डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल वाचा नेमके कोणते बदल झालेलं व सोबत शसनाचा GR 

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आज या लेखातून आपण महाराष्ट्र्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत झालेले मोठे बदल याविषयी सखोल माहिती पाहणार आहोत सोबत तुम्हाला या लेखात महाराष्ट्र शासनमार्फत प्रकाशित केलेला GR सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे लेख पूर्ण वाचा. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबोद्ध (SC)  शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारणे व उंचावण्यासाठी तसेच अनुसूशचित जाती व नवबोद्ध शेजाऱ्यांना स्वयंपूर्ण व स्वावलंबी करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भित दि. ५ जानेवारी २०१७ साली शासन निर्णयान्वये विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राज्यात लागू करण्यात आली होती या योजनांतर्गत रु १ लाख ५० हजार मर्यादेपर्यत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी सिचिन संच” या बाबीसाठी अनुदान देण्यात येते. सदर योजेनचे आर्थिक निकस सन २०१७-१८ मध्ये निर्धारित करण्यात आहे होते या योजनेअंर्तगत विविध घटकांच्या काळानुसार किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असे असे शासनांच्या लक्षात आल्याने मा. कृषी मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली व मा. आदिवसी विकास विभाग मंत्री यांच्या उपस्थितीत दि. १० जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सदर उयोजनेचे घाटनिहाय आर्थिक मापदंड वाढविणे, निकषांमध्ये सुधारणा करणे व नवीन घटकांचा समावेश कारणेबाबच्या सूचना देण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने या योजेनचे घकनिहाय आर्थिक मानदंड वाढेल आहेत. सोबत निकषांमध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आल्या असून नवीन सुधारणा ह्या ३० सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून खालील निर्णय घेण्यात आले आहेत.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल ते पुढील प्रमाणे 

आर्थिक वर्ष २०२४-२५ ( म्हणजे चालू वर्ष ) पासून अनुसूचित जाती व नवबोद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आर्थिक निकषांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे सोबत काही नवीन घटक समाविष्ट करण्यास शासनामधून मान्यता मिळाली आहे. ते पुढील प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल खालीलप्रमाणे. 

घटक अनुदान मर्यादा 
नवीन विहीर – ४ लाख रुपये
जुनी विहीर दुरुस्ती – १ लाख रुपये
शेततळ्याचे प्लास्टिक टाकणे – खर्चाच्या ९० टक्के रक्कम किंवा २ लाख यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम
बोरिंग – ४० हजार रुपये
लाईट जोडणी – २० हजार किंवा जी रक्कम भरली ( जी रक्कम कमी असेल ती रक्कम )
नवीन मोटार – १० HP ची लाईट किंवा डिझेल वरील पंपसंच ९० टक्के किंवा ४० हजार ( जे कमी असेल ते कमी )
सोलर पंप – ९० टक्के किंवा ५० हजार ( जी रक्कम कमी असेल ती रक्कम ) 
पीव्हीसी पाईप – प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या १००% किंवा ५० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम
तुषार सिचन संच – प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत १ अल्प/ अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के + मुख्यमंत्री शाश्वत साईंचं योजनेतून २५ टक्के + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनातुन १५ टक्के किंवा ४७ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम (एकुण  ९० टक्के अनुदान मिळेल)  
ठिबक सिंचन संच पूरक अनुदान – प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत १ अल्प/ अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के + मुख्यमंत्री शाश्वत साईंचं योजनेतून २५ टक्के + डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनातुन १५ टक्के किंवा ९७ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम (एकुण  ९० टक्के अनुदान मिळेल)
यंत्र सामुग्री बैल/ट्रॅक्टर अवजारे– ५० हजार 
परसबाग (नवीन बाग – ५ हजार 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल

सदर योजनेच्या अटी व शर्ती 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल झालेत त्या बदलासोबत काही अति शर्तीत सुद्धा बदल झाले आहेत ते पुढील प्रमाणे. 

  •  नवीन विहिरींबाबत ४ लाख अनुदान पर्यादेपर्यंत विहिरींची खोली असावी पूर्वीची १२ मीटर खोलीची अट रद्द करण्यात येत आहे. 
  • गावाच्या सार्वजनिक विहिरीच्या ५०० मीटर परिसरात विहीर असल्यास त्या विहिरीस शासनाचे अनुदान मिळणार नाही. 
  • दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करण्यात येत आहे. 
  • नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास २० वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेता येईल. 
  • शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. 

महाराष्ट्र शासन GR डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना चा लाभ कोण घेऊ शकते पात्रता 

या योजनेमधील अगोदरच च्या निकषानुसार जे पैशामध्ये बदल झाले आहेत त्याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल झालेत ते पात्रतेचे मध्ये ते पुढील प्रमाणे 

  • लाभार्थीं हा अनुसूचित जाती व नवबोद्ध असावा. 
  • शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिरकण्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 
  • शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावाने ७/१२ दाखला , ८अ उतारा असणे आवश्यक आहे.
    • ७/१२ उतारा २ मिनिटं डाउनलोड करण्यासाठी शासनाच्या ह्या वेबसाइट जा लिंक  digital satbara
    • ८-अ उतारा २ मिनिट मध्ये पाहायचा असल्यास लिंक – ८अ उतारा
  • शेतकरी लाथर्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • स्वतःचे बँक खाते
  • दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड असणे आवश्यक ( ऑनलाईन रेशन कार्ड काढा घरी बसून – महाराष्ट्र शासन 
  • उत्पन्न प्रमाण पत्र (जास्तीत जास्त उत्पन्न मर्यादा १ लाख ५० हजार) 
  • एकदा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्ष लाभ घेता येणार नाही. 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना झालेत मोठे बदल वाचा नेमके कोणते बदल झालेलं व सोबत शसनाचा GR व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top