आज भारतासह सर्व जगात मुलींची संख्या लक्षात घेता लिंग समानता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, यासाठी सरकार स्त्री अस्तित्व टिकवण्यासाठी पाऊले उचलत आहे स्त्रियांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रसार्कारणे खूप काही योजना सुरु केल्या आहेत .अशीच लेक लाडकी योजना सारखे उपक्रम आशा आणि प्रगतीचे किरण म्हणून उभे आहेत. भारतातील मुलींचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना मुलीना आर्थिक सुरक्षा आणि संधी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते.जे आधी स्त्रियांच्या विरोधात होते. चला या प्रभावशाली कार्यक्रमाचे तपशील जाणून घेऊ आणि त्याची उद्दिष्टे, अंमलबजावणी आणि परिणाम समजून घेऊ.
लेक लाडकी योजनाची सुरुवात
- लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील मुलींचे सशक्तीकरण आणि कल्याण करण्यासाठी राबवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली
- याचा उद्देश मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि समाजातील समान सहभागाला प्रोत्साहन देणे आहे
- मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी योजना या नावाने नवीन योजना सुरु केली आहे.
- १८ नोव्हेबर सुधारित ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी या नावाने नवीन योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
योजनेचे लाभ:
शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या मुलीच्या हप्त्यासाठी व दुसऱ्या मुलीच्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- आर्थिक मदत: या योजनेअंतर्गत,पिवळ्या व केशरी रेशनकाड धारक असलेल्या लाभार्थी मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आर्थिक मदत प्रदान केली जाते.ते टप्पे सविस्तर तक्त्यात दर्शिवले आहेत.
- शिक्षणासाठी प्रोत्साहन: मुलींच्या शिक्षणावर भर देण्यासाठी, योजना अनेक प्रोत्साहने देते जसे की या योजनेंअंतर्गत पात्र मुलीला शाळेतील शुल्कात सवलत मिळेल व या योजनेंअंतर्गत पात्र मुलीला विद्यापीठ शुल्क सवलत मिळेल.तसेच शैक्षणिक साहित्य व अभ्यासक्रम पाठ्यपुस्तके यामध्ये सवलत आणि स्पर्धा परीक्षामध्ये प्रशिक्षण वर्ग मिळेल
- आरोग्य सुविधा: या योजनेत मुलींसाठी मोफत आरोग्य सुविधांचा समावेश आहे जसे की:नियमित आरोग्य तपासणीलसीकरण,मोफत औषधे
- कौशल्य विकास: मुलींना आत्मनिर्भर बनण्यास मदत करण्यासाठी, योजना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीच्या संधी प्रदान करते.
- समाजात जागरूकता: मुलींच्या हक्क आणि संधींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी योजना प्रयत्नशील आहे.
पात्रता:
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 पर्यंत मर्यादित असावे.
- जन्मलेली मुलगी ही कुटुंबातील पहिली किंवा दुसरी मुलगी असावी.
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे या योजेनेसाठी अर्ज करायचा आहे
- या योजनेसाठी तुम्ही महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयातून हि अर्ज फॉर्म घेऊन , आवश्यक ती माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.
- अर्जाचा नमुना तुम्हाला खालच्या शीटमध्ये दिसेल याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे.
- यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.
अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे.त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे.
ऑनलाईन
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजना या वेबसाइटला भेट द्या
- तिथे लेक लाडकी या बटनावर क्लिक करून तेथ अर्जाचा फोर्मेट उघडेल त्यावर तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते टाकायचे आहे
- योग्य ती माहिती टाकून अर्ज सबमिट करा.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
- लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
- पालकाचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत),
- मतदान ओळखपत्र
- शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र