महाराष्ट्र शासन मार्फत अनेक विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात ह्या योजनांचा मुख्य उद्देश हा राज्यातील सामाजिक , आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील समुदायाचा विकास करणे हा आहे, आज या लेखातून समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना याविषयी माहिती घेऊ.
महाराष्ट्र राज्यात समाज कल्याण , आदिवासी कल्याण , महा-ज्योति असे अनेक विभाग जाती-प्रवर्गानुसार तयार करण्यात आले आहेत , प्रत्येक विभाग आपल्या जाती – जनजाती साठी वेगवेगळ्या योजना राबवत असते , जस कि निराधार व्यक्ती साठी योजना , दिव्यांग व्यक्तीसाठी योजना , वयोवरिष्ठ लोकांसाठी , अल्पभूधारक व्यक्ती साठी , विद्यार्थ्यांसाठी योजना अस्या अनेक योजना राबवून अनुसूचित जाती , जमाती , भटक्या विमुक्त जमाती , व इत्तर मागासर्गीय वर्गासाठी योजना राहिल्या जातात. या लेखातून अनुसूचित जातीतील गोरगरीब लोकांसाठी समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना विषयी माहिती घेऊ.
समाज कल्याण विभाग
शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना झाली , या समितीमध्ये एकूण १ ० सदस्यांचा समावेश होता. व या १ ० सदस्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही मुख्य समावेश होता. या समितीने १ ९ ३ ० झाली एक संक्षिप्त अहवाल शासनासमोर सादर केला . त्यानंतर १ ९ ३ २ साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. केली व मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 9.8.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. – 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना करण्यात आली.
समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले. व 2012 च्या काळात समाज कल्याण चे नाव बदलून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असे करण्यात आले.
समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना
समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना योजना ह्या 7 प्रमुख गटामध्ये विभागण्यात आल्या आहेत ते गट पुढील प्रमाणे आहेत.
शिक्षण व प्रशिक्षण | रोजगार | आर्थिक उन्नती |
विशेष सहाय्य | सामाजिक एकात्मता | सामाजिक उपाय |
पुरस्कार |
शिक्षण व प्रशिक्षण
- अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीकरीता तालुका स्तरावर 100 शासकीय निवासी शाळा सुरू करणे
- शैक्क्णक कर्ज योजना
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.
- सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
- वाहन चालक प्रशिक्षण योजना (विजाभज, इमाव व विमाप्र)
- इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र विद्यार्थींनीना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
- माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विजाभज / विमाप्र विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विजाभज/विमाप्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन.
- इयत्ता 10 वी च्या परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या तसेच इ.12 वी मध्ये शिकणा-या विजाभज / विमाप्र वर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी छत्रपतीशाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.
- इयत्ता 10वी व 12 वी च्या परिक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे.
- शिक्षण व प्रशिक्षण मध्ये जवळपास १ ० ० योजना राबवल्या जातात या योजनेच्या अधिक माहिती साठी शासनाच्या शासनाच्या अधिकृत वेबसाइट भेट द्या – समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना
रोजगार
- महिला किसान योजना
- महिला समृध्दी योजना
- ५० टक्के अनुदान योजना
- रु.25,000/- पर्यंतची थेट कर्ज योजना
- 20% बीज भांडवल योजना
- अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
- केंद्रीय महामंडळाच्या योजना (NSFDC) / राज्य शासनाच्या योजना
- मुदत कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म वित्त पुरवठा, थेट कर्ज योजना
- राष्ट्रीय महामंडळाची योजना
- 45% मार्जिन मनी योजना
आर्थिक उन्नती
- अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.
- अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना.
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत.
- अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे.
- १. २५% बीजभांडवल २. रु. २५,०००/- थेट कर्ज
- गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना.
- गटई स्टॉल योजना
विशेष साहाय्य
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
- आम आदमी विमा योजना
सामाजिक एकात्मता
- आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
- नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य) अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
- नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन साठी वेगवेगळ्या 3 योजना राबवल्या जातात अधिक माहिती साठी – समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना
सामाजिक उपाय
- अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना
- कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसहाय्य (विजाभज)
- वसंतराव नाईक तांडा सुधार योजना
- विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
- वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद
- अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.
- नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
- स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्कार)
- या व्यतिरिक्त जवळपास 10 योजना सामाजिक उपाय मध्ये राबवल्या जातात या योजनेमद्धे प्रामुख्याने सामाजिक संस्थान (ngo ) यांना वार्षिक तत्वावर अनुदान दिले जाते अधिक माहिती साठी – समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना
पुरस्कार
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जन्म शताब्दी आणि बक्षिस वितरण (रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ व भुमीहिन शेत मंजूर व कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था सदरचा पुरस्कार दिला जातो.)
- शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना (महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते
या लेखामधून समाज कल्याण मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजना विषयी थोडक्यात माहिती देण्याचा पर्यंत केला आहे, यामधील योजनांची तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास आम्हाला कंमेंट करून कळवू शकता . आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा पर्यंत करू
हे हि वाचा
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजना समाज कल्याण विभाग २०२३
- NBMMP राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन योजनेंतर्गत मिळतंय 16000 रुपयाचे अनुदान आजच करा अर्ज
- उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई-श्रम कार्ड देऊन अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत . आजच जाणून घ्या ई-श्रम कार्ड चे फायदे
- मागेल त्याला शेततळे योजनेमधून मिळणार 75,000 हजार अनुदान ,कोण घेऊ शकतो लाभ आणि कसा करावा अर्ज संपूर्ण माहिती
- State Post-metric Scholarship For Disabled दिव्यांगासाठी राज्य पोस्ट-मेट्रिक शिष्यवृत्ती