंपनी निवडू शकता. अनेक बँका आणि खाजगी विमा कंपन्या पीएमएफबीवाई अंतर्गत विमा देतात. योजना जरी शासनामार्फत असली तरीही विमा विकणाऱ्या खाजगी कंपनी आणि बँक आहेत.
  5. विमा प्रीमियम भरा :विमा प्रीमियम तुमच्या निवडलेल्या पिकाच्या प्रकारावर, लागवडीच्या क्षेत्रफळावर आणि विमा संरक्षणाच्या पातळीवर अवलंबून असतो . तुम्ही CSC मध्ये जाऊन किंवा विमा कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन प्रीमियम भरू भरून त्याची पावती मिळवू शकता.
  6. आवश्यक कागदपत्रे जमा करा :तुम्हाला तुमचे ओळखपत्र, जमिनीचा पुरावा आणि बँक पासबुकची प्रत जमा करावी लागेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजना PMFBY मिळणारे फायदे
  1. नुकसान भरपाई :- पिक विमा काढल्यानंतर जर काही नैसर्गिक आपत्ती, रोग, किडी आणि इतर विमाधारक घटनांमुळे पिकाचे नुकसान झाल असेल तर त्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई शासन आर्थिक स्वरुपात थेट अर्जदारांच्या बँक खात्यात जमा केल्या जाते. यामध्ये  पूर, दुष्काळ, वादळ, गारपीट, हिमवृष्टी, तीव्र उष्णता, रोग आणि किडींचा समावेश करण्यात आला आहे. विमाधारकाने आपल्या पॉलिसीमध्ये निवडलेल्या विमा संरक्षण पातळीनुसार नुकसानीची भरपाई केली जाते.
  2. प्रधानमंत्री पिक विमा योजना मधून फक्त आपल्याला आर्थिक लाभच मिळत नाही तर विमा काढताना लागणारा प्रीमियम सुद्धा कमी भरावा लागतो सध्या त्याचा दर फक्त १ रुपया असून बाकीचे पैसे शासनामार्फत भरले जातात. सोबत  नुकसान भरपाचे दावे विमा कंपनी मार्फत तत्काळ आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडले जातात. आणि बिमाच्या निवड करताना तुम्हला अनेक पर्याय उपलब्ध आहेत सोबत एकदा का तुम्ही तुमच्या पिकाचा विमा उतरवला कि तुम्ही लगेच बँक मधून कर्ज सुद्धा घेऊ शकतो.
  3. अधिक माहिती साठी वेबसाईट

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून  फक्त 1 रुपयात करा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजनासाठी व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top