एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे मुख्यमंत्री अश्या नावाचा उल्लेख आता आपल्या सर्वाना करावा लागेल कारण दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बांधनकारक करण्याबाबत एक जी.आर समंत केल्या असून त्यानुसार आता सर्व शासकीय कागदपत्रावर आपल्याला आपल्या वाडीलासोबत आईचे नाव सुद्धा लावणे बंधनकारक असणार आहे.
1 मे 2024 पासून सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारनं मार्च महिन्यातच हा निर्णय घेतला. पण, त्याची अंमलबजावणी 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी होताच अनेकांना प्रश्न पडलेत की आता आम्ही आमची सगळी कागदपत्रं बदलायची का? ज्या महिलांना लग्नानंतर पतीचं नाव लावायचं असेल तर त्या महिलांनी काय करायचं? आपल्या आईच्या नावानंतर पतीचं नाव लावायचं का? असे काही प्रश्न सोशल मीडियावरूनही विचारण्यात आले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेऊयात.
पार्श्वभूमी
विद्यार्थ्याची शैक्षणिक कागदपत्रे , महसूल विभागाचे कागदपत्रे , जन्म व मृत्यू नोंदीचे दाखले, नोकरीचे सेवा पुस्तक आणि विविध शासकीय परिक्षाचे आवेदन पत्रे इत्यादि शासकीय कागदांमध्ये आईचे नाव वेगळ्या रकाण्यात भरण्यात येत होते, परंतु महिलांना पुरुषाबरोबर समानतेची वागणूक मिळावी, समाजामध्ये महिलाबाबतीत सन्मानतेची भावना निर्माण व्हावी आणि एक पालक असलेल्या महिलांना समाजामध्ये ताठ मान करून जागता यावे या उद्देश्यपूर्ती साठी महाराष्ट्र सरकारने शासकीय कागदपत्रामध्ये उमेदवारच्या नावासोबत आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व नंतर आडनाव अश्या स्वरूपाचे नोंदणी करणे बंधनकारक करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय
सदरील निर्णयाप्रमाणे पुढील कागदपत्रामध्ये होणार असून तो बदल 1 मे 2024 नंतर जन्माला येणाऱ्या व्यक्तीसाठी बंधनकारक राहील.
नवीन बादलाप्रमाणे पुढील कागदपत्रामध्ये आईच्या नाव जोडणे बांधकरक राहील Mother Name Mandatory
- जन्म दाखला
- शाळा प्रवेश आवेदनपत्र
- सर्व शैक्षणिक कागदपत्रे
- जमिनीचा सातबारा , मालमत्तेचे कागदपत्रे
- शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक
- सर्व शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्याचे वेतन स्लिप (सलरी स्लिप)
- शिधावाटप पत्रिका/ रेशन कार्ड
- मृत्यू दाखला.
अपवादात्मक बाबी
- ज्या महिलांचे लग्न झालेले आहे अस्या महिलांचे लग्नानंतरचे नाव त्याच्या नावासोबत पतीचे नाव व पतीचे आडनाव नोंदवण्याची प्रक्रिया जी पूर्वीपासून चालत आलेली आहे ती तशीच राहील. पण महिलेच्या लग्नापुर्वीच्या नावामध्ये मालमतेच्या कागदपत्रामध्ये नवीन नियमानुसार नाव नोंदवण्याची मुभा आहे.
- तसेच जे अनाथ व काही अनुवादात्मक प्रकरणामध्ये मुलांच्या जन्म/मृत्यू दाखल्यात ह्या नवीन नियमापासून सूट देण्यात आली आहे.
काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहेत.
पुढील शासकीय निर्णयानुसार कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या निर्णयानुसार आईच्या नावाचा उल्लेख वेगळ्या स्तंभामध्ये करावा लागेल.Mother Name Mandatory
- शासन निर्णय, महिला व बाळ कल्याण विभाग दि ३०. ११ १९९९ नुसार शाळा महाविद्यालये, रुंग्णालये, जन्म मृत्यू नोंदणी, राशन कार्ड, रोजगार विनिमय केंद्रातील नोंदी, MPSC च्या परीक्षा इत्यादी बाबतीत जे आवेदन, अर्जामध्ये त्याचबरोबर अन्य शासकीय / निमशासकीय अर्जामध्ये जो वडिलांचा वेगळा रकाना असतो, आईचा वेगळा रकाना असतो . त्यामध्ये संबंधित वडिलांच्या नावाबरोबर त्याच्या आईचे नाव नमूद करणे बंधनकारक राहील.
- शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दि 05.02.2000 नुसार प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव दाखल करताना शाळेतील नोंदवही मध्ये तक्ता बी मध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव लिहिल्यानंतर त्या शेवरी एक रकान्यात आईच्या नावाची नोंद करण्यात यावी. सोबतच शाळा सोडताना देखील वर नमूद केल्या प्रमाणे आईच्या नावाची नोंद करण्यात यावी.
- शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दि २४.०२.२०१० नुसार घटस्फोटित पती , पत्नी व आई वडिलांचा घटस्फोट झाला असले.आणि कस्टडी आईकडे दिली असेल. अशा घटस्फोटित आईने / महिलेने आपल्या पाल्याच्या नावापुढे वडिलांच्या नावाऐवजी त्याच्या आईचे नाव लावावे. अशी विनंती केल्यास विहित करण्यात आलेल्या अटींच्या अधीन राहून नावात बदल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या Mother Name Mandatory वेबसाइट वर उपलब्ध करण्यात आला आहे त्याचा सांकेतिक क्रमांक 202403141942537230 असा आहे.Mother Name Mandatory
हे ही वाचा
- पंतप्रधान पदाची निवड कशी केल्या जाते आणि भारताचे सर्व पंतप्रधानाची यादी कालखंडानुसार
- पदवीधर अंशकालीन उमेदवार याच्या कामस्वरूपी नेमणुकीवर शासनात करणार विचार…
- bharat ratna award भारत रत्न इतिहास,मिळणारे लाभ व सुविधा आणि प्राप्तकर्त्यांची यादी …..
- दादासाहेब फाळके पुरस्कार इतिहास व यादी ,Dadasaheb Phalke Award History and List of honour
- पदवीधर अंशकालीन उमेदवार याच्या कामस्वरूपी नेमणुकीवर शासनात करणार विचार…