सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प २०२४ साधार केला आहे यामध्ये विविध योजनाचा त्यांनी अंमलबजावणी केली आहे शेतकरी, महिला ,व सर्यांवसामान नागरिकाला त्याचा लाभ मिळणार आहे यामधील एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना majhi ladki bahin yojana घोषणा केली आहे. मध्यप्रदेश च्या धर्तीवर या योजनेची रचना आहे मध्यप्रदेश मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लाडली बहेना योजना सुरु केली होती.
महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील समबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 60 टक्के व स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे ही महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील समबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 60 टक्के व स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेने खूप कमी असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर मोठा परिणाम होत आहे सदर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने आज दिनांक 28 मे 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली.
माझी लाडकी बहिण योजना व अमलबजावणी
- महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंब बनवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य शासन देणार
- 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात येईल.”
माझी लाडकी बहिण योजना उद्दिष्ट:
- 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण आणि सामाजिक सुरक्षा करणे.
- महिलांमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करणे.
- महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे.
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे
- त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे
- राज्यातील महिलांना व मुलींना शक्ती करना चालना देणे पाच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्याने पोषण स्थिती सुधारणा घडून आणणे
माझी लाडकी बहिण योजना लाभ :
- पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत.
- गरजू महिलांसाठी कौशल्य विकास आणि शिक्षणासाठी मदत.
- महिलांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी.
माझी लाडकी बहिण योजना पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्रा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे.
- कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 पेक्षा कमी असणे.
- राज्यातील विवाहित , विधवा , घटस्फोटीत , परितक्त्या आणि निराधार महिला
- सदर योजनेंतर्गत लाभ घेन्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- इतर कोणत्याही सरकारी आर्थिक मदत योजनेचा लाभ घेत नसणे.
माझी लाडकी बहिण योजना अपात्र कोण ?
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रितवार्षिक उत्पन्न रुपये 2.५ लाखापेक्षा जास्त आहे.
- जांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतो.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /मंडळ / केद्र शासन किंवा राज्य
- शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्त झाले आहेत.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / मंडळ आणि उपक्रम मध्ये अध्यक्ष , संचालक किंवा सदस्य आहेत.
- जांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ( ट्रक्टर वगळून ) त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंद आहे.वरील सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना majhi ladki bahin yojana साठी अपात्र असतील याची सर्वांनी नोद घावी.
माझी लाडकी बहिण योजना लाभ घेण्यसाठी कागदपत्र
1. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल
2. लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
3. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे
4. समक्ष प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
5. बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानावर छायांकित लाभार्थ्याचा फोटो असणे आवश्यक आहे सोबत त्याखाली सही सुद्धा
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
7. राशन कार्ड
8. वरील दिलेल्या सर्व अटी शर्ती पात्रता अपात्रता याचे पालन केले करण्याबाबतची हमीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे .
माझी लाडकी बहिण योजना अर्ज कसा करावा
सद्यस्थिती महाराष्ट्र शासनामार्फत कोणत्याही अधिकृंत वेबसाईट ची माहिती दिली गेली नाही परंतु ज्या राज्याच्या धर्तीवर हि योजना सुरु करण्यात येत आहे त्या राज्याने म्हणजेच मध्य प्रदेश यांनी महिला व बाल कल्याण विभागाच्या वेबसाईट वर माहिती प्रकाशित करून त्याच वेबसाईट वर अर्ज करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा पुढील महिन्यात या विषयी अधिक माहिती मिळेल सोबत अधिकृंत वेबसाईट सुद्धा प्रकाशित केल्या जाईल. सध्या अधिक माहिती साठी तुम्ही पुढील वेबसाईट जाऊन माहिती पाहू शकता.
- ऑनलाईन अर्ज : majhi ladki bahin yojana https://mahasupport.in/
- ऑफलाईन अर्ज : जवळच्या लोकसेवा केंद्रातून.
- कार्यक्षेत्र 1. लाभार्थाचे अर्ज स्वीकारणे
2. अर्जाची तपासणी करणे
३. ऑनलाईन पोर्टल वर चढवणे 1. अर्जाची पडताळणी करणे
2. पुढील अधिकाऱ्याकडे पाठवणे अंतिम मंजूरी देणे
/अर्ज मान्यता देणे ग्रामीण भाग 1. आगणंवाडी सेविका
2. आगणंवाडी सुपरवायझर
३. सेतू सुविधा केंद्र
4. ग्राम पंचायत / ग्रामसेवक जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी जिल्हाधिकारी व यांच्या अध्यक्षतेखालील समिती शहरी भाग 1. आगणंवाडी सेविका
2. आगणंवाडी सुपरवायझर
३. सेतू सुविधा केंद्र
4. वार्ड अधिकारी
मध्यप्रदेश मधील लाडली बेहना योजना काय आहे ?
लाडली बेह्मना योजना गोवामधील लाडली लक्ष्मी योजनेला विचारात घेऊन बनवली होती . मध्या प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी २०२३ मध्ये लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमधील गरीब महिलांना सरकारतर्फे रुपय१२५० ची आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेश मधील महिलांकडून प्रसिद्धी मिळाली. याच योजनेच्या आधारावर शिवराजसिंह यांनी मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक बहुमतात जिंकली. लाभ मिळालेल्या महिलांची मते त्यांना मिळून त्यांनी निडणूक जिंकली.याचाच उदेश ठेऊन महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणूक तोंडावर असताना या योजनेची घोषणा केली
अर्थसंकल्प मधील महत्वाची मुद्दे
- मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण majhi ladki bahin yojana योजनेची घोषणालाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीडहजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
- मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिकदुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ
- स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्रकुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
- पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरितप्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार
- शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार
- गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील
- कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार
अर्थसंकल वितीय वर्ष २०२४-२०२५ PDF
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून majhi ladki bahin yojana महिलांना मिळणार महिन्याला 1500 रुपये शासनाची आली नवीन योजना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- ayushman bharat yojna आयुष्मान भारत योजनेमधून मिळवा ५ लाखाचा मोफत विलाज ,कस कळेल कि आपलं नाव यादीत आहे कि नाही
- इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना.indira gandhi rashtriya vidhwa pension yojana
- PMSMA काय आहे ? आणि ह्या उपक्रमा अंतर्गत आपण कसा घेऊ शकाल सर्व दवाखाण्यात मोफत विलाज …….
- आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
- महाज्योती mahajyoti अंतर्गत मिळणार मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