biogas yojna बायोगॅस योजना मधून मिळत आहे १ ६ ० ० ० हजाराचे अनुदान आजच करा अर्ज

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्या साठी अतिशय उपयुक्त योजना घेऊन आलो आहोत हि योजना फक्त तुम्हाला आर्थिक लाभच देणार नाही तर तुमच्या घरातील खूप मोठी समस्या सोडवेल त्याच बरोबर तुमची मोठी आर्थिक  बचत सुद्धा होणार आहे कारण एकाच योजनेमधून  शेतकरी बांधवांचे अनेक  फायदे कसे होतील याचा सर्वस्वी विचार करून केंद्र शासनाने या योजना बनवली आहे .  तर ती योजना आहे बायोगॅस योजना ज्याला शासकीय भाषेत राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन योजना सुद्धा म्हणतात.

जर तुम्हाला कुणी म्हणलं कि एक वस्तू विकत घ्या. घेतलेल्या वस्तू वर तुम्हला ५ ०  टक्के ऑफर/ अनुदान आहे. त्या घेतलेल्या वस्तूचा वापर करून तुम्ही ३ वेगवेगळ्या वस्तू तयार करून तुम्ही त्यापासून पैसे कमवू शकता तुम्हाला असं वाटेल .  होय मी याच योजनेच्या अनुशंगाने हे उदाहरण देत आहेत. या केंद्र शासनाच्या योजनेमधून तुम्हाला एक बायोगॅस प्लांट मिळणार आहे त्या प्लांट विकत घेण्यासाठी लागणारे पैसापैकी ५ ०  टक्के पैसे शासन तुम्हला वापस देईल. त्या बायोगॅस पासून तुम्ही घरगुती गॅस तयार करू शकता .  परिणामी तुम्हाला गॅस विकत घ्यायची गरज नाही.सोबत बायोगॅस प्लांट मुळें खत आणि स्लरी निर्मिती होईल त्याचा वापर शेतकरी आपल्या घेतात करू शकतो सोबत जास्त प्रमाणात उत्पादन झाल्यास ते इतर शेतकऱ्यांना विकू शकतो. त्यामधून सुद्धा शेतकऱ्याला आर्थिक मोबदला मिळतो .

राष्ट्रीय बायोगॅस  व खत व्यवस्थापन कार्यक्रम हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्यात बायोगॅस प्रौद्योगिकीचा वापर करून जैविक खताचे उत्पादन करण्याचे आणि ते उत्पादित खतांच्या निर्मितीसाठीचे प्रक्रियांचे व्यवस्थापन केले जाते.या विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सण 1982 ते 83 पासून झाली असून ही योजना केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांमध्ये समाविष्ट आहे. 

बायोगॅस योजना
बायोगॅस योजना
 

राष्ट्रीय बायोगॅस योजनेचे उद्देश Purpose 

  1.  ग्रामीण भागातील बायोगॅस यंत्र उभारून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रिय खताची निर्मिती करणे. 
  2.  ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी  बायोगॅस यंत्राच्या सहाय्याने शौचालयाशी जोडणी करून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करणे. 

 योजनेची वैशिष्ट्ये Features of the scheme

या कार्यक्रमाचा मुख्य उद्दीष्ट भारतातील जैविक खत आणि बायोगॅसचे उत्पादन करणे, सोबत त्यामध्ये सुधारणा करणे, आणि त्यांचा वापर करून पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देणे व घरगुती गॅस चा खर्च कमी करण्याचा पर्यन्त करणे

  1.  केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना
  2. टक्के केंद्र पुरस्कृत योजना 
  3.  उभारणीनंतर 5 वर्षे देखभाल दुरुस्तीचां खर्च यंत्रणेमार्फत.
  4.  बायोगॅस यंत्राच्या माध्यमातून घरातील स्वयंपाकासाठी घरगुती गॅसचा निर्मिती होते. 
  5.  ग्रामीण भागातील स्त्रियांचे धुरापासून  सुटका होते. .
  6.  बायोगॅस वापर केल्याने निर्माण होणाऱ्या शेणखताचा वापर शेतीसाठी करून रासायनिक खताचा वापर कमी.
  7.  होतो साहजिकच शेतकऱ्यांचा होणाऱ्या रासायनिक खतावरचा खर्च कमी होतो

