जननी शिशु सुरक्षा योजना मधून महिलाना मिळत आहेत आर्थिक लाभ बघा तुम्ही आहेत की नाही पात्र

जननी शिशु सुरक्षा योजना :- ही भारतातील एक महत्त्वपूर्ण सरकारी योजना आहे जी गर्भवती महिलांना आणि नवजात बाळांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जाहीर केलेली योजना असून आहे. या योजनेमधून लाभार्थी पात्र महिलाना आर्थिक लाभ मिळतो. सोबत इतर ही लाभ मिळतो तो खाली सविस्तर दिला आहे.

जननी शिशु सुरक्षा योजना
जननी शिशु सुरक्षा योजना

जननी शिशु सुरक्षा योजना कधी सुरू झाली?

जून २०११ मध्ये गर्भवती महिलांना रुग्णालयात प्रसूतीसाठी आणि आजारी नवजात बाळांच्या उपचारासाठी मोठा खर्च करावा लागणारा पैसा टाळण्यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला. २०१४ मध्ये, या कार्यक्रमाचा विस्तार गर्भधारणेच्या सर्व पूर्व आणि उत्तर प्रसूती गुंतागुंतीं विलाजासाठी विस्तार करण्यात आला आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्व आजारी नवजात बाळांना आणि एक वर्षापर्यंतच्या बाळांसाठी समान हक्क प्रदान करण्यात आले. त्यामुळे सामान्य वर्गातील लाभार्थी यांना पैसाच्या अडचणी मुळे आरोग्य सुविधे पासून अलिप्त राहण्याची गरज नाही.

JSSK चे लाभार्थी कोण आहेत?

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) हा भारतातील एक महत्वाचा कार्यक्रम आहे जो गर्भवती महिलांना आणि नवजात बाळांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

या योजनेचे मुख्य लाभार्थी :-

  • गर्भवती महिला :- या योजनेचा सर्वात मोठा लाभ गर्भवती महिलांना मिळतो. या महिलांना सरकारी रुग्णालयात विनामूल्य प्रसूतीची सुविधा मिळते, ज्यामध्ये सी-सेक्शन, औषधे, चाचण्या, आहार आणि रुग्णालयात राहण्याचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे.
  • नवजात बाळे :- नवजात बाळांनाही या योजनेचा लाभ मिळतो. या बाळांना जन्म ते एक वर्षापर्यंत आवश्यक असलेली सर्व आरोग्य सेवा , सर्व आजारवर विनामूल्य विलाज होतो. त्या पद्धतीची सेवा सरकार मार्फत शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जननी सुरक्षा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

जननी सुरक्षा योजना ही भारतातील सर्व गर्भवती महिलांना आर्थिक मदत देणारी एक केंद्र सरकार ची योजना असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया राज्य आणि केंद्र सरकारच्या वेबसाइटवर वेगवेगळी असू शकते

सामान्यतः, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:

  1. संबंधित वेबसाइट शोधा : आपल्या राज्याच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन जननी सुरक्षा योजना या शब्दाने शोधा किंवा महिला आणि बाल विकास विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  2. नवीन नोंदणी : जर तुमचे आधीपासून खाते नसेल तर नवीन खाते तयार करा. यासाठी तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक माहितीची भरावी लागेल त्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
  3. अर्ज फॉर्म भरा : नोंदणी झाल्यानंतर, जननी सुरक्षा योजनेचा अर्ज फॉर्म भरा. या फॉर्ममध्ये तुमची व्यक्तिगत माहिती, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर इत्यादी माहिती भरली जाईल. सोबत तुम्ही सेवा घेत असलेल्या रुग्णालयाची माहिती विचारली तर ती भरावी लागेल.
  4. कागदपत्रे अपलोड करा : अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे (जैसे की आधार कार्ड, राशन कार्ड, गर्भावस्था प्रमाणपत्र इ.) स्कॅन करून अपलोड करावे लागतील. त्याशियाय तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
  5. अर्ज सबमिट करा : सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज सबमिट करा. अश्या प्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.
  • स्थानिक अधिकाऱ्यांचा संपर्क: जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकता.
  • अद्ययावत माहिती: या योजनेच्या नियम आणि शर्ती वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहितीसाठी संबंधित वेबसाइटला भेट द्या.

महिलाना काय लाभ मिळेल

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत जननी सुरक्षा योजना चालते त्या योजने नुसार जर गर्भवती महिलेची प्रसूती शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात झाली तर गर्भवती महिलेस 700 रुपये आर्थिक लाभ होतो.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “जननी शिशु सुरक्षा योजना मधून महिलाना मिळत आहेत आर्थिक लाभ बघा तुम्ही आहेत की नाही पात्र ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top