केंद्र सरकारने सोमवारी म्हणजेच 25 नोव्हेंबरला पॅनकार्ड 2.o PAN 2.O लॉन्च करण्याची घोषणा केली आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संदर्भात पॅन्ट क्यू आर कोड चा सुविधा येणार असल्याचे सांगितले 2023 चा अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सीबीआय म्हणजेच कॉमन बिझनेस आयडेंटिफाय मिशन सादर केलं होतं त्या मिशनचा हेतू भारतातील व्यवसाय करण्याची पद्धत तत्परता हा होता या मिशनचा अंतर्गत देशात सुरू असलेले व्यवसायाला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो त्यामुळे काय होतं तर इन्कम टॅक्स आणि फायनान्शिअल गोष्टींचे व्यवस्थापन सोयीस्कर होतं आता हे सांगण्याचं कारण म्हणजे पॅन 2.0 देखील यात कॉमन बिजनेस आयडेंटिफायर मिशन अंतर्गत लॉन्च करण्यात आले मात्र सरकारच्या घोषणेमुळे बरेच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेत कारण सद्यस्थितीचा विचार करता भारतातील 78 कोटींपेक्षा जास्त लोक हे पॅन कार्ड धारक आहेत सगळ्यांकडे ऑलरेडी एक पॅन कार्ड असताना सरकारला पॅनकार्ड 2.o ची गरज का आहे केवळ किंवा कोड साठी सरकारी यावर 1432 कोटी रुपये खर्च करताय का नवीन पॅन कार्ड काढावाच लागेल का ? तुमच्या मनात पडलेल्या 6 प्रश्नाची उत्तरे या लेखातून त्यामुळे लेख पूर्ण वाचा
पॅन कार्ड काय आहे आणि उपयोग
- 1972 साली आयकर विभागाने देशात पॅन कार्ड जारी केले पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर १० अंकी नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो प्रत्येक भारतीयांसाठी आज हे महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर अनेक गोष्टींमध्ये देखील केला जातो .
- 1990 पर्यंत सर्व व्यक्तींनी कंपन्यांसाठी पॅन कार्ड बंधानकरक करण्यात आलं.
- पॅन कार्ड हे केवळ एकाच प्रकारचे नसतं तर पॅन कार्डचे 11 प्रकार असल्याचा सांगितलं जातं संस्थांना त्यांच्या प्रोफाईल नुसार वेगवेगळ्या श्रेणीचं पान काढतात तर व्यक्तींना देखील त्यांच्या नागरिकत्वाच्या आधारावर पॅनकार्ड दिले जातात पॅनकार्ड किंवा भारतीयांनाच मिळत असं नाही परदेशी नागरिकांनी कंपन्यांना देखील 49 द्वारे फॉर्म भरल्यानंतर पॅन कार्ड दिले जाते.
- पण आता जवळपास 78 कोटी लोकां कडे ऑलरेडी जून पॅनकार्ड असताना व त्याचा वापर होत असताना नवीन कार्ड का आणले याची माहिती देणार हा लेख आणि सर्वसमान्याना पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे.
सरकारने पॅनकार्ड 2.O का आणलं
थोडक्यात सांगायचे झाल्यास पॅनकार्ड 2.O आत्ताच्या पॅन कार्डची सुधारित आवृत्ती असणारे आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी केंद्र सरकारकडून 1432 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली , केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात घोषणा केली त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं जुन्या पॅनकार्ड मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या त्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या तसेच पॅनकार्ड वरून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्यासारखे प्रकार देखील घडत होते यामागचं कारण म्हणजे सध्या पॅनकार्ड वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर हे 15-20 वर्षे जुने सॉफ्टवेअर मुळे बऱ्याच अडचणी येत होत्या वर उपाय म्हणून आता नवीन पॅन कार्ड मध्येही प्रणाली डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आले यामुळे नवीन पॅन कार्ड हे आता युनिव्हर्सल आयडी सारखं काम करेल तसंच पॅन कार्ड २.० मध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित टेक्नॉलॉजी वापरली गेली असल्यामुळे फसवणुकीच्या घटनांना देखील मोठ्या प्रमाणात आळा बसेल असा अश्विनी वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आले.
