अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय आणि शासनाने त्यांना किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे .

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय ?

आपल्या देशात शासकीय, निमशासकीय दरबारी नोकरीचे अनेक प्रकार आहेत त्यापैकीच एक म्हणजे अंशकालीन कर्मचारी एक आहे जो पूर्ण वेळ नोकरी न करता आठवड्यातील काही तास काम करतो यामध्ये मध्ये काम करणारे कर्मचारी पाळी मध्ये काम करतात लेबर कायद्यानुदार आवड्याचे कामाचे तास 42 असून कमी तास त्याच्याकडून काम करून घेतल्या जाते, अर्धवेळ कामगार , तासिका तत्वावर काम करणारे बहुदा यामध्ये येतात. अश्या कर्मचाऱ्याना अंशकालीन कर्मचारी म्हणतात.

अंशकालीन कर्मचाऱ्याचे काही उदाहरणे. अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय

  • शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात सी.एच. बी (clock hour basis) पदावर काम करणारे कर्मचारी. तसेच शासनाच्या अनेक विभागात तास बेसिस वर किंवा अर्धवेळ काम कर्मचारी येतात. 
  • आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या एक संशोधनानुसार ,जगातील अमेरिका देश  वगळता, बाकी  बहुतेक विकसित देशांमध्ये मागील  २० वर्षांमध्ये अंश-काळातील कामगारांची संख्या 30 टक्याने  वाढली असून. अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची  अनेक कारणे आहेत, जसे की ते काम करण्याची इच्छा असणे, शासनाचे धोरणात्मक बदल करून अंशकालीन कर्मचारी वाढलेले त्यामागे मोठे ही कारण आहे की कायमस्वरूपी काम करणारे कर्मचारी एवढे वेतन घेतात त्याबदल्यात तेवढे काम करत नाहीत. आणि तास आधारीत कर्मचारी असल्यास कमी वेतनात जास्त काम करून घेतल्या जाते. 
  • उदा . केंद्र सरकारने बीएसएनएल मध्ये काम करण्याच्या अनेक कर्मचाऱ्याना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली. आणि त्याबदल्यात त्यांनी 2 किंवा 3 अंशकालीन कर्मचारी भारती केले.
  • एक कायम नोकरी असलेला कर्मचारी 80 ते 90 हजार पगार घेतो सोबत निवृत्ती त्या व्यक्तीला पेन्शन द्यावी लागते. आणि निवृत्ती च्या अगोदरचे 10 वर्ष कर्मचाऱ्याकडून अपेक्षित काम पूर्ण होत नाही. असे कर्मचाऱ्याना स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावणे आणि त्याच्या जागी अंशकालीन कर्मचारी भारती केल्या जाते ज्यांचा यंदाचे पगार 10 ते 12 हजार असतो. 
  • एन एच एम ( राष्ट्रीय आरोग्य मिशन ) मध्ये विविध पदावर काम करणारे कर्मचारी ही अंशकालीन कर्मचारी आहेत. 

अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या 

  • मार्च 2023 पर्यंत, महाराष्ट्र सरकारने 236,000 कर्मचारी रोजंदारी, मानधन किंवा तात्पुरत्या आधारावर नियुक्त केले आहेत किंवा जे वेतन श्रेणीसाठी पात्र नाहीत. राज्य सरकारने आपल्या चार विभागांमध्ये 11,000 हून अधिक कंत्राटी कामगारांना काम दिले आहे आणि नोव्हेंबरच्या अखेरीस ही संख्या 100,000 पेक्षा जास्त झालेली आहे.अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय 
  • सप्टेंबर 2023 मध्ये, महाराष्ट्र सरकारने सरकारी पदांसाठी कंत्राटी रोजगाराची परवानगी देण्यासाठी सरकारी ठराव (GR) मंजूर केला, ज्यामध्ये विविध सरकारी पदांसाठी कंत्राटी कामगार उपलब्ध करून देण्यासाठी नऊ खाजगी एजन्सींच्या यादीत समावेश करण्यात आला होता. मात्र, राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये हा जीआर रद्द करण्यात आला.अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय 
  • भारतात, कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठराविक कालावधीसाठी विशिष्ट प्रकल्पासाठी भरपाईच्या पूर्वनिर्धारित दराने नियुक्त केले जाते.

अंशकालीन कर्मचाऱ्याचे वेतन 2023

  • मागील काही वर्षात महाराष्ट्र सरकारने शासनाचा आर्थिक खर्च 20-30 % ने कमी करण्यासाठी विभागातील नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग केले आहे. शसनाच्या बहुतेक विभागामध्ये आउटसोर्सिंग मार्फत कर्मचारी पुरवल्या जात आहेत. ह्या आउटसोर्सिंग कंपनी असून ती शासनाकडून वार्षिक तत्वावर कंत्राट घेते आहे मनुष्यबळ पुरवते. कर्मचारी पुरवणाऱ्या कंपन्या सरकारकडून 15% सेवा शुल्क घेतात आणि राज्य कामगार विभागाला 1% कर भरावा लागतो. तथापि, बहुतेक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की कंत्राटीकरणामुळे कमी वेतन आणि शोषण होते.कामाच्या बदल्यात मिळणार पगार खूप कमी असतो. आणि काम सुद्धा मोठ्या प्रमाणात करून घेतल्या जाते.
  • शासनाने आउटसोर्सिंग पगारा संदर्भात विविध मानके ठरवली आहेत. अंशकालीन कर्मचाऱ्याच्या पदानुसार वेतनाचे मापदंड आहेत परंतु बहुतेक बहुतेक कर्मचाऱ्याना मापदंडानुसार वेतन दिल्या जात नाही. आणि विभागानुसार वेतनश्रेणी मध्ये तफावत आढळून आली आहे त्यामुळे नक्की सांगता येणार नाही की कोणत्या पडला किती वेतन मिळत आहे

पदवीधर अंशकालीन कर्मचारी यादी महाराष्ट्र

  • अंशकालीन कर्मचाऱ्यांची अधिकृत आणि सर्वसमाविष्ट असी  कोणतीही यादी महाराष्ट्र सरकारने अधिकृत पणे घोषित केली नसून. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय जिल्ह्याच्या वेबसाइट वर यादी उपलब्ध आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा तफावत दिसून आली आहे. काही जिल्ह्याने यादी आपल्या वेबसाइट वर प्रकाशित केली आहेत तर काही जिल्ह्याने प्रकाशित केली नसल्याचे दिसून आले. 
  • बीड जिल्ह्या शासनाने आपल्या वेबसाइट वर यादी प्रकाशित केली  आहे. यादी पाहण्यासाठी तुम्ही यादी वर क्लिक करून शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन पाहू शकता. अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय 
 हे हि वाचा 

1 thought on “अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय आणि शासनाने त्यांना किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे .”

  1. Pingback: योजना दूत शासन निर्णय मुख्यमंत्री योजनादूत रोजगाराची संधी मिळणार दरमहिन्याला पगार वाचा शासनाच

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top