राष्ट्रीय बायोगॅस योजनांतर्गत मिळणार आर्थिक अनुदान 

  1. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 12000/- प्रति संयंत्र  
  2. अनुसूचित जाती व जमातीसाठी रुपये 13000 रुपये प्रति संयंत्र. 
  3.  स्वच्छालय ची जोडणी केल्यास प्रति 1600/- संयंत्र  अधिक. 
या अनुदानामुळे काळानुरूप बदल होऊ शकतो आणि ही रक्कम प्रति सयंत्र वाढू शकते अधिक माहितीसाठी तालुका गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

बायोगॅस योजना मुख्य प्रकार

  • घरगुती बायोगॅसची निर्मिती :- घरगुती बायोगॅस ची निर्मिती करून घरगुती इंधनावरील खर्च कमी करणे .
  • खत निर्माण :- बायोगॅस द्वारे खताचे उत्पादन करून, उत्पादित खताचा चा वापर शेतीसाठी करणे , सोबत अधिक उत्पादित खतापासून आर्थिक उत्पादनावर भर देणे. 
  • प्रशिक्षण आणि शिक्षण :- बायोगॅस आणि जैविक च्या उत्पादनासाठी ग्रामीण भागातील युवक आणि शेतकरी वर्गाला प्रशिक्षित करून त्यांना कौशल्य विकासात भर घालणे

बायोगॅस योजना महत्त्व:

राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमाला अनेक सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेमुळे महत्त्व आहे:

  • पर्यावरणीय फायदे :- बायोगॅस तंत्रज्ञान आणि जैव खते यांच्या वापरास प्रोत्साहन देऊन, कार्यक्रम पर्यावरण संवर्धन, कचरा कमी करणे आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतो. बायोगॅस उत्पादनामुळे सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनातून मिथेन या शक्तिशाली हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते.
  • ग्रामीण विकास :- कार्यक्रम बायोगॅस संयंत्रांच्या स्थापनेद्वारे आणि ऑपरेशनद्वारे उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जीवनमान वाढवतो. हे बायोगॅस बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल यांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण होते.
  • ऊर्जा सुरक्षा :- बायोगॅस तंत्रज्ञान स्वयंपाक आणि पाणी गरम करण्याच्या उद्देशाने सरपण आणि शेण यासारख्या पारंपारिक बायोमास इंधनावरील अवलंबित्व कमी करते. स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा स्त्रोतांमध्ये प्रवेश प्रदान करून, कार्यक्रम ऊर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देतो आणि ग्रामीण कुटुंबांसाठी जीवनमान सुधारतो.
  • शाश्वत शेती :- जैव खतांचे उत्पादन आणि वापरामुळे मातीचे आरोग्य, सुपीकता आणि पीक उत्पादकता सुधारते, शाश्वत कृषी पद्धतींना चालना मिळते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. जैव खते मातीची जैवविविधता आणि परिसंस्था सेवा पुनर्संचयित करण्यासाठी देखील योगदान देतात.

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.  

  1.  भारताच्या नावे शेतीचा सातबारा व नमुना नंबर आठ अ चा उतारा. 
  2.  जर लाभार्थी भूमिहीन शेतमजूर असल्यास तलाठ्याचा दाखला. 
  3. लाभार्थ्यांनी स्वखर्चाने पूर्ण केलेल्या यंत्रासह फोटो.
  4.  ग्रामसेवकांचां दाखला ज्यामध्ये 5 ते 6  पाळीव जनावर   लाभार्थ्यांकडे आहेत आणि त्यांनी स्वखर्चाने  बायोगॅस सयंत्र बधल्याचा अर्ज  पंचायत समितीमध्ये दाखल करावा. राष्ट्रीय बायोगॅस योजना
  5.  सदरील अर्ज गट विकास अधिकारी यांचे नावे विहित नमुन्यात अर्ज करणे गरजेचे आहे.
  6.  विहित नमुन्याचा अर्ज आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात मिळून जाईल. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कोणाला संपर्क साधू शकतो. 

  1.  जिल्हास्तरावर – कृषी विकास अधिकारी
  2.  तालुका स्तरावर – गटविकास अधिकारी /कृषी अधिकारी/ विस्तार अधिकारी (कृषी) 
  3. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या website वर जाऊन माहिती पाहू शकता राष्ट्रीय बायोगॅस योजना
 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून बायोगॅस योजना व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top