सदरील योजना समाज सुधारणा करण्याच्या हेतूने राज्य शासनामार्फत राबवल्या जात असून ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण निवासित असलेल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागासी संपर्क करून सदरील योजनेचा लाभ घेऊ शकता. तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज कसा करावा आवश्यक असेल्या दस्त्याऐवज ( Documents) ची माहिती खाली सविस्तर दिली आहे.
योजनेचा उद्देश Purpose of the Scheme
अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी/ ज्यांनी स्वतःहा उद्दोग उभारला आहे आणि स्वयसेवी संस्था ज्यांनी अपंगासाठी उल्लेखनीय कार्य केल आहे यांना राज्य पुरस्कार देऊन त्याचा कार्यास सन्मानित करणे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्य अटी Main terms of Scheme
- विहित नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- अर्दाराचे अपंगत्व किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवार भारताचा रहिवासी असावा.
कोण घेऊ शकते ह्या योजनेचा लाभ Who can take the benefit of this scheme?
- अंध -Blind
- अस्थिव्यंग – Bone Handcaf
- मतीमंद – Mentaly ill
- कर्णबधीर – Deaf
अपंग व्यक्तींना प्रोत्साहन योजना पुरस्काराचा तपशील
दिल्या जाणाऱ्या | पुरस्काराचा | पुरस्काराची | स्वरूप |
उत्कृष्ट अपंग | १२ | रोख रुपये १०, ००० शोल | |
अपंगाचे नियुक्त्क | ०२ | रोख रुपये १०, ००० शोल , श्रीफळ |
अर्ज करण्याची पद्धत Methods of Application
- विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासोबत सदरील विभागामध्ये सादर करणे गरजचे आहे.
- पहिला टप्पा :- जिल्हा समाज कल्याण कार्यालयाला भेट देऊन संबंधित प्राधिकरणाकडून योजनेसाठी अर्जाच्या नमुन्याची प्रत प्राप्त करावी.
- दुसरा टप्पा :- अर्जदाराने अर्जाच्या फॉर्ममध्ये, सर्व अनिवार्य जागा भरून आपला एक पासपोर्ट आकाराचे फोटो स्वतःच्या सही सोबत अर्जावर चिटकवावा आणि सर्व (स्व-प्रमाणित) कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- तिसरा टप्पा :- सदरील अर्ज आपल्या सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण कार्यालयात कागदपत्रांसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज दाखल करावा.
- चौथा टप्पा :- जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून अर्ज यशस्वीरित्या जमा केल्याची पावती/पोचपावती मिळवावी.
- आपल्या अर्जामध्ये काही त्रुटि तर नाहीत ना याची पूर्णतः शहानिशा करून घ्यावी अन्यथा कार्यालयाकडून आपला अर्ज बाद करण्यात येतील व आपली निवड पुरस्कार साथी होणार नाही. अपंग व्यक्तींना प्रोत्साहन
अपंग व्यक्तींना प्रोत्साहन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- नोकरी करत असलेल्या / रोजगारचा पुरावा
- संबधित क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याचा पुरावा
- बाओ-डेटा
- दोन पासपोर्ट फोटो ( स्वतः सही केलेले)
- महाराष्ट्र राज्यात रहिवास असलेल्याचे प्रमाणप्रत / रविवासी प्रमाणपत्र
- अपांगत्वचे प्रमाणपत्र ( अपगत्व 40 टक्के असणे गरजेचे आहे )
- वयाचा दाखल
- स्वतःच्या बँक खात्याचा तपशील ( अकाऊंट नंबर , ifsc कोड , पासबूक किंवा कॅन्सल चेक )
- व या व्यतिरिक्त कार्यालयाकडून इतर काही कागदपत्र ची मागणी केली असल्यास ते कागदपत्र.
संपर्क कार्यालायचे नाव Contact Office Name and details
- जिल्हा समाज कल्याण अधिकारी ( समाज कल्याण, अपंग कल्याण विभाग ) District Social Welfare Officer (Social Welfare, Disability Welfare Department)
- जिल्हा परिषद सर्व व सहय्यक आयुक्त Zilla Parishad All and Assistant Commissioners
- सोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत website ला सुद्धा भेट देऊ सकता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
अपंग कल्याणासाठी समाज कल्याण व न्याय विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या इतर योजना.
- शासकीय संस्थामधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण
- स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा / कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
- अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
- अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे
- अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.
- अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
- अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके
- मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण
- वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद
- अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.
- शालांत परिक्षोत्तर (मॅट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
- मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अपंग व्यक्तींना प्रोत्साहन पर अपंग कल्याण राज्य पुरस्कार व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group –शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजना समाज कल्याण विभाग 2024
- कसे पाहावे आधार कार्ड आणि पैन कार्ड लिंक आहे की नाही Adhar and pan Card Link status
- NBMMP राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन योजनेंतर्गत मिळतंय 16000 रुपयाचे अनुदान आजच करा अर्ज
- उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई-श्रम कार्ड देऊन अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत . आजच जाणून घ्या ई-श्रम कार्ड चे फायदे
- मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ आणि कसा करावा अर्ज संपूर्ण माहिती
- sukanya samriddhi yojana मुलींच्या उज्वल भविष्याची उभारणी: सुकन्या समृद्धी योजना….
Information is very useful
Very nice information thanks for sharing