ग्रामीण भागात बहुतेक शेतकरी कुटुंबाकडे स्वतःची शेत जमीन असते. आणि बहुतेक ग्रामीण भागातील कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती हा असतो, त्याच सोबत काही शेती पूरक व्यवसाय करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो. परंतु असे काही कुटुंब आहेत की त्याच्या कडे थोडी सुद्धा शेत जमीन नाही व त्यांना उदरनिर्वाह साठी इतर व्यवसायावर अवलंबून राहावे लागणे अश्या व्यक्तीस आपल्याकडे प्रामुख्याने भूमिहीन शेतकरी असे म्हणतात पण केद्र सरकारची नेमकी भूमिहीन म्हणजे काय यांची काय व्याख्या आहे आणि जर एखादी व्यक्ति व कुटुंब भूमिहीन असल्यास त्याचा काय फायदा आहे या विषयीचा हा लेख.
भूमिहीन म्हणजे काय bhumihin mhanje kay
भारत देशात रहिवाशी असलेल्या व्यक्ति कडे स्वतःच्या मालकीची कोठेही , कोणत्याही गावात , शहरात , राज्यात अल्प प्रमाणात किंवा मुभलक प्रमाणात जमीन नाही व त्या सदरील व्यक्तीचा संपूर्ण उदरनिर्वाह हा दुसऱ्याच्या शेतावर मंजूरी किंवा अन्य मंजूरी किंवा कोणतेही काम करून तो उदरनिर्वाह करत असेल तर त्यास भूमिहीन म्हणतात. अशी व्याख्या शासनामार्फत करण्यात आलेली असून जर तुम्ही देखील भूमिहीन आहात आणि तुम्हाला माहिती नाही की भूमिहीन असल्याचा तुम्हाला काय फायदा होईल तर हा लेख तुमच्या साठी आहे.
शेतकरी कुटुंब प्रामुख्याने शेती ह्या व्यवसायावर अवलंबून असते, त्याच काही प्रगत शेतकरी आज चांगला शेतीशी निगडीत व्यवसाय करून आपल्या नुसता उदरनिर्वाह करत नाहीयेत तर चांगले उत्पन्न सुद्धा मिळवत आहेत, शेळी पालन , दूध उत्पादन , कुकुटपळणं, यासारखे अनेक व्यवसाय करून आज शेती हा व्ययसाय चंगल्या पद्धतीने करतात अनेक शेतकरी दिसत आहेत. पण जर तुमच्या कडे शेतीच नाही तुम्ही भूमिहीन आहत तर अश्या व्यक्तीना दुसऱ्याच्या शेतीवर काम करण्याशिवाय दुसऱ्या पर्याय नाही, शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे आपल्या उदरनिर्वाह करणे खूप अवडण समस्या अनेक कुटुंबसमोर आहे, अश्या कुटुंबाना स्वाभिमानाने जगत यावे साठी केद्र आणि राज्य सरकार मार्फत काही योजना राबवल्या जातात ज्यामधून भूमिहीन शेतकरी कुटुंबास अनेक लाभ मिळतात व त्याने हक्काचे जीवन जागता येते.
भूमिहीन म्हणजे काय , भूमिहीन असल्याचा फायदा काय
ज्याचे कडे स्वतःची शेतजमीन आहे असे शेतकरी शेती करतात व ज्याच्या कडे स्वतःची शेतजमीन नाही असे व्यक्ति मोलमजुरी करतात , दुसऱ्याच्या शेतीवर मंजूर म्हणून काम करतात अश्या शेतकऱ्यांना भूमिहीन असल्याचा प्रमाणपत्र शासनामार्फत दिल्या जाते. भारतात अनेक राज्य सरकारांनी भूमिहीन शेतमजुरांसाठी विशेष योजना राबविल्या जातात. या योजनांचे उद्दिष्ट आहे की , भूमिहीन कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावणे. या योजनांच्या माध्यमात भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक सहाय्य, रोजगार प्रशिक्षण, कर्ज सुविधा इत्यादी सारखे लाभ मिळतात.
- राजीव गांधी ग्रामीण भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजना : या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना वार्षिक काही रक्कम दिल्या जाते जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह व्हावा.
- कृषी मजूर कल्याण योजना :केद्र सरकार मार्फत चालवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत कृषी मजुरांना दवाखान्यातील मोफत विलाज , भूमिहीन शतेमाजुर व्यक्तीच्या कुटुंबातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी छात्रवृत्ती इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- भूमिहीन कुटुंबांना जमीन वाटप : काही राज्यांमध्ये सामाजिक कल्याण व न्याय विभागामार्फत भूमिहीन कुटुंबांना जमीन वाटप करण्याच्या योजना आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन शेती जमीन वाटप योजना राबवली जाते.
भूमिहीन प्रमाण चे महत्व
वरील लेखातून तुम्ही भूमिहीन म्हणजे काय याविषयी जाणून घेतले आता जे व्यक्ति भूमिहीन आहेत त्याच्या साठी भूमिहीन प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून त्यावरून असे समजते की त्या व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही. हे प्रमाणपत्र अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे.
- सरकारी योजनांचा लाभ : केद्र सरकार आणि राज्य सरकारांनी भूमिहीन लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी भूमिहीन प्रमाणपत्र आवश्यक असते. उदा, गरीबी रेषेखालील कुटुंबांना, निराधार व्यक्तींना, शेतमजुरांना देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे.
- कर्ज ची पूर्तता :- काही बँका आणि वित्तीय संस्था भूमिहीन लोकांना कर्ज देतात. या कर्जांचा उपयोग ते स्वतःचे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी किंवा इतर आर्थिक गरजा भागवण्यासाठी करू शकतात व स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात.
- अन्य लाभ : याशिवाय, भूमिहीन प्रमाणपत्राच्या आधारे आपण इतर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून भूमिहीन म्हणजे काय , भूमिहीन असल्याचा फायदा काय व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- आंतरजातीय विवाह प्रोत्साहन मिळणार एवढी रक्कम..
- आज शहरात 20 पैकी एका आणि खेड्यात 30 पैकी एक महिलेला होत आहे कॅन्सर
- मिळणार मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ
- संपूर्ण महाराष्ट्र फिरा फक्त ११०० रु. मध्ये : एसटी ची आकर्षक योजना!
- १.५ लाख रुपये मिळणार या योजनेमधून
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या नागरिकांचे रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल reshan card E-KYC