महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. आतापर्यंत ९ हप्ते बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि सर्व महिला लाभार्थी दहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ला लेखातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा कधी हफ्ता भेटणार | योजनेबाबत मोठी अपडेट आली याविषयी माहिती पाहणार आहोत.

Maharashtra Mukhyamantri mazi ladaki bahin yojana महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती शासनामार्फत देण्यात आली असून दहाव्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये अत्यंत उत्सुकता वाढली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्रित देण्यात आले होते, ज्यामुळे महिलांना एकाच वेळी दोन महिन्याचे ३,००० रुपये बँक खात्यात मिळाले होते. आता सर्वांच्या नजरा एप्रिल महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्यावर आहेत. खालील दिलेल्या लेखात एप्रिल महिन्याचा हफ्ता नेमका कधी मिळणार आहे याविषयी माहिती दिली आहे .
अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय आणि शासनाने त्यांना किती टक्के आरक्षण मंजूर केले आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि महाराष्ट्र सरकार जुलै २०२४ मध्ये माँ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळात चालू करण्यात आलेली योजना असून जी गोवा आणि मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर चालू करण्यात आली आहे. दोन्ही राज्यामध्ये या योजनेला महिला वर्गाकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुढील निवडणुकीत त्यांना चांगले मते मिळाली याचा विचार करून महायुती सरकार ने हि योजना महाराष्ट्र राज्य लागू केली आणि त्याचा फायदा निवडणुकीतून दिसून आला. सरकार मार्फत योजना सुरुवात झाली तेव्हा पासून मार्च महिन्यापर्यत ९ हफ्ते देण्यात आले आहेत आता १ ० म्हणजे एप्रिल महिन्यात मिळणाऱ्या हफ्त्याची वाट महिला मंडळ पाहत आहे.
रेशन कार्ड नवीन काढणे|आपल्या कुटुंबातील लहान मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे जोडावे|आवश्यक आहे फक्त हे 5 कागदपत्रे
योजनेबाबत मोठी अपडेट
याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’ अप्प वर पोस्ट करत म्हटले होते की, ही योजना महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू असून त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला म्हणजे ज्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण केले आहेत अश्या महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (mukhyamantri mazi ladki bahin Yojna) मधून मिळणार हफ्ता बंद होतो.आणि आता हे दर महिन्याला होणार आहे ज्यांचे 65 वर्ष पूर्ण झाले त्या महिला आपोआप योजनेमधून बाद होतील यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत राहणार आहे. राज्यात सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेमधून बाद करण्यात आल्या असून त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे, राज्यातील ज्या महिला विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या आहेत त्यांना सुद्धा या योजेनचा लाभ मिळणार नाही.
सोलर पॅनलसाठी सरकारी अनुदान आहे का?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा कधी हफ्ता भेटणार
आता एप्रिल महिना 2025 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावेळी लाभार्थी संख्या घटणार असल्याचे दिसून येत आहे.
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा कधी हफ्ता भेटणार | योजनेबाबत मोठी अपडेट आली व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो