Prdhan mantri awas yojan registration घरकुल योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख, पात्रता आणि अर्जप्रकिया व लिंक 

माहिती आवडल्यास शेअर करा.

Pradhan Mantri Awas Yojana Online Registration : लाभार्थी निवड त्याच्या उत्पन्नाच्या आधारावर , आरक्षण आणि सध्याची घराची स्थिती जर तुमच्या कडे स्वतःचे पक्के घर जर नसेल असेल तरी तिम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुलचा लाभ घेण्यास पात्र आहात.

प्रधानमंत्री आवास योजना ही सध्याच्या सरकारची falgahip योजना असून या योजनेच्या मार्फत देशातील आणि राज्यातील पात्र लाभार्थ्यास स्वतःचे पक्के घर बाधण्यासाठी सरकार मार्फत आर्थिक मदत दिल्या जाते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील (BPL)  कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत खाली Pradhan Mantri Awas Yojana Online Registration विषयी माहिती दिली आहे सोबतच ग्रामीण आणि शहरी भागात राहण्याऱ्या कुटुंबाची पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख डिसेंबर २०२५

Pradhan Mantri Awas Yojana Online Registration करण्याची शेवटची तारीख वाढून ती आता डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रधानमंत्री आवस योजनेचा लाभ घेण्यासाठी हीच नवीन updated तारीख असल्याचे शासनामार्फत सांगण्यात आले आहे. जर तुम्ही या अगोदरच अर्ज केला असेल तर काळजी करायची गरज नाही , शासनाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती अतिशय सहज तुमच्या घरी बसून चेक करू शकता. 

काय आहे प्रधानमंत्री आवास योजना 

केद्र सरकार मार्फत राबवली जाणारी योजना असून या योजेनेअंतर्गत लाभार्थीस आपले हक्काचे घर उभारण्यासाठी ग्रामीण भागातील लाभार्थी लाभ 1लाख25हजार व शहरीभागातील लाभार्थ्यांन 2 लाख 50 हजार रुपये प्रत्येकी ३ टप्यात लाभ मिळतो.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय  लागते आणि नेमकी नोदणी कशी करावी याविषयी खाली माहिती दिली आहे. 

पात्रता PMAY 

PMAY प्रधानमंत्री आवास योजना चा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, जातीचा प्रवर्ग आणि सध्याचे घर व राहण्याची स्थिती हे काही महत्वाचे पात्रता निकष आहे की ज्यावरून लाभार्थी निवडताना सरकारच्या विभागांर्फत विचार केला जातो.

PMAY लाभार्थी ग्रामीण भागातील पात्रता 

  • लाभार्थ्याची निवड करताना खालील निकष शासन स्तरावर महत्वाचे असतील जे लाभार्थ्याची निवड करताना प्रधान्य देण्यात येईल. 
  • लाभार्थी यादी तयार करताना सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना २०११ डेटा चा आधार घेऊन तयार करण्यात येईल. 
  • ज्या कुटुंबाकडे स्वतःचे घर नाही 
  • कुटुंबाकडे घर आहे पण ते घर पक्के नाही 
  • नवीन नियमानुसार खालील ग्रामीण भागातील खालील कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. 
  • ज्या कुटुंबाकडे स्वतःचे पक्के आहे 
  • ज्या कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची मोटार सायकल किंवा तीन चाकी गाडी किंवा चार चाकी गाडी आहे असे कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत 
  • ज्या कुटुंबाकडे तीन चाकी किंवा चार चाकी शेती साठी उपयोगी गाडी आहे असे ग्रामीण भागातील कुटुंब लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत. 
  • ज्या कुटुंबाकडे किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब 
  • सरकारी क्रमचारी 
  • जे कुटुंब आयकर भरतात 
  • ज्या कुटुंबाकडे फ्रीज आहे ते कुटुंब 
  • २.५ एकर किंवा त्यापेक्षा जास्त बागायती शेती असलेली कुटुंबे 
  • ५ एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती आणि वार्षिक २ उत्पन्न घेणारे शेतकरी 

PMAY लाभार्थी शहरी भागातील पात्रता 

  • ज्या कुटुंब आर्थिक मागास EWS प्रवर्गात येतात आणि ज्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाखाच्या आत आहे असे कुटुंब पात्र आहेत.
  • जे कमी उत्पन्न असलेल्या गटात येतात आणि ज्यांचे उत्पन्न ३ ते ६ लाखाच्या दरम्यान आहे आणि भारतात कुठेच त्याचे घर नाही असे सर्व कुटुंब पात्र आहेत. 
  • जे नोडणीकृत झोपडपट्टी वस्तीत राहतात ते सर्व कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. 

कागदपत्रे कोणते आवश्यक आहेत 

ग्रामीण भाग शहरी भाग 
आधार कार्ड कुटुंबातील सर्व सदस्य आधार कार्ड कुटुंबातील सर्व सदस्य 
MGNREGA JOB CARD आधारकार्ड सी लिंक असलेले बँक खाते 
बँक खात्याचे तपशील उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
स्वछ भारत मिशन नंबर स्वतःच्या मालकीची जागा असल्याचे प्रमाणपत्र 
स्वतःचे घर नसल्याचे affidavit/हमीपत्र अर्ज 
अर्ज 

हे हि वाचा !

सारथी योजनेद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी संधी!

राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य | स्पर्धा परीक्षा उपयुक्त माहिती

सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना काय आहे! sovereign gold bond scheme

शेवगा लागवड कशी करावी? जाणून घ्या अल्पभांडवलात जास्त नफा देणारे पीक!


माहिती आवडल्यास शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top