वनरक्षक विभागामार्फत वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 जाहीर झाली असून एकूण पदे, शैक्षणिक पात्रता|अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे Vanrakshak Bharti 2025

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 – महाराष्ट्र राज्यातील सरळ सेवा परीक्षा ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र वन विभागामार्फत संपूर्ण राज्यात वनरक्षक भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण जिल्हा निहाय 12,991 पदे असून त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल , अर्ज कसा करावा व आवश्यक कागदपत्रे कोणते असतील त्यामुळे राज्यातील इच्छुक उमेदवारांनी लगेच तयारी चाली करावी खाली वन विभागाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा दिला आहे.

Vanrakshak Bharti 2025
Vanrakshak Bharti 2025

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025

महाराष्ट्र वन विभाग ही महाराष्ट्र, भारत राज्यातील जंगल व वन्यजीवांचे व्यवस्थापन, संरक्षण आणि संवर्धनासाठी जबाबदार सरकारी संस्था आहे. त्याची स्थापना 1960 मध्ये झाली होती आणि त्याचे मुख्यालय नागपूरमध्ये असून वनविभाग महाराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे. या वनविभागा मार्फत मोठी नोकरी जाहिरात प्रकाशित होणार असून

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 एकूण पदे12,991 पदे
शैक्षणिक पात्रतावनरक्षक पदासाठी 12 पास तर इतर पदासाठी 10 वी पास
पदाचा प्रकारवनरक्षक , शिपाई , मदतनीस , सफाई कामगार , रखवालदार ,प्रिंटर ऑपरेटर
मासिक वेतन श्रेणी21,700 ते 69,100 मासिक

Vanrakshak Bharti 2025 जिल्हा निहाय पदे

राज्यात एकूण 12991 पदाची जाहिरात प्रकाशित होणार आहे तर या पदाची जिल्हानिहाय यादी खाली दिली आहे.

जिल्ह्याची नावेजिल्हानिहाय पदे
छत्रपती संभाजी नगर1535
नाशिक887
नागपूर1852
चंद्रपूर845
गडचिरोली1423
अमरावती1188
यवतमाळ665
पुणे811
कोल्हापूर1286
धुळे931
ठाणे1568
एकूण पदे12991

विभागनिहाय पदाची विचार केला असता नागपूर विभागात सर्वाधिक पदे 1852 , त्याखालोखाल ठाणे विभाग 1586 , छत्रपती संभाजीनगर 1535 आणि नाशिक विभागामध्ये 888 पदे भरणार असल्याचे वन विभागामार्फत प्रकाशित gr मध्ये माहिती दिली आहे. लवकर अर्ज प्रकिया चालू होणार असून राज्यातील तरुण आणि इच्छुक उमेदवारांनी तत्काल तयारी चालू करावे. जेणेकरून ग्राउंड आणि लेखी परीक्षा चांगला अभ्यास होईल.

  • शारीरिक चाचणी पात्रता
    • पुरुष – 5 किलोमीटर धावणे
    • महिला – 3 किलोमीटर धावणे
    • अर्जदार उमेदवारांनी शारीरिक चाचणीची चांगला सराव करणे अत्यंत गरजचे आहे करणे आवश्यक आहे कारण शारीरिक चाचणी जून महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळी राज्यात सर्वाधिक उन्हाची पातळी असते तर धावण्याची चांगला सराव केलेलेच उमेदवार चाचणीमध्ये टिकू शकतील.
  • लेखी परीक्षा
    • वनरक्षक (Forest Guard) लेखी परीक्षेचा नमुना खालीलप्रमाणे असतो:
    • परीक्षेचा प्रकार: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions – MCQs)
    • विषय: साधारणपणे खालील विषयांचा समावेश असतो:
    • मराठी भाषा:
      • मराठी व्याकरण (शब्दार्थ, वाक्यरचना, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार)
      • मराठी साहित्य व लेखक (प्रसिद्ध पुस्तके व लेखक)
      • उतारा वाचन आणि आकलन
    • इंग्रजी भाषा:
      • इंग्रजी व्याकरण (Vocabulary, Grammar, Sentence Structure, Synonyms, Antonyms, Idioms and Phrases)
      • Comprehension (उतारा वाचन आणि आकलन)
    • सामान्य ज्ञान:
      • महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था
      • भारताचा इतिहास, भूगोल आणि अर्थव्यवस्था
      • चालू घडामोडी (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय)
      • पर्यावरण आणि वन्यजीव संबंधित सामान्य ज्ञान
      • सामान्य विज्ञान
    • बौद्धिक चाचणी / गणित आणि बुद्धिमत्ता:
      • अंकगणित (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण)
      • बुद्धिमत्ता चाचणी (Verbal and Non-Verbal Reasoning, Analogy, Series, Coding-Decoding)

अर्ज प्रकिया

  • संपूर्ण अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल सोबत परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने राबवण्याची दाट शक्यता आहे आणि TCS किंवा IBPS यांच्या मार्फत घेऊ शकतात.

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “वनरक्षक विभागामार्फत वनरक्षक भरती महाराष्ट्र 2025 जाहीर झाली असून एकूण पदे, शैक्षणिक पात्रता|अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे Vanrakshak Bharti 2025 व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

सर्वाधिक वाचलेले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top