तलाठी भरतीचा अर्ज कसा करावा. वाचा पूर्ण माहिती

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

तलाटी अर्ज कसा करावा

जमाबंदी आयुक्त आणि  संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून  दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दि. 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत  महाराष्ट्रतील एकुण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा  घेण्यात येईल. तर आज आपण या लेखात तलाटी अर्ज कसा करावा याविषयी माहिती पाहणार आहोत.

महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत तलाठी महाभरती चा अर्ज कसा करावा व अर्ज करताना कोणकोणत्या बाबीची काळजी घेतली पाहिजे या बाबत आपण या लेखा मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर पुढील लेख पूर्ण वाचावा जेणे करून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

तलाठी भरतीचा अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी

  •  १०१८ साली तलाठी भरती साठी महाराष्ट्र शासनाने एका विशिष्ट्य पोर्टल ची निर्मिती केली होती परंतु त्यामध्ये खूप तांत्रिक अडचणी असल्यामुळे यावर्षी २०२३ सरळ महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग म्हणजेच महाभूमी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या पोर्टल अंतर्गत भरती प्रकीर्या पार पडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या पोर्टल वर तांत्रिक अडचणी आणि घोटाळा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितल्या जात आहे.
  • महाभूमी या पोर्टल गेल्या नंतर डाव्या बाजूला  महत्वाची लिंक मध्ये सर्व विभागनिहाय तलाठी रिक्त जगाची यादी व इतर महत्वाच्या बाबीचा तपशील दिला असून अर्ज करण्यापूर्वी जिल्हा निहाय यादी तपासून व आरक्षित जागांचा विचार करून अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना महाभूमी वरती आपले प्रोफाइल  तयार करणे गरजेचे आहे त्यामध्ये पुढील प्रमाणपत्रे व कागपत्रे अपलोड करणे गरजेचे आहेत.
  • प्रोफाईल द्वारे केलेल्या विविध  दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना  खेळाडू, दिव्यांग , माजी सैनिक अनाथ तसेच प्रकंपग्रस्त,
  • भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत

विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा( SC , ST ,OBC , VGNT ,EWS ) दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर

  • check  eligibity  उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे
  • प्रमाणपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

तलाठी भरतीचा अर्ज करताना पुढील कागदपत्रे सोबत ठेवावी .

तलाठी अर्ज कसा भरावा.
  • वरील सर्व प्रमाणपत्र / कागदपत्र महाभूमी वेबसाइट प्रोफाइल  यामध्ये विहित वेळेत उपलोड करणे अनिवार्य आहे , कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा दावा करून त्या संबंधित प्रमाणपत्र अपलोड नाही केल्यास त्या अर्जचा विचार केल्या जाणार नाही किंवा. त्या उमेदवारास सामान्य उमेदवार गृहीत धरल्या जाईल म्हणून काळजी पूर्वक अर्ज करणे गरजेचा आहे.
तलाठी भरतीचा अर्ज करताना काही सर्वसाधारण सूचना.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील . त्यामुळे इतर कोणत्याही पद्धतीला बळी बंडू नये.
  • अर्ज सादर करण्याकरिता संकेतःथळ https://mahabhumi.gov.in
परीक्षा केंद्राची निवड करताना घ्यावयाची काळजी
  • अर्ज सादर करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे गरजचे आहे.
  • एकदा जिल्ह्याची निवड केल्यानंतर केंद्र बदलण्यासाठाची कोणतीही विनंती मान्य केल्या जाणार नाही.
  •  जर तुम्ही अर्ज करताना कोणत्याही जिल्हा केंद्राची निवड केली नाही तर तुमच्या कायमस्वरूपीचा पत्ता च्या आधारे महसूल कार्यालयाच्या केंद्रावर किंवा जवळच्या जिल्हाकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल. याबाबत चे सर्व निर्णय शासनाकडे असतील व शासनाचा निर्णय अंतिम राहील.
परीक्षा फीस भरताना घ्यावयाची काळजी
  • जाहिराती मध्ये नमूद केलेली फीस ऑनलाईन पद्धतीने (Credit car, Debit Card , Netbanking )  किंवा Bank Draft  मार्फत भरणा करता येईल .
  • परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्ज व इतर कर जास्तीचे असतील ते उमेदवाला द्यावे लागतील.परीक्षा फीस ना परतावा ( Non – Refundable ) आहे .

अश्या प्रकारे तलाठी भरतीचा अर्ज करताना काळजी घेतली तर तुम्हाला काही अडचण येणार नाही व अर्ज सुरळीत भरल्या जाईल.

Also Read 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top