रोजगार हमी योजना फळबाग लागवड :- राज्यातील शेतकरी बाधवांसाठी मोठी बातमी असून रोजगार हमी योजना फळबाग लागवड साठी लाखो रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बाधवांना जास्त कागदपत्रे द्यायची गरज नाही आणि अर्ज प्रकिया पण अत्यंत सोपी आहे खाली अर्जाचा नमूना दिलेला आहे सोबत अर्ज करण्याची संपूर्ण प्रकिया सुद्धा दिलेली आहे सोबत किती लाखाचा निधी मंजूर होऊ शकता या विषयी सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

रोजगार हमी योजना फळबाग लागवड
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी २००५ च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यानुसार राज्यभर सुरू आहे. या कायद्याच्या परिशिष्ट – १ मधील कलम १(४) अंतर्गत विशिष्ट प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या जमिनींवर सिंचन सुविधा, भू-सुधारणा, फळबाग लागवड आणि वृक्ष लागवड यांसारखी वैयक्तिक लाभाची कामे घेण्याची तरतूद आहे. फळबाग लागवड योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. शासन निर्णय क्र. मग्रारो २०११/ प्र.क्र. ५८/रोहयो-१० अ, दिनांक २९ जून, २०११ नुसार ही योजना अधिक व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतात. फळबाग लागवडीमुळे केवळ शेती क्षेत्राचाच विकास होत नाही, तर पर्यावरणीय समतोल देखील राखला जातो. शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार कृषी विभागाद्वारेही फळबाग लागवड योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना तांत्रिक सहाय्य, लागवडीसाठी आवश्यक रोपं आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे हा आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. खाली रोजगार हमी योजना फळबाग लागवड कशी करावी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
रोजगार हमी योजना फळबाग लागवड लाभार्थी कोण
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 4 मधील तरतुदीनुसार कृषि विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम अंतर्गत खालील प्रवर्ग लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- भू-सुधार योजनेचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- कृषि कर्ज माफी योजना 2008 नुसार लहान शेतकरी (म्हणजे ज्यांचे शेत 1 हेक्टर पेक्षा जास्त आणि 2 हेक्टर पेक्षा कमी 2.5 एकर पेक्षा जास्त 5 एकर पेक्षा कमी)
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत
- अर्जदार लाभार्थी कडे स्वतःचे जॉब कार्ड असावे
- अर्जदार लाभार्थी परि. 1 मधील अ ते फ या प्रवर्गातील असावा.
- जातीचा दाखला असणे आवश्यक आहे किंवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचा दाखला
- पोस्ट किंवा सरकारी बँक मध्ये अकाऊंट असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवड व अर्हता पध्दती
- रोजगार हमी योजना फळबाग लागवड चा लाभ घेण्यासाठी जॉबकार्ड धारक वरील’ अ ‘ ते ‘फ’ प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी असणे आवश्यक आहे.
- इच्छुक अर्जदाराच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी. लाभार्थ्याने ७/१२ व ८-अ चे उतारे अर्जासोबत जोडावे.
- रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यपध्दतीप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामसभा यांची मान्यता आवश्यक आहे.
- प्रत्येक वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे रु.२.०० लाख पर्यंतची मर्यादा असेल. तथापि कोणत्या प्रकारच्या फळझाडांची लागवड करणार व त्यासाठी दर हेक्टरी किती रक्कम अनुज्ञेय आहे. या आधारावर अपवादात्मक काही परिस्थितीत रू. २.२५ लाख या अनुदान मिळू शकते .
- प्रत्येक लाभार्थ्याच्या जमिनीवरील फळझाड लागवड हा स्वतंत्र प्रकल्प समजण्यात येईल. अशा प्रत्येक प्रकल्पासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता स्वतंत्रपणे देण्यात येईल. तसेच या प्रत्येक प्रकल्पाला MIS वर नोंद घेण्यासाठी स्वतंत्र संगणक क्रमांक असेल.
- कृषि विभागाचे तांत्रिक अधिकारी तांत्रिक मान्यता देतील.
- सदर योजना कृषिविभागामार्फत राबविण्यात येणार असल्याने प्रशासकीय मान्यता तहसिलदार यांच्या मार्फत देण्यात येते.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “रोजगार हमी योजना फळबाग लागवड मधून मिळत आहे लाखो रुपये अनुदान त्यासाठी लागतात हे 4 कागदपत्रे” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
सर्वाधिक वाचलेले