पंतप्रधान पदाची निवड कशी केल्या जाते आणि भारताचे सर्व पंतप्रधानाची यादी कालखंडानुसार. pantpradhan chi nivad kashi hote

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

मागील काही महिन्या पासून आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, आणि चार जून ला संपूर्ण भारतात निवडणुकाचा निकाल सुद्धा जाहीर झाला. प्रामुख्याने भाजप पक्षाने जास्त सीट जिंकून जरी आले असतील तरी ते एकट्याने सरकार स्थापन नाही करू शकत. त्यासाठी त्यांना घटक पक्षाला सोबत घेऊन आघाडी सरकार ची स्थापना करावी लागेल आणि जर भाजप आणि इतर घटक पक्षाने सरकार स्थापन केले तर नेहरू नंतर मोदी ही दुसरे व्यक्ति असतील ज्याने सलग 3 वेळ पंतप्रधान पदाची शपथ घेतील . पण तुम्हाला माहिती आहे का  ह्या  पंतप्रधान पदाला एवढ महत्व का आहे आणि या पदाची निवड प्रक्रिया कशी असते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊ. 

पंतप्रधान

पंतप्रधान म्हणजे कोण असतो ?

  • भारताचे पंतप्रधान कोण आहे- नरेंद्र मोदी भारताच्या राज्यघटनेच्या कलम 74 नुसार, देशातील कार्यकारी प्रमुख आणि सरकारचे प्रमुख असतात. पंतप्रधानाला संसदेत बहुमत असलेल्या पक्षाचे किंवा आघाडीचे नेता म्हणून निवडले जाते. त्यांनी सरकारचे नेतृत्व करणे,मंत्रिमंडळ स्थापन करणे , धोरणे आखणे, आणि देशाच्या प्रशासकीय कामकाजाचे नियमन करणे यासारखी जबाबदारी असते. त्यामुळे, पंतप्रधान हा संसद आणि देशातील नागरिकांना  जबाबदार असतो.
  • तंत्रिकदृष्ट्या पंतप्रधान हे  अतिशय महत्वाचे पद मानले जाते जे की देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्व करतात तसेच देशाच्या आर्थिक विकास व परराष्ट्र धोरणसाठी जबाबदार आसतात    
  • सोप्या  भाषेत सांगायचं झालं तर , पंतप्रधान म्हणजे देशाचे कार्यकारी प्रमुख, शासन प्रमुख, आणि संसदेत बहुमत असलेल्या पक्षाचे किंवा आघाडीचे नेता.

भारताचे पंतप्रधान कसे निवडले जातात ?

  • लोकसभा निवडणुकीनंतर बहुमताने विजयी होणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडून पंतप्रधान निवड होते ही निवडप्रक्रिया राष्ट्रपती कडून अप्रत्यक्षरीत्या केली जाते . 
  • भारताच्या पंतप्रधान पदावर विराजमान होण्यासाठी, त्या व्यक्तीला लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य असणे आवश्यक आहे. लोकसभेत एकूण 545 सदस्य असतात, त्यापैकी 543 सदस्य निवडणुकीतून निवडले जातात आणि 2 सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात.
  • पंतप्रधान बनण्यासाठी, त्या व्यक्तीला बहुमत मिळवणे आवश्यक आहे. याचा अर्थ म्हणजे कमीत कमी 272 खासदारांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे, जे एकूण सदस्यसंख्येच्या (543) निम्म्याहून जास्त असते.
  • एखाद्या राष्ट्रीय पक्षाने 272 हा आकडा पर नाही केला तर ते इतर पक्षा सोबत आघाडी बनवते त्यानंतर ही आघाडी एकमताने त्यांच्या  नेत्याची  नेमणूक करते 

 पदाच्या शर्ती :

  • तो भारताचा नागरिक आसला पाहिजे 
  • तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असाल पाहिजे 
  • लोकसभेत सक्रिय सदस्य असेल तर त्याचे वय किमान  25 असले पाहिजे जर तो राज्यसभेत प्रतिनिधित्व करत असेल तर त्याचे वय किमान  30असेल पाहिजे 
  • दावेदार हा लोकसभेत जनतेकडून सर्वाधिक मते  मिळवलेल्या राजकीय पक्षाचा किंवा आघाडीचा असावा 

भारताचे पंतप्रधान हे देशाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांची जबाबदारी व कर्तव्ये विविध आहेत. त्यांची मुख्य कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत

मंत्रिमंडळाचे नेतृत्व:

  • केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतील करणे 
  • मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून, पंतप्रधान मंत्र्यामद्धे खातेवाटप करतात तसेच त्यामध्ये आवश्यक बदल करतात . तसेच बाकी राहिलेली खाती ते स्वातंकडे ठेवतात 
  • पंतप्रधान हे मंत्रिमंडळाच्या सभांचे अध्यक्ष आसतात व त्यामध्ये घेतलेल्या निर्णयावर अमलबजावणी करतात.
  • पंतप्रधान एखाद्या मंत्र्याचे मंत्रिपद काढून घेऊ शकतात
  • पंतप्रधान सर्व मंत्र्याच्या कामाचे मार्गदर्शन ,नियंत्रण व समन्वय करतात . शहसनाच्या धोरणामद्धे समन्वय राखण्याची जबाबदारी पंतप्रधानवर आसते

कायद्याची अंमलबजावणी-

  • पंतप्रधान हे राष्ट्रपति व मंत्रिमंडळ यामधील प्रमुख माध्यम आसतात . संसदेत घेतलेले निर्णय व प्रस्ताव  राष्ट्रपतीना कळवणे ही त्यांची जबाबदारी आसते 
  • सभेत मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असतात.
  •  सरकारच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करतात.संसदेत चालणाऱ्या चर्चेत हस्तक्षेप करून ते शासनाची बाजू मांडतात 

आंतरराष्ट्रीय संबंध –

  •  देशाच्या परकीयधोरणाला आकार देण्यामध्ये महत्वाची भूमिका पर पडतात त्या संदर्भात ते जे वक्तव्य मांडतात ते अधिकृत मानले जाते 
  • भारताचे परराष्ट्र धोरण ठरवतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापार  संबंध राखतात.
  •  परदेशी राष्ट्रप्रमुखांशी बैठक घेतात आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. 
  • अंतराष्ट्रीय राजकारणसंबंधी जे निर्णय घेतात त्यानुसार जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा तयार होते. 

आर्थिक धोरण

  • पंतप्रधान हे अर्थमंत्रालायच्या सहयाने आर्थिक धोरणे आणि योजनांची आखणी करतात. त्याची प्रभावी  अमालबाजवणी करण्याचे आदेश देतात. 
  •  वार्षिक देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.व त्याच्यासाठी विशेष आधिवेशन बोलाऊन घोषणा करतात ते परकीय व्यापार धोरणे आखतात. 

 संरक्षण आणि सुरक्षा

  • देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी योजना तयार करतात.
  • संरक्षण दलांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेतात.
  • युद्ध ,बाह्य आक्रमण व आरोग्य संकटाच्या काळात आणीबाणी ची घोषणा करतात 
  • गुप्तचर यंत्रणाशी सल्लामसलत करतात 

लोकसभेत सहभाग 

  • लोकसभेत सरकारचे प्रतिनिधित्व करतात.
  • ते राष्ट्रपतीन संसदेची अधिवेशने बोलावणे कीव स्तगित करणे याबाबत सल्ला देतात. 
  • लोकसभेत होणाऱ्या अधिवेशनात ते सरकारचे धोरण व बाजू मांडतात. 

राज्यपाल आणि राष्ट्रपतींशी सल्लामसलत 

  • देशाच्या प्रशासणाशी संबंधित सर्व निर्णय राष्ट्रपतीन कळवणे . व राष्ट्रपतीला त्यासंबंधी माहिती पुरवणे 
  • तसेच काही विशेष अधिकारींच्या नियुक्ती साथी सल्ला देणे जसे की माहन्यायवादी,महलेखपाल लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष  
  • राज्यांच्या राज्यपालांशी आणि राष्ट्रपतींशी नियमित सल्लामसलत करतात.
  • राष्ट्रपतींच्या आदेशानुसार विविध समित्या आणि आयोगांची स्थापना करतात.

हे ही वाचा 

उपक्रम आणि सुधारणा

  • शासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी व देशाच्या विकासासाठी नवीन उपक्रम आणि सुधारणा राबवतात.
  • तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून सरकारी सेवा सुधारतात.
  • तसेच देशाच्या शेकक्षणिक विकासासाठी शेकक्षणिक धोरण राबवतात 

सामाजिक न्याय आणि विकास:

  • सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी धोरणे आखतात आणि राबवतात.
  • गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष कार्यक्रम राबवतात.
  • देशातील विविध प्रदेशला भेट देऊन तेथील समस्याचे निवारण करतात 

राष्ट्रीय एकात्मता:

  • राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी उपक्रम तयार करतात .
  • विविधता आणि एकात्मतेच्या मूल्यांचे संरक्षण करतात. 
  • याबाबत ते राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा  सल्ला घेतात 

 संघीय संबंध:

  • केंद्र-राज्य संबंध सूव्यवस्थापित करतात.
  • राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नियमित संवाद साधतात आणि त्यांच्या अडचणी सोडवतात.
  • राज्यातील नैसर्गिक आपत्ती ,दहशदवाडी हल्ले ,किंवा  आपत्कालीन परस्तीत सहभाग घेतात 

कृषी आणि ग्रामीण विकास:

  • कृषी विकास आणि ग्रामीण विकासासाठी धोरणे आखतात आणि अंमलात आणतात.
  • शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवतात.
  • ग्रामीण भागातील रास्ते वीज व पाणीपुरवठा यासाठी कृषिमंत्रालायला निधी देतात 
  • ग्रामीण व कृषि उद्योगाला आर्थिक मदत व चालना देतात 

सांस्कृतिक संवर्धन

  • सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी योजना आखतात.
  • कला, साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात.
  • कला, साहित्य, संगीत ,चित्रपट यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाद्वारे  विशेष कार्यक्रम आयोजित करतात.भारताचे सर्व पंतप्रधान यादी

 तत्काल निर्णयक्षमता

  •  संकटाच्या वेळी तात्काळ निर्णय घेणे आणि उपाययोजना करणे.
  •  नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये राष्ट्रीय पातळीवरील प्रतिसाद समन्वयित करणे.

विकासाची दिशा ठरवणे

  • देशाच्या दीर्घकालीन विकासाची दिशा ठरवतात.
  • पायाभूत सुविधा, उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये धोरणे आखतात.
  • पंतप्रधान सर्व सेवांचे प्रमुख आसता 
  • पंतप्रधान नीती आयोग ,राष्ट्रीय एकत्तमत परिषद ,अंतरराज्यीय परिषद ,आणि राष्ट्रीय जलसंपदा परिषद याचे अध्यक्ष आसतात.

भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंतचे सर्व पंतप्रधानांची यादी आणि कालखंड खालीलप्रमाणे आहे: 

भारताचे सर्व पंतप्रधान यादी,भारताचे सर्व पंतप्रधान यादी कालखंडानुसार

  •  पंडित जवाहरलाल नेहरू(15 ऑगस्ट 1947 – 27 मे 1964)
  • गुलझारीलाल नंदा (कार्यवाहक) (27 मे 1964 – 9 जून 1964)
  • लाल बहादुर शास्त्री यांचा कार्यकाळ (9 जून 1964 – 11 जानेवारी 1966)
  • गुलझारीलाल नंदा (कार्यवाहक) (11 जानेवारी 1966 – 24 जानेवारी 1966)
  •  इंदिरा गांधी (24 जानेवारी 1966 – 24 मार्च 1977)
  •  मोरारजी देसाई (24 मार्च 1977 – 28 जुलै 1979)
  •  चौधरी चरण सिंग (28 जुलै 1979 – 14 जानेवारी 1980)
  •  इंदिरा गांधी (14 जानेवारी 1980 – 31 ऑक्टोबर 1984)
  •  राजीव गांधी(31 ऑक्टोबर 1984 – 2 डिसेंबर 1989)
  •  विश्वनाथ प्रताप सिंग (2 डिसेंबर 1989 – 10 नोव्हेंबर 1990)
  • चंद्रशेखर (10 नोव्हेंबर 1990 – 21 जून 1991)
  •  पी. व्ही. नरसिंह राव (21 जून 1991 – 16 मे 1996)
  • अटल बिहारी वाजपेयी (16 मे 1996 – 1 जून 1996)
  • एच. डी. देवेगौडा (1 जून 1996 – 21 एप्रिल 1997)
  • आय. के. गुजराल (21 एप्रिल 1997 – 19 मार्च 1998)
  • अटल बिहारी वाजपेयी (19 मार्च 1998 – 22 मे 2004)
  • डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ (22 मे 2004 – 26 मे 2014)
  • नरेंद्र मोदी (26 मे 2014 – 2024)

                                                      ही यादी भारताच्या 2024 पर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची आहे

हे सर्व कर्तव्ये पंतप्रधानांना त्यांच्या कार्यकाळात कार्यक्षमतेने पार पाडावे लागतात, जेणेकरून देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचा मार्ग सुकर होईल.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून  पंतप्रधान पदाची निवड कशी केल्या जाते आणि भारताचे सर्व पंतप्रधानाची यादी कालखंडानुसार. व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top