Shivaji Maharaj History शिवाजी महाराज इतिहास

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

मराठी मातीत अनेक वीर लढवय्ये जन्माला आले आहेत आणि त्यांनी मराठी प्रांताचे नाव मोठे केले आहे .आज्गायात आपण त्यांना पूजितो,वंदितो,व त्यांच्या शोर्याचा जयजयकार करतो . त्यांच्या नाव कानावर पडताचअंगावर काटे उभे राहतात त्यांचे असाधारण पराक्रम आठून नसानसात जोश भरून येतो आणि तेव्हा कळते कि आपण किती भाग्यशाली आहोत जे कि अशा  लढाऊ मातीत आपला जन्म झाला.

या वीर मध्ये सर्वात अग्रणी वीर म्हणजे छ.शिवाजी महाराज त्यांनी मराठी मातीला “स्वराज्य”नवीन नाव दिले.मराठी प्रांताला मुघलांच्या तावडीतून सोडून तिथे मांगल्याचा कलश बांधला.छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहेत, त्यांच्या अपवादात्मक नेतृत्व, लष्करी पराक्रम आणि नाविन्यपूर्ण कारभारासाठी ते नेहमी आदरणीय आहेत. 17 व्या शतकात त्यांनी मुघल साम्राज्याच्या वर्चस्वाला आव्हान देऊन आणि सार्वभौम भारताची पायाभरणी करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांचा वारसा कायम आहे, शौर्य, न्याय आणि सचोटी भावी  पिढ्यांना प्रेरणा देत आहे.त्याच महान छ. शिवाजी शिवाजी महाराज इतिहास आपण जाणून घेऊ.

शिवाजी महाराज इतिहास
शिवाजी महाराज इतिहास

छ.शिवाजी महाराजांचे बालपण आणि शिक्षण :(१६३०-१६४०)

शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते त्या सिंदखेड राजा येथील लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या ते यादव वंशातील होते तर वडिलाचे नाव शाहजी राजे भोसले होते  .शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी त्यांचे पिता शहाजी यांच्याकडे पुणे या प्रांताची जहागीर होती.शहाजी राजे नी गर्भवती जिजाबाई न पुण्याच्या उत्तरेला ८३ किमी अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्यावर ठेवले होते.तेथेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०)रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला (इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख  मानली जात होती )

शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरी गडावरील  शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले.  एका कथेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा त्याला तुझे नाव देते असा नवस केला होता म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले

शिवनेरी वरच शहाजी राजेंनी नी शिवबाला राजनीती कौशल्य ,युद्धकला,आणि प्रशासन या कला शिकवण्या साठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. आणि पुण्याला झांबरे पाटला पासून जागा घेऊन लालमहाल नावाचा राजवाडा शिवाजीसाठी बांधला .

विवाह :

जिजाऊ नी शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकरांच्या सईबाई यांच्याशी १६ मे  १९४० मध्ये लाऊन दिला या लग्नाच्या वेळी शहाजीराजे तेथे उपस्थित नसल्याने शहाजी राजेंनी  त्यांचा दुसरा विवाह(१६४४) शिर्क्यांच्या सोयराबाई सोबत लाऊन दिला.स्वराज्य विस्तार च्या साठुई शिवाजी महाराजांचे इतर ६ विवाह झाले त्यांच्या इतर पत्नींचे नाव पुढीलप्रमाणे पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई,लक्ष्मीबाई,सगुणाबाई,गुणवंतीबाई

स्वराज्याची सुरुवात :

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला पडले.तोरणा हा किल्ला जिंकून त्याची डागडुजी करताना शिवाजी महाराजांना तेथे एक मोहरांचा हंडा मिळाला .त्या धनाचा करून तोरणाच्या पूर्वेस राजगड नावाचा नवीन किल्ला बांधला(स्वराज्याची पहिली राजधानी)

  • विजापूरची पहिली लढाई :तोरणा जिंकल्यानंतर शिवाजीने विजापूरच्या ताब्यातील कोंढाणा,चाकण,पुरंदर,शिरवळ,रोहिदावैगरे किल्ले काबीज केले.त्यामुळे आदिलशाहणे प्रचंड फौजेसोबत फातेखानास शिवाजी सोबत लढण्यास पाठवले त्यानुसार फतेखानाने पुरंदराजवळील बेलसर या गावी छावणी टाकली होती. शिवाजी महाराजांनी बाजी पासलकर यांना सांगून फतेखानाच्या छावणीवर हल्ला करविला. त्यामुळे फतेखानाने चिडून पुरंदरावर हल्ला केला. पुरंदरावर झालेल्या लढाईत त्याचा पराभव झाला व त्यास विजापुरास पळ काढावा लागला.
  • राजधानी राजगड :सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले.राजगड हि मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी होती याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म आणि  सईबाईंचे निधन या अत्यंत  महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र होते जावाळ खोरयात प्रतापगड बांधून तेथे कुलस्वामिनी भवानी देवीची स्थापना केली

