आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या आवडीच्या नोकरीसाठी ,शिक्षणासाठी धडपडणारे खूप तरुण दिसतात.घरची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना रोजगारासाठी व शिक्षणासाठी लागणारी कौशल्य आत्मसात करता येत नाहीत. युवक /युवतींची ही परिस्तिती पाहून महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती mahajyoti स्वायत्त संस्थेतर्फे इतर मागासवर्गीय ,विमुक्त जाती ,व भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील युवक युवतीन अनिवासी व निवासी कौशल विकास प्रशिक्षण योजना 8 ऑगस्ट 2019 ला सुरू केली. ही योजना बेरोजगार युवकाना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात या य कौशल्य प्रदान करण्यासाठी व त्यांची रोजगार क्षमता सुधारण्यासाठी सुरू केली महाज्योती mahajyoti योजनेसंबंधी पूर्ण माहिती आपल्याला येथे मिळेल. योजनेची उदिष्टे ,पात्रता ,अर्ज कसं करावा ,योजनेचे फायदे ,आणि अर्ज करव्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती आपण आपण पाहू.
महाज्योती काय आहे ?
महा ज्योति चे पूर्ण नाम महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण आणि संशोधन केद्र (Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute ) असून ते नागपूर येते स्थित आहे याची सुरुवात 8 ऑगस्ट 2019 रोजी सुरुवात झाली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (OBC),विमुक्त जाती ,भटक्या जमाती ,आणि विशेष मागासवर्गीय वर्गातील बेरोजगार तरुणांना यायोजनेअंतर्गत महाज्योती अंतर्गत येणाऱ्या नामांकित प्रशिक्षण संस्थातर्फे प्रशिक्षण तांत्रिक व गैरतंत्रीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल जातो.
हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तरुण /तरुणीनां महाज्योती रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते तसेच व्यवसायासाठी बँक किंवा इतर वितिय संस्थेकडून कर्ज माफक दरात उपलब्ध करून देते.
उदिष्टे :
- महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (OBC),विमुक्त जाती ,भटक्या जमाती ,आणि विशेष मागासवर्गीय वर्ग तसेच शासनाने कीव महाज्योतीने लक्षित केलेल्या वर्गांच्या सामाजिक,शैक्षणिक,व आर्थिक विकसांशी संबंधित समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपयोजन तयार करणे
- प्रमुख संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणून काम करत आसतान लक्षित गटांसाठी शैक्षणिक ,आर्थिक,आणि सांस्कृतिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे.
- कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगार, स्वयंरोजगार, औद्योगिक घटकांची उभारणी व विकास यासाठी क्षमता निर्मित करणे, विविध सर्वेक्षण व संशोधन करुन एक डाटा बॅंक, ग्रंथालये, ज्ञान बॅंक (knowledge bank) विविध क्षेत्रातील अभ्यास व समन्वय मंडळे स्थापन करणे, ते विकसित करणे, त्याची देखरेख करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
- राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक स्वभावाचा प्रचार करणे. त्याकरिता बंधुता, जातीय सलोखा आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे. स्वच्छता, सत्यशोधक विवाह, व्यसनमुक्ती, आणि पर्यावरणाबद्दल जागृकता निर्माण करणे.
- व्यक्तिमत्त्व विकास, नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा, उद्योग, व्यवसाय इत्यादींसाठी प्रशिक्षण, कोचिंग इ. प्रदान करणे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टायपेंड, शिष्यवृत्ती, फेलोशिप अनुदान देणे. लक्ष्य गटांची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही करणे.
महाज्योती वैशिष्ट्य काय आहेत ?
महाज्योति कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत अनेक रोजगाराच्या संधि उपलब्ध करून देते
- विनामूल्य प्रशिक्षण :पात्र विद्यार्थ्यांसाठी महाज्योती तर्फे सर्व प्रशिक्षण संबंधी खर्च ,शिकवणी ,अभ्यासाचे साहित्य यांचा खर्च विणामूल्य केला जातो
- मोफत निवास : प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षन कालावधीत मोफत निवास आणि जेवणनाची व्यवस्था प्रशिक्षण केंद्रात देतात . ज्यामध्ये सकाळी नाश्ता ,दुपारी जेवण ,रात्री जेवण दिले जाते ज्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यासवर लक्ष केंद्रित करता येते
- प्रशिक्षण भत्ता :प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थणा दर महिना1000/-रुपायपर्यंत भत्ता दिल जातो
- रोजगार :प्रशिक्षण संपल्यावर प्रशिक्षणार्थीना त्यांच्या प्रशिक्षण आधारित रोजगार मिळण्यास मदत केली जाते. तथापि हे स्पष्टपणे वचन दिलेले नाही
- दर्जेदार प्रशिक्षण :महाज्योती हे उत्तम प्रशिक्षण पुरवण्यावर भर देते सहभागी न त्यांच्या रोजगरशी सुसंगत होण्यासाठी त्यांच्या उत्तम शिक्षण मिळेल यावर भर देते.
महाज्योती कौशल योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?
- इतर मागासवर्गीय गट (ओबीसी )
- अनुसूचित जाती (एसटी )
- मागास मानून वर्गीकृत परंतु एसटी व एससी मध्ये न येणारे समुदाय -विशेष मागासवर्गीय वर्ग( SBCs)
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत आसलेले नोन क्रिमीलायर कुटुंबातील विभाग (EWS)
- सद्यस्थितीमद्धे महाज्योती मार्फत राबवले जाणारे प्रशिक्षण : महाज्योती
माहाज्योती ची पात्रता
- प्रशिक्षणार्थी हा महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (OBC),विमुक्त जाती ,भटक्या जमाती ,आणि विशेष मागासवर्गीय वर्गातील आसावा
- त्याचे वय 18 ते 45 च्या दरम्यान आसले पाहिजे
- निवडलेल्या अभ्यासक्रमामद्धे निर्दिष्ट केल्याप्रमाणे त्याची शैक्षणिक पात्रता आसली पाहिजे
- आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी
- अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी आसावा
- अर्जदाराणे पूर्वी कौशल्य विकास योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अर्ज कसा दाखल करावा ?
- अर्ज भरण्यासाठी अर्जदारला प्रथम https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट ला भेट द्यावी
- मुख्य पृष्ठावर कौशल्य सुधारणावर क्लिक करावे आता तुम्हाला समोर कौशल्य विकास कार्यक्रम नोंदणी अर्ज दिसेल त्यावर क्लिक करावे
- महाज्योती प्रशिक्षण आरज आता तुमच्या समोर दिसेल त्यात दिलेली माहिती अचूक भरून तो सबमीट करावा
- तुम्ही ऑफलाइन अर्जही करू शकता ऑफलाइन अर्ज तुम्हाला तुमच्या शहरातील महाज्योती प्रशिक्षण कार्यालयात मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ई – मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जात प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र (शालेय प्रमाणपत्र)
- बँक खाते तपशील.
- नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
शासकीय वेबसाइट official Webiste
- पुढील लिंक ही महाज्योती ची शासकीय वेबसाइट असून त्या वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. लिंक
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महाज्योती mahajyoti अंतर्गत मिळणार मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- कमवा आणि शिका योजना कोणी सुरू केली ?
- बॉक्स-ऑफिस वर धुमाकूळ घालायला पुन्हा आला अल्लू अर्जुन चा धमाकेबाज चित्रपट.
- Mother Name Mandatory in Maharashtra आईचं नाव बंधनकारक आता सगळी कागदपत्र नव्याने काढावे लागणार..
- ayushman bharat yojna आयुष्मान भारत योजनेमधून मिळवा ५ लाखाचा मोफत विलाज ,कस कळेल कि आपलं नाव यादीत आहे कि नाही
- निरोगी राहायचा कानमंत्र , राहाल सर्व आजारापासून दूर Tips for Staying Healthy