आपल्या देशात मागील काही सर्वापासून सर्वच गोष्टीमध्ये ऑनलाइन सेवा देण्याचे प्रमाण वाढेल आहे. पूर्वी बाहेर काही खायच म्हणल की तुम्हाला किती तरी दूर प्रवास करून हॉटेल मध्ये जेवायला जाव लागत असे पण सध्या काहीकही खायच असेल तर तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या आवडीचे पदार्थ ऑडर केल्यावर काही वेळातच तुमच्या इच्छुक ठिकाणी खाऊ शकता. हे फक्त खाण्याच्या बाबतीच नाही तर तुम्हाला कोणतीही वस्तु, साहित्य विकत घ्यायची असेल तर आता तालुका, जिल्हा किंवा शहरात याजची गरज नाही तुम्ही ऑडर करून तुमचा पत्ता द्या. काही तासात किंवा दिवसात ती वस्तु तुम्हाला भेटेल. आज तुम्ही घरी बसून कपडे, तुमचे मेडिकल , घरात वापराच्या सर्व वस्तु सहज खरीदे करू शकता. अगदी त्याच सारख तुम्हाला शासनाच्या कोणत्याही योजणाची माहिती लागत असेल तर आज तुमच्या मोबाइल वर ती माहिती सहज उपलब्ध आहे. फक्त माहितीच नाही तर काही महत्वाचे कागदपत्रे तुम्हाला काढायचे असतील टे तुम्ही सहज काढू शकता. आज आपण या लेखामधून आपल्या शेताचा 7/12 digital satbara दाखला माराठीमधून त्याला ऑनलाइन सातबारा कसा एक मिनिटांत आपल्या मोबाइल वरून कसा काढता येईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर digital satbara चे फायदे काय आहेत आणि त्याचा उपयोग तुम्ही कुठे व कसा करू शकता याविषयी सविस्तर माहिती या लेखातून तुमच्यासाठी त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
digital satbara काय आहे
7/12 दाखला हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या भूमी अभिलेख नोंदवहीमधला एक महत्वाचा दस्तावेज आहे. हा दस्तावेज विशिष्ट भूखंडाबद्दलची सर्व सविस्तर माहिती प्रदान करतो. या दाखल्यामध्ये त्या जमिनीचा मालक कोण आहे, जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे, जमीन कुठल्या प्रकारची आहे (उदा. शेती, रहिवासी) आणि इतर संबंधित माहिती असते. त्यामुळे या दाखला खूप महत्वाचा असून तो तुमच्याकडे असायलाच पाहिजे.
नेमकी कोणती माहिती Digital satbara वर असते.
तुमच्या सातबारा वर पुढील महत्वाची माहिती अगदी ठळक आणि सविस्तर असते.
- जमिनीचे विवरण: जमिनीचे क्षेत्रफळ, सीमा, उपयोग आणि वर्गीकरण सुद्धा असते.
- मालकी : जमिनीचे मालक कोण आहे आणि त्या मालकाचा पत्ता काय आहे याची सविस्तर माहिती.
- द्यावयाच्या कर Tax विषयी माहिती : जमिनीवर शासनाला द्यावयाच्या कराविषयी/ टॅक्सविषयी माहिती
- अर्जाविषयी माहिती : जमिनीवर असलेले कोणतेही बँकेचे किंवा सोसायटीचे बंधक किंवा कर्ज आणि थकबाकी विषयी सविस्तर माहिती म्हणजे किती अर्ज घेतले आहे आणि किती भरणा बाकी आहे किंवा थकबाकी असल्यास त्याची माहिती.
- अन्य माहिती : जमिनीशी संबंधित इतर महत्त्वाची सर्व माहिती.
digital satbara चे फायदे
- जमिनीचा मालक – जमिनीचा मालकीहक्क कुणाकडे आहे त्याचे पूर्ण नाव आणि संपर्ण पत्ता सातबारा वर नमूद केलेला असतो त्यामुळे तुम्हाला आता कुणालाही विचारायची गरज नाही.
- कर्ज आणि थकबाकी – जर तुम्ही कुणाची जमीन विकत घेत आहात मग ती शेती असो वा बिगरशेती जमीन असो. तुम्हाला सातबारा पाहून समजेल की त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा थकबाकी आहे की नाही. आणि त्याचा फायदा व्यवहार करताना होतील.
- कर्ज काढताना आवश्यक दस्ताएवज – तुम्हाला बँक कडून किंवा सोसायटी करून कर्ज हवे असल्यास सातबारा उतारा हा महत्वाचा दस्ताएवज समजल्या जातो. तो जमा करणे गरजेचे असते.
digital satbara कसा मिळवावा
आपण आता ऑनलाइन व ऑफलाइन अश्या दोन्ही प्रकारे आपला डिजिटल सातबारा उतारा मिळवू शकता. ऑनलाइन सातबारा मिळवणीसाठी तुम्हाला थोडी धावपळ आणि थोडा त्रास सहन करावा लागेल पान ऑनलाइन digital satbara तुम्ही अगदी सहज आणि काही वेळातच मिळयू शकता.
- digital satbara – मिळवणीसाठी साठी तुमच्याकडे लॅपटॉप किंवा मोबाइल असणे गरजेच आहे. महाबहुलेख या शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर केल्यावर खाली दिलेल्या स्टेप पूर्ण करा आणि तुमच्या सातबारा मिळवा.
- वेबसाइट चे मैनपेज ओपन झाल्यावर तुम्हाला अगोदर तुमचं विभाग निवडावा लागेल. अमरावती , छत्रपती संभाजी नगर , कोकण, नागपूर , पुणे आणि नाशिक पैकी एक निवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेबसाइट वर जाल.
- जिल्हा निवडा : वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरून, दिलेल्या यादीतून संबंधित आपला जिल्ह्याची निवड करा.
- तालुका निवडा : जिल्हा निवडल्यानंतर, दिलेल्या पर्यायांमधून योग्य तालुका निवडा.
- गाव : एकदा तालुका निवडल्यानंतर, जमीन जेथे आहे ते गाव किंवा क्षेत्र निवडा.
- गट क्रमांक / जमीन मालकाचे नाव , पहिले नाव , मधील नाव, आडनाव व संपूर्ण नाव या पैकी तुम्हाला जे माहिती असेल ती माहिती भरून पुढे ज. ( शकतो गट क्रमांक च भरून आपला सातबारा मिळवा.
- पहा आणि डाउनलोड करा: एकदा तपशील पुनर्प्राप्त झाल्यानंतर, आपण स्क्रीनवर digital satbara तुम्हाला दिसेल . तुम्हाला ते डाउनलोड करायचे असल्यास, ते PDF म्हणून सेव्ह करण्याचा किंवा प्रिंटआउट घेण्याचा पर्याय असतो.
तुम्हाला digital satbara मिळवायला काही अडचण येत असल्यास तुम्ही तुमचा सातबारा तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांच्या काढून सुद्धा तुमचा सातबारा काढू शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून आपल्या जमिनीचा digital satbara काढा काही मिनिटात ते पण तुमच्या मोबाइलवरूनव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.