राज्यातील जवळपास 45.2 टक्के लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेती ह्या व्यवसायवर अवलंबून असून त्यापैकी बरेच शेतकरी शेतात भिजवनुकीसाठी डिझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर करतात, त्यामुळे त्यांचा बराच खर्च वाढतो.डिझेल पेट्रोल सारखे इंधन दिसेनदिसव खूप महाग होत चालेले आहे. ही गोष्ट लक्षात घेता, राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 01 जानेवारी २०19 ला सुरू केली असून,राज्य सरकार या योजनेअंतर्गत शेतकर्यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार आहे.ज्यामुळे शेतकऱ्याचा सिंचनावर होणारा बराच खर्च कमी होईल आणि उत्पादनात वाढ होईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे मुख्य टप्पे
सौर पंप योजना पुढील 3 वर्षा प्रमाणे 3 टप्प्यामध्ये राबवली जाणार असून वर्षानुसार काही ठराविक सौर पंप लाभयार्थ्याना वाटप केल्या जातील . सदरील निर्णय घेण्यामागचा शासनाचा हा उद्देश आहे की योजना राबवताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये , गरजेनुसार काही बद्दल करावयाचे असल्यास तसे निर्णय घेता येतील. आणि योजनेच्या अमलबजवणीमध्ये काही त्रुटि असल्यास किंवा काही महत्वाचा बद्दल असल्यास तो आमूलाग्र बदल करून पुढील आर्थिक वर्षात योजने ची अमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभयार्थ्याना लाभ देता येईल.
- पहिला टप्पा – 25 हजार सौर पंप वाटप
- दुसरा टप्पा – 25 हजार सौर पंप वाटप
- तिसरा टप्पा – 25 हजार सौर पंप वाटप
- चौथा टप्पा – 25 हजार सौर पंप वाटप
असे एकूण 1 लाख रुपये सौर पंप या योजने अंतर्गत वाटप केल्या जाणार आहेत. (सदरील वाटपामध्ये शासन काही बदल केलेले आहेत जे उपलब्ध पैसा आणि आर्थिक धोरणानुसार होऊ शकतात )
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे महत्व आणि फायदे Importance and Benefits
- सौर पंप योजनेंतर्गत एकूण किमती पैकी ९५ टक्के टक्के अनुदान स्वरुपात राज्य सरकार राज्य सहकार मार्फत दिले जाईल तर लाभार्थीद्वारे केवळ ५ टक्के रक्कम खर्च करावा लागेल.
- लाईट चे भारनियमन व पेट्रोल, डीजेल वर काम करणाऱ्या पंपावर अवलंबून राहायची गरज राहणार नाही.
- महाराष्ट्र सौर पंप योजना 2019 च्या माध्यमातून सौर पंप मिळवल्यास उत्पन्नही वाढेल आणि त्यांना जास्त किंमतीचा पंप खरेदी करावा लागणार नाही.
- सौर पंप चा वापर केल्याने कोणतेही पर्यावरण प्रदूषण होणार नाही.
- नैसर्गिक इंधनाची म्हणजेच पेट्रोल, डिझेल ची बचत होईल आणि त्यांचा इंधनाला लागणार खर्च हि कमी होईल.
- दिवसभर अखंडित वीज पुरवठा होईल आणि सिंचन चांगले होईल.
- वीज बिलापासून मुक्तता.
या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारने हि योजना राबवण्याचे ठरवले. महाराष्ट्र सौर पंप योजना 2019 मध्ये सरकारचा अतिरिक्त वीज भार कमी होणार आहे. जुने डिझेल पंप नवीन सौर पंपामध्ये बदलले जातील. त्यामुळे प्रदूषण हि रोखले जाईल. सिंचन क्षेत्रात होणाऱ्या विजेसाठी शासनाने दिले जाणारे अनुदान देखील कमी होईल. या सर्व बाबींचा विचार करून शासणे हि योजना अमलात आणली आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?
महावितरणाच्या वेब पोर्टलवर Mahadiscom.in ऑनलाइन अर्ज करावा.
- सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्र, पैसे भरणा केल्याची पावती, मंजुरी झाल्याची पोच क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
- नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड
अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे. - ए- 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावी, सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
- 7/12 उतारा प्रत
- आधार कार्ड
- कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी SC/ ST)
- अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही त्रुटि आढल्यास तत्काल अर्जदाराला त्याची माहिती कळविण्यात येईल.
- डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल/ देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
- प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे SMS द्वारे कळवण्यात येईल त्यामुळे स्वतःचा नंबर फॉर्म भरताना द्यावा.
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत / बारमाही जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी महावितरणच्या लाइट ची जोडणी झालेली नसावी.
- 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 HP क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 HP किंवा 7.5 HP क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
- राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
- विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
- अतिदुर्गम भागातील शेतकरी.
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
- सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5 टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
- अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.
सादरील अनुदान 2019 साली जाहीर करण्यात आले होते . तर या अनुदानामध्ये काही बदल झाले असल्यास अर्ज करताना समजून घेणे गरजेचे आहे .
लक्षात ठेवा महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा अर्ज फक्त ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. Mahadiscom.in
फॉर्म भरताना कोणतीही अडचण आल्यास किंवा आपल्या भरलेल्या फॉर्म ची सद्यस्थिती तपासताना कोणतीही अडचण आल्यास तुम्ही comment करून विचारू शकता.
या लेखमधून Mahitia1. in टीमच्या मुख्य लेखनातून मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ आणि कसा करावा अर्ज संपूर्ण माहिती
- 4.5 लाखाचे अनुदान विहीर बांधण्यासाठी वाचा योजनेची पूर्ण माहिती आणि आजच करा अर्ज
- उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई-श्रम कार्ड देऊन अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत . आजच जाणून घ्या ई-श्रम कार्ड चे फायदे
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजना समाज कल्याण विभाग २०२३
- अपंग व्यक्तींना प्रोत्साहन पर अपंग कल्याण राज्य पुरस्कार.