स्वराज्याचा विस्तार

  • शिवाजीने ३० एप्रिल १६५७ साली मोगलांचे जुन्नर लुटले त्याच वेळी सईबाई प्रसूत होऊन त्यान संभाजी महराजांचा जन्म झाला.
  • जुन्नर नंतर कोकणातील कोंढाणा काबीज केला व त्यानंतर कल्याण काबीज केले.व आबाजी सोनदेव याला कल्याण चा सुभेदार नेमले.
  • शिवाजीने कुडाळ येथून ३०० होण देऊन एक उत्कृष्ट युरोपियन तलवार विकत घेतली व त्या तलवारीचे नाव भवानी आसे ठेवले.प्रतापगडचा भवानी मातेवर शिवरायांची श्रद्धा होती मानून या तलवारीला भवानी आसे नाव दिले आसे काही इतिहासकार मानतात.
  •  भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. 
  • शिवाजी महाराजांनी ६ ते ९ जानेवारी १६६४ मध्ये सुरत लुटली व तेथून लाखोंची संपत्ती स्वराज्यात आणली

अफजलखानाचा वध :विजापूर चा मु .आदिलशहाच्या मृत्युनंतर त्याच्या जागी अली आदिलशहा पदारूढ झाला पण कारभार त्याची आई बडी साहेबा हि पाहत होती तिने शिवाजीचे पतन करण्यासाठी अफजलखानाला पाठवले तो विजापूरला पंढरपूर मार्गाने निघाला. शिवाजी महाराजांनी सर्व कुटुंबाला राजगडावर  ठेऊन ते प्रतापगडावर गेले .शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडावर भेटीसाठी आमंत्रण दिले.१० नोव्हेंबर१६५९ ला भेट ठरली.त्याने प्रतापगडच्या पायथ्याला शामियाना उभारला .त्या शामियान्यात महाराज भेटीसाठी आले शिवाजी ला आलिंगन देण्यासाठी खान समोर आला व त्याने शिवबा ची मन काखेत दाबली व कट्यार काढून महाराजाच्या कुशीत खुपसली.पण चिलखतामुळे महाराजांना काही इजा झाली नाही तेव्हा शिवाजी महाराजांनी वाघनखे व उजव्या हातातील बिचवा खानच्या पोटात खुपसली व अफजल खानाचा वध केला.

अफजल खानच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी वसंतगड,खेळणा,रांगणा,विसापूर हे किल्ले काबीज केले.

शाहिस्तेखानाची स्वारी :औरंजेबचा मामा शाहिस्तेखान यास विजापूरच्या मदतीसाठी पाठवले तो पुण्यात आला त्याने पान्हाळ गडाला वेध दिला व लाल महालात मुक्काम टाकला शिवाजी महाराज मोठ्या शितापीने पान्हाळ गडाच्या वेढ्यातून निसटले व त्यांनी लाल किल्ल्यात शाहिस्तेखानावर हल्ला केला.त्यावेळी तो खिडकीतून पळत असताना महाराजांची तलवार लागून त्याची तीन बोटे छाटली गेली.

आग्रा सुटका :औरंगाजेब ने त्याच्या वाढदिवशी मिर्झा राजा जयसिंग कडून शिवाजी महाराजांस भेटी साठी बोलावले तेव्हा महाराजांचे मन मिर्झा रजनी आग्र्याला जाण्यास वळवले.महाराजांनी सत्ता सूत्रे जिजाऊ च्या हाती देऊन ते शंभूराजे सह भेटीसाठी निघाले(५ मार्च १९६६ )ते औरंगजेब च्या दरबारी पोहचले पण तेथे त्यांचे कासलेच स्वागत झाले नाही व मान्साब्दाराच्या रांगेतही त्यांना स्थान दिले गेले नाही तेथे त्यांना बरेच मागे उभे केले होते व मनाची खिल्लात पण त्याच्या जवळच्या माणसाना दिली हा अपमान न सहन झाल्यामुळे महाराजांनी दरबारात आवाज चढवला व गोंधळ घातला.त्यामुळे औरंगजेबाने शिवाजी महाराज व शाम्भूराजेना नजरकैद केले .त्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी आजारपणाचे नाटक केले व त्यातून बरे वाटण्यासाठी ठराविक दिवशी मिठाई वाटण्याचे ठरवले त्या दिवशी शिवाजी व संभाजी मिठीच्या पेटार्यात बसून पसार झाले

राज्याभिषेक

  • शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ५ जुन १६७४ गागाभट्ट यांच्या साक्षीने रायगडावर पार पडला .गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होतेयावेळी त्क्षेत्रीयकुल्वातांस ,सिहास्नाधीश्वर,महाराज,छत्रपती हि पदवी घेतली.स्वताची शिवराई  नाणी पडली व भगवा ध्वज हे निशाण निवडले.महाराजांनी राजव्यवहारकोश नावाचा शब्दकोश तयार केला.व ३२ मन सुवर्णाचे रत्नजडीत सिंहासन बनवले.तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून ‘करणकौस्तुभ’ नामक ग्रंथही लिहवून घेतला व अष्टप्रधान मंडळ स्थापन केले
  • दुसरा राज्याभिषेक:१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी त्याने महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला.

छ शिवाजी महाराजांचा मृत्यू :

  • हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झालाशिवाजी महाराजांचा मृत्यू झाला.
  • शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. 
  • शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले.  राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले.

राजमुद्रा :

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

अर्थ :   प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून Shivaji Maharaj History शिवाजी महाराज इतिहास व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top