- पॅन कार्ड २.० मध्ये काय नवीन आहे
- केडिया अडवाईजरीचे संचालक अजय केडिया यांच्या म्हणण्यानुसार पॅनकार्ड २.० त्या आधीच्या पॅनकार्ड पेक्षा पूर्णपणे वेगळं असेल आधार कार्ड ची लिंक करून इन्कम टॅक्सच्या डेटाचे व्यवस्थापन याद्वारे केले जाईल ते कसं तर पहिला मुद्दा म्हणजे पॅन कार्ड डिजिटलैयजेशन केलं जाईल थोडक्यात सांगायचं म्हणजे कार्डच्या स्वरूपात फिजिकल नसेल तर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल दुसरा मुद्दा म्हणजे पॅनकार्ड २.० मध्ये असणारे किंवा बारकोड वैशिष्ट्य पॅन कार्ड धारकांचे नाव आणि पॅन क्रमांक हा क्यूआर कोड मध्ये लपवलं जाईल तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आधार कार्डची पॅन कार्ड लिंक करणे तर चौथा मुद्दा म्हणजे पॅनकार्ड २.० मध्ये वापरण्यात आलेले नवीन आणि प्रगट टेक्नॉलॉजी याद्वारे किंवा फसवणुकी पासून बचाव होईल
- दोन बद्धतीने तुम्ही नवीन पॅनकार्ड 2.O काढू शकता
- तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईट इन्कम टॅक्स वर लॉगिन करावे आणि तुमचे पॅनकार्ड अपडेट करावे लागेल
- तुम्ही एसएमएस sms द्वारे देखील पॅन कार्ड लिंक करू शकतात यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅनकार्ड जोडलेला असावा उदाहरणार्थ तुम्ही यूआयडी uID लिहून 56161 पाठवू शकतात यानंतर तुमचे पॅन कार्ड अपडेट होईल मात्र जर तुमच्याकडे आधीच पॅनकार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नवीन अर्ज करावा लागेल त्यासाठी कोणताही प्रकारचे पैसे तुम्हाला द्यावे जाणार नाहीत, अर्ज केल्यानंतर तुम्हाला पॅनकार्ड 2.O अंतर्गत नवीन डिजिटल पॅनकार्ड मिळेल यामध्ये आधार लिंकिंग नवीन सुविधा असणार आहे.
- नवीन पॅनकार्ड 2.O कुठे आणि कसं काढायच
- पॅनकार्ड 2.O तयार केल्यानंतर ते इन्कम टॅक्स वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता सोबत तुम्ही ते UTI Pan card online apply अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकता सोबत डाऊनलोड देखील करू शकतात ते पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल तुम्ही ते तुमच्या फोन किंवा लॅपटॉप वर जतन करून ठेऊ शकतात हे कार्ड पूर्णपणे वैध असेल आणि कोणताही अधिकृत प्रक्रियेत वापरता येईल. पॅनकार्ड 2.O चा डेटा आयकर विभागाच्या डेटाबेस मध्ये सेव केला जाईल आणि तुमची गोपनीय माहिती कुठेही हॅक होणार नाही असा दावा सरकार मार्फत करण्यात आला आहे.
- नवीन पॅनकार्ड 2.O आल्यामुळे जुनं पॅन कार्ड बंद होईल का ?
- तरी या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संदर्भात माहिती देताना म्हटले की जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही जोपर्यंत नवीन कार्ड तयार होते तोपर्यंत जुन्या कार्ड वापरू शकता पॅनकार्ड 2.O तयार झाल्यानंतर नवीन कार्ड वापरणे गरजेचे असेल जुना पॅनकार्ड अपडेट केल्यावर पॅन नंबर मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच तुमचा पान क्रमांक तोच राहील पण तुम्ही पहिल्यांदा पॅनकार्ड बनवत असाल तर तुम्हाला सरल नवीन पॅनकार्ड 2.O मिळेल
- जुने पॅनकार्ड आहे त्यांनी नवीन पॅन कार्ड नाही काढलं तर काय
- नवीन पॅन कार्ड सोबत जी अधिकची सुरक्षा आणि सोयीस्कर सेवा तुम्हाला मिळणार नाहीत. ज्याने तुमच्या महत्वाच्या बँकेच्या कामांमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळा येऊ शकतो. सोबत तुमची माहिती चोरीला जाण्याचा धोका राहील पुढील काही वर्षात सरकार पॅनकार्ड 2.O बंधनकारक करतील तेव्हा तुम्हाला नवीन पॅनकार्ड 2.O काढावे लागेल.
- पॅनकार्ड 2.0 साठी खर्च किती
- सध्या च्या माहिती नुसार तुम्हाला नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी अगोदर जेवढा खर्च येत होता तेवढाच खर्च येणार आहे.
- सोबत या अगोदर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 1000 रुपये एवढा खर्च येत होता. तो ही शासनाने माफ केला असून आता तुम्ही मोफत तुमचे आधार कार्ड पॅनकार्ड ला लिंक करू शकता.
- जून पॅनकार्ड नवीन पॅनकार्ड 2.0 मध्ये अपडेट करण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही income tax वेबसाइट जाऊन अगदी 2 मिनिटात तुमचे पॅनकार्ड अपडेट करून घेऊ शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून पॅनकार्ड 2.o केंद्र शासनाने केलेत हे महत्वाचे बदल व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा