बांधकाम कामगार घरकुल योजना :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (ऍक्टिव्ह ) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) मंडळामार्फत राबविण्यास आणि त्यासाठी रु. १,५०,०००/- इतके अर्थसहाय्य देण्याबाबत संदर्भाधीन दिनांक १४ जानेवारी, २०१९ च्या शासन निर्णयान्वयें मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थ्याकडे जमिन असणे आवश्यक आहे. सदर लाभार्थ्याने खरेदी केलेल्या जमीन व इतर बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचार मध्ये होती.
बांधकाम कामगार घरकुल योजना आणि शासन निर्णय –
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रीय) बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेऊन घराचे बांधकाम पूर्ण करुन घरबांधणीच्या पूर्णत्वाचा दाखला सादर केला आहे, असे बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अर्थसहाय्य मिळण्यास पात्र असतील. अशा लाभार्थ्यास जमीन खरेदी व घरबांधणीच्या अनुषंगीक बाबीसाठी केलेल्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून रु.५०,०००/- पर्यंतचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येत आहे. हे मंजूर अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक बचत खात्यात जमा करण्यात येईल.
बांधकाम कामगार घरकुल योजना चे स्वरूप –
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (active) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (active) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील दिलेल्या प्रमाणे आहे.
1.मंडळाकडील नोंदीत (ऍक्टिव्ह) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. १.५० लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
2. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर (MGNREGA) मिळणारे अनुदान रु. १८,०००/- आणि स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी मिळणारे रू.१२,०००अनुदान ,असे एकूण रु. ३००००/- अनुदान हे रु. १.५० लक्ष मध्ये समाविष्ट केलेले आहे,म्हणून या दोन योजनेचा पुन्हा लाभ मिळणार नाही .
घराच्या बांधकामाविषयी अटी व नियम काय आहेत ?
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्रअसलेल्या बांधकाम कामगारांनी किमान २६९ चौ. फुट एवढी जागा असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता रु. १.५० एवढे अनुदान मिळेल . परंतु लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम करायचे असेल तर ते स्वखर्चाने करू शकतात . त्या साठी मुभा राहील
- संपूर्ण बाधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा.
- शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
- जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फूट असावी.
- छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास सूट राहील.
- घराच्या front भागावर मंडळाचे लोगो लावणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार घरकुल योजना साठी पात्रता व नियम काय आहेत ?
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (ऍक्टिव्ह) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (ऍक्टिव्ह )या योजनेचा लाभ (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (ऍक्टिव्ह ) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
- नोंदीत (ऍक्टिव्ह) बांधकाम कामगारांचे स्वतःच्या /पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. तश्या आशयाचे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधायचे असेल तर स्वतःच्या किंवा पती किंवा पत्नीच्या नावावर जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या जागी घर बांधता येईल.
- बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे .
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
- एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुन्हा या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (ऍक्टिव्ह) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (ऍक्टिव्ह ) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ((ग्रामीण) लाभ घेण्यासाठी अर्जासह खाली दिलेले कागदपत्र देणे आवश्यक आहे.
- सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत आवश्यक .
- आधारकार्डाची प्रत
- ७/१२ चा उतारा/ मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा.
- लाभधारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत
- शासन निर्णय वाचण्यासाठी इथे लिंक करा बांधकाम कामगार घरकुल योजना
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून बांधकाम कामगार यांना मिळणार घरकुल किंमत १.५ लाख बांधकाम कामगार घरकुल योजना !
व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.