दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारने देशातील पात्र लाभार्थी नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयांतर्गत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत एलपीजी (घरगुती गॅस ) गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी वरदान ठरणार आहे.या योजनेसाठी किती घरगुती गॅस मोफत मिळणार आहेत , काय काय कागदपत्र लागतील आणि याविषयी मोफत गॅस योजना महाराष्ट्र या लेखात योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मोफत गॅस योजना महाराष्ट्र mofat gas yojna maharashtra
उज्ज्वला योजनेची सुरुवात सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा होता. प्रत्येक पात्र घरात गॅस उपलब्ध करून धूर मुक्त स्वयंपाक घर करून महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे सोबत चुलीमुळे जे लाकूड तोड होत आहे त्याचे प्रमाण कमी करून जंगल वाचवणे. आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून १० कोटीपेक्षा जास्त कुटुंबांनी लाभ घेतला आहे, जे या योजनेच्या यशस्वितेचे प्रतीक आहे.
दिवाळीच्या सणासुदीनिमित्त केंद्र सरकार ने जाहीर करण्यात आलेल्या या विशेष योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही विशेष अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याच सोबत काही कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थ्यांचे आधार केवायसी पूर्ण झालेले असणआवश्यक आहे .आधार केवायसी केलेली नसेल तर तुम्ही या योजेनचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
काय आहे उज्ज्वल गॅस योजना ?
उज्ज्वल गॅस योजना ही भारतातील एक महत्वाची सरकारी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती, या योजेनेतर्गत दारिद्र्यरेषेखालील पात्र महिलां लाभार्थी न स्वच्छ ईंधन उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली असून . या योजनेमधून पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस ( घरगुती गॅस ) कनेक्शन दिले जाते.
महिलांना स्वयंपाक करताना होणाऱ्या धुराच्या संपर्कात येण्यापासून वाचवणे आणि त्यांचे आरोग्य सुधारणे. घरगुती एमपीजी गॅसच्या वापरामुळे घरातील स्वयंपाक कामकाज सोपे होते, लकडी इंधनाच्या तुलनेत एलपीजी गॅस अधिक कार्यक्षम असल्याने ऊर्जा बचत होऊन परिणाम जंगल तोड कमी होते व महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
कोण आहे पात्र
- पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महिलाच अर्ज करू शकते
- अर्ज करणारी महिला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातून असावी.
- अर्ज करणाऱ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यकडे एलपीजी गॅस ( घरगुती गॅस ) कनेक्शन नसावे.
- अर्जदार महिलेलेंचे नाव प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) किंवा अंत्योदय अन्न योजना यासारख्या इतर सरकारी योजनांच्या यादीत असणे आवश्यक आहे.
मोफत गॅस योजना महाराष्ट्र mofat gas yojna maharashtra
योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया सोपी आहे, परंतु काही महत्त्वाच्या बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे. प्रथम, लाभार्थी याना गॅस खरेदी करताना गॅस सिलिंडरची संपूर्ण किंमत भरावी लागेल. याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही, कारण गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांच्या आत इंधन कंपनीकडून अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत . या योजनेअंतर्गत १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिला जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पहिली बाब आपण वर वाचली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेच्या नावाने उज्ज्वला योजेनेतर्गत घरगुती गॅस मिळाला आहे त्या महिलेचे आधार कार्ड गॅस कनेक्शनशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर हे केलेले नसेल, तर त्वरित नजीकच्या गॅस एजन्सीकडे जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करावी. ज्या महिलची आधार केवायसी झाली नाही अश्या महिलाना मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून तत्काळ करून घेणे गरजेचे आहे. महिलानी लगेच आपल्या गॅस एजन्सीकडे जाऊन आपल्या आधार ई केवायसी करून घ्या आणि ई केवायसी नंतर पुढील 3 घरगुती सिलेंडर मोफत मिळवा.
आवश्यक कागदपत्रे
- गॅस कनेक्शन चे खाते पुस्तक
- आधार कार्ड आणि एक झेरॉक्स प्रत
- आधार सी लिंक असलेला मोबाइल नंबर आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा
- बँक खाते पासबूक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी तत्काळ आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून वर्षात 3 गॅस मिळणार मोफत पण त्यासाठी हे कागदपत्रे व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- आधार कार्डशी मोबाइल नंबर कसा जोडावा ? how to link mobile number to adhaar card
- PMAY Pradhan Mantri Awas Yojana आता प्रत्येकाच होईल घर या योजने अंतर्गत मिळणार एवढी रक्कम..
- 2005 पूर्वी नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू होणार
- रेशीम शेