UGC नेट परीक्षा 2025 , तारखा जाहीर जानेवारी महिन्यात होणार परीक्षा, ऑनलाइन अर्ज ह्या तारखेपासून सुरू, अधिकृत सूचना, अर्ज करण्यासाठी थेट लिंक आणि बरेच काही

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) या परीक्षेचे आयोजन करीत आहे. इच्छुक उमेदवार 10 डिसेंबर 2024 पर्यंत ugcnet.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही परीक्षा 1 जानेवारी ते 19 जानेवारी, 2025 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र यासंबंधीची माहिती असलेले प्रवेशपत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी वेबसाइटवर उपलब्ध होतील. सोबत या लेखाच्या माध्यमातून मुख्य वेळापत्रक आणि तारखा व अर्ज कसा करावा याविषयी सविस्तर माहिती UGC नेट परीक्षा 2025 या लेखातून तुमच्यासाठी

UGC नेट परीक्षा 2025
UGC नेट परीक्षा 2025

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (UGC NET) डिसेंबर 2024 ची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

UGC नेट परीक्षा 2025 महत्वाच्या तारखा

इव्हेंटउघडण्याची तारीखशेवटची तारीख
ऑनलाइन अर्ज सादर करणे19 नोव्हेंबर 202410 डिसेंबर 2024 (रात्री 10:50 पर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख11 डिसेंबर 202411 डिसेंबर 2024 (रात्री 10:50 पर्यंत)
अर्जात सुधारणा१२ डिसेंबर २०२४13 डिसेंबर 2024 (रात्री 10:50 पर्यंत)
परीक्षेचे सेंटरजाहीर करायचे आहेजाहीर करायचे आहे
प्रवेशपत्र / हॉल तिकीटजाहीर करायचे आहेजाहीर करायचे आहे
परीक्षेची तारीख१ जानेवारी २०२५जानेवारी १९, २०२५
रेकॉर्ड केलेले प्रतिसाद/ answer Keyजाहीर करायचे आहेजाहीर करायचे आहे
UGC नेट परीक्षा 2025 घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या महत्वाच्या तारखा वर नमूद केल्या आहेत पण ह्या मध्ये काही बदल झाल्यास यूजीसी नेट च्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित होतील.

UGC नेट परीक्षा 2025, डिसेंबर ची अर्जाची टाइमलाइन

यूजीसी नेट डिसेंबर 2024 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 19 नोव्हेंबर, 2024 पासून अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर, 2024 रोजी रात्री 11:50 वाजता आहे.

यूजीसी नेट डिसेंबर 2024 च्या परीक्षांचे वेळापत्रक

यूजीसी नेट डिसेंबर 2024 च्या परीक्षा 1 जानेवारी, 2025 ते 19 जानेवारी, 2025 दरम्यान होणार आहेत. उमेदवारांना कोणत्या शहरात परीक्षा द्यायची आहे, याची माहिती नंतर देण्यात येईल. तसेच, प्रवेशपत्र, ज्यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक आणि केंद्राची माहिती असेल, ती देखील परीक्षेच्या तारखेच्या जवळपास अधिकृत वेबसाइटवर जारी केली जाईल.

व्यक्तिगत उमेदवारांच्या नेमक्या तारखा, शिफ्ट आणि केंद्रांची माहिती त्यांच्या प्रवेशपत्रात नंतर सांगितली जाईल. परीक्षेनंतर रेकॉर्ड केलेली उत्तरपत्रिके आणि प्रोव्हिजनल उत्तरसूची अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. या घोषणांच्या तारखा नंतर सांगितल्या जातील.

यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षा फीस आणि पेमेंट तपशील

यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षेसाठी फीस हि त्या अर्जदाराच्या आरक्षित प्रवर्गावर अवलंबून आहे, प्रवर्गानुसार किती फीस आहे याचा तपशील खाली दिलेला आहे .

उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय यासारख्या विविध पद्धतींनी शुल्क भरू शकतात. अर्ज यशस्वी झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी पेमेंट स्टेटस तपासून पहा. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता आहे.
वेळापत्रकानुसार, जर अर्जदारांना सादर केलेल्या अर्ज फॉर्ममध्ये कोणतीही चूक सुधारण्याची गरज असेल तर १२ डिसेंबर २०२४ ते १३ डिसेंबर २०२४ पर्यंत रात्री ११:५० वाजेपर्यंत सुधारणा खिडकी उपलब्ध असेल. आवश्यक बदल करण्याची ही एकमेव संधी आहे, म्हणून अर्जदारांनी या कालावधीत त्यांचे फॉर्म काळजीपूर्वक तपासले पाहिजे.

यूजीसी नेट डिसेंबर 2024 , अर्ज कसा करावा ?

यूजीसी नेट डिसेंबर 2024 साठी नोंदणी करण्यासाठी उमेदवार खालील पायऱ्यांचे अनुसरण करून आपला अर्ज पूर्ण करू शकतात , त्यामुळे खालील पायच्याचे वाचन केल्यास तुम्हाला अर्ज करताना नक्कीच फायदा होईल .

पायरी 1 :- यूजीसी नेट च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या ( अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ) आणि नोंदणी लिंकवर क्लिक करा. तुमचे नाव, मोबाईल नंबरसह ईमेल पत्ता आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा . एकदा का नोंदणी झाल्यानंतर, तुम्हाला भविष्यातील लॉगिनसाठी एक अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त होईल. त्याचा वापर करून तुम्ही अर्ज करू शकता .

पायरी 2 :- नोंदणी केल्या नंतर मिळालेल्या अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. शैक्षणिक पात्रता, तुमच्या विषयीची योग्य निवड करून वैयक्तिक माहिती आणि परीक्षा केंद्रांच्या पसंतीसह आवश्यक तपशील भरून अर्ज काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघून घ्या . पुढे जाण्यापूर्वी सर्व भरलेली माहिती योग्य आहे कि नाही व सर्व आवश्यक माहिती भरली कि नाही हे तपासा व अर्ज पूर्ण करा .

पायरी 3 :- तुमचा पासपोर्ट -आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीसह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. अपलोड करताना दिलेल्या सूचनांचे पालन करावे , तस नाही केल्यास तुमचा अपलोड प्रकिया पूर्ण होणार नाही / कागदपत्र अपलोड होणार नाहीत याची अर्जदाराने विशेष काळजी घ्यावी अर्ज दिशानिर्देशांमध्ये नमूद केलेल्या विशिष्ट परिमाण आणि फाइल आकाराचे प्रतिमा असल्याची खात्री करूनच अपलोड करावी .

पायरी 4: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय UPI यासारख्या जवळपास सर्वच उपलब्ध ऑनलाइन पेमेंट पद्धतींद्वारे अर्ज फीस भरण्याची मुभा यूजीसी मार्फत देण्यात आली आहे , त्यामुळे यापैकी कोणत्याही एका प्रकारचा वापर करून तुमच्या अर्जाची फीस भरून घ्या व फीस फरल्यानंतर त्याची पावती आवश्य घ्या .

पायरी 5 :- यशस्वी पेमेंटनंतर, अर्ज यशस्वी भरल्या गेल्याचा मॅसेज येईल आणि एक अर्जाची PDF फाईल तुम्हाला मिळेल ती जपून तेव्हा भविष्यात हॉलतिकिट काढण्यासाठी व अर्जदाराचा निकाल पाहण्यासाठी मदत होईल .

UGC नेट परीक्षा 2025 महत्वाच्या लिंक

यूजीसी नेट डिसेंबर 2024 परीक्षा जानेवारी २ ० २ ५ मध्ये होणार असून त्या परीक्षेची अधिकृत जाहिरात , अर्ज करण्याची लिंक व यूजीसी नेट ची अधिकृत लिंक खाली दिलेली आहे .

जाहिरातClick Here
UGC Net webisteClick Here
Online Application Link अर्ज करण्यासाठी लिंकClick Here
Whats app Groupशासकीय नोकरी & योजना ग्रुप
वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही आवश्यक माहिती घेऊन अर्जदार आपला अर्ज पूर्ण करू शकतात.

या लेखमधून Mahitia1. in टीमच्या मुख्य लेखनातून UGC नेट परीक्षा 2025 जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या यूजीसी नेट च्या परीक्षेच्या महत्वाच्या तारखा , वेळापत्रक, अर्ज कसा करावा व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या शासकीय नोकरी & योजना ग्रुप What’s App group जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top