आज च्या लेखातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊयात.
आज आपल्या देशातील महिला अनेक क्षेत्रात प्रगती करत आहेत. आय टी क्षेत्र ,वैद्यकीय क्षेत्र , अभियांत्रिकी क्षेत्र , कृषि क्षेत्रापासून ते अंतराळा पर्यन्त आज महिलाने पोहचून पुरुषा बरोबर आपले कर्तुत्व सिद्ध करत आहे. पण नाण्याच्या जस्या दोन बाजू असतात तश्याच ग्रामीण आणि काही प्रमाणात शहरी भागातील महिला अनेक समस्याना तोंड देत आहेत. आजही पुरुष्याच्या तुलनेत महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. महिलांच्या शिक्षणाला दुय्यम दर्जा दिला जातो. पुरुष्याच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी आहे, 2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक 1000 पुरुषाच्या प्रमाणात 929 महिला आहेत. अश्या एक ना अनेक समस्या आहेत. त्याचाच विचार करून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात तर आज या लेखामधून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना जातात त्याविषयी माहिती घेऊयात. मुलींच्या जन्मापासून ते लग्नानंतर ही अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेऊन मुलीनं चांगले आणि उच्च शिक्षण मिळू शकते. त्यांच्या नोकरी साठी फायदा होतो. विवाहामध्ये आर्थिक सहाय्य मिळते, विवाहानंतर महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना पुढील प्रमाणे
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना पहिली योजना आहे मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिन योजना ही योजना महिला व बाल विकास विभाग काढून महाराष्ट्र शासनामार्फत 2024 साली सुरू करण्यात असून . महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा हेतु आहे , त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमधून लाभार्थीस थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹1,500/- चा आर्थिक लाभ दर महिना मिळणार असून राज्यातील बहुतेक महिलाना रक्षाबंधन च्या दिवशी 2 महिन्याचे 3000 रु त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार द्वारे 2003-04साली सुरू करण्यात असून या योजनेमधून विशेषत: अनुसूचित जाती (SC) विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आलेली असून या योजनेमधून शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट हे अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्याचा शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मकता वाढवणे असून त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे असे विद्यार्थी आणि मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालये किंवा महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतला आहे. त्या विद्यार्थ्याना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचे शिक्षण घेता यावे . याविषयी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र यांनी विचार केला असून या योजनेमधून वर्ग 10 वीच्या लाभयार्थ्याना 300 दर महिन्याला मिळणार आणि 11 वीच्या लाभयार्थ्याना 300 रुपये दर महिन्याला मिळणार असून आणि हा लाभ शैक्षणिक वर्षामध्ये 10 महीने मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीमधील सर्व मुले आणि मुली पात्र आहेत.
- V.J.N.T आणि S.B.C.च्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाणारी शिष्यवृत्ती योजना असून. या योजनेचा उद्देश शाळेत नावनोंदणीला प्रोत्साहन देणे आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील मुलींचे महाराष्ट्रातील मुळामुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी हा असून या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी 8 वी ते 10 वी इयत्तेत शिकत आहेत. ही योजना शैक्षणिक वर्ष 2003-04 पासून चालू करण्यात आलेली योजना असून या योजनेमधून लाभार्थ्याना 10 महिन्यांसाठी प्रति महिना ₹100 म्हणजेच 10 महिन्यांसाठी ₹1000 शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.यांच सोबत 5 वी ते 7 वी च्या मुलांसाठी याच नावाची योजना चालवली जाते ज्या मधून विद्यार्थ्याना शैक्षणिक वर्षामध्ये 600 रुपयाचा आर्थिक लाभ शिष्यवृत्ती देण्यात येत आहे
- प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेमध्ये येणारा निधी हा केंद्र शासन 60 टक्के व 40 टक्के महाराष्ट्र मार्फत देण्यात येतो, जी गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे. समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित अनुसूचीत जाती आणि जमाती घटकातील महिलांना मातृत्व लाभ देण्यासाठी ही योजना आहे. पहिल्या दोन जिवंत मुलांसाठी स्त्रीला आर्थिक लाभ दिल्या जातो , जर दुसरे मूल मुलगी असेल. पहिल्या मुलासाठी ₹5,000/- चा मातृत्व लाभ दोन हप्त्यांमध्ये दिल्या जातो आणि लाभार्थी संस्थात्मक प्रसूती केली तर महिला जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत मातृत्व लाभासाठी मंजूर नियमांनुसार रोख प्रोत्साहन रककमेसाठी सुद्धा पात्र ठरते एकूण सरासरी, एका महिलेला ₹6,000/- मिळतात. दुसऱ्या मुलासाठी, ₹6,000/- चा लाभ जन्मानंतर एका हप्त्यात रोख रक्कम दिल्या जाते.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2016 मध्ये चालू केली या योजनेमध्ये येणारा निधी हा केंद्र शासन 60 टक्के व 40 टक्के महाराष्ट्र मार्फत देण्यात येतो . या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण व वंचित कुटुंबाना एलपीजी गॅस सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून जळाऊ लाकूड, कोळसा, शेणखत इत्यादी सारख्या पारंपारिक स्वयंपाकाच्या इंधनाचा वापर कमी करणे.सोबतच धूरांमुळे महिलामधील वाढते आजारपण कमी करणे हा आहे यायच परिणामी ग्रामीण भागातील जंगळाचे प्रमाणे वाढावे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजेनेमधून ग्रामीण व वंचित कुटुंबाना मोफत एलपीजी गॅस ची कनेक्शन सोबत पुढील वर्षभर एलपीजी गॅस वितरित करण्यात आला आहे. सध्या या योजनेमधून मोफत एलपीजी गॅस ची कनेक्शन देण्यात येत आहे सोबतच गॅस विकण घेताना सबसिडी सुद्धा देण्यात येत आहे. ही योजना खरच गरजू लाभार्थी पर्यन्त पोहचली का ?
- अविवाहित मुलीसाठी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप
- अविवाहित मुलीसाठी सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप (SJSGC) ही विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), उच्च शिक्षण विभागाची फेलोशिप योजना असून, या योजनेमधून ज्या मुलीना पीएच.डी. पदवी करायची आहे आणि ती मुलगी त्यांच्या कुटुंबातील ‘एकल मुलगी’, म्हणजे कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे , त्या मुलीला दुसरे कुणी भाऊ किंवा बहीण नाही. आणि जर एकाच वेळी दोन जुळ्या मुली/भाऊ मुलींपैकी एक मुलगी असेल तर तिला या योजनेअंतर्गत फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून जर तुम्ही पात्र ठरला तर या योजनेचा फायदा घेऊन शकता.
- फेलोशिपचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी असून त्या मध्ये कोणतेही वाढ होणार नाही आणि या 5 वर्षात मध्ये लाभार्थी मुलीला सुरुवातीचे 2 वर्ष 31,500 मिळतील आणि पुढील 3 वर्ष 35,000 मिळतील. 2024 मध्ये या रक्कम मध्ये काही वाढ झाली आहे त्यामुळे अर्ज करताना संपूर्ण माहिती समजून घ्यावी. अधिक माहिती साठी तुम्ही शासनाच्या वेबसाइट ला भेट देऊ शकता. महाराष्ट्र शासन
आज च्या लेखातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना फक्त 6 योजनांची माहिती देण्यात आली आहे अजून 43 योजना आहेत ज्या राज्य शासन आणि केंद्र शासन मार्फत फक्त महिलांसाठी राबळवल्या जातात. जर तुम्हाला त्याही योजनाची माहिती पाहिजे असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये कळवू शकता सोबत वर दिलेल्या महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कसी वाटली त्या बद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्याही कळवा.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ज्या मधून तुम्हाला मिळेल आर्थिक लाभव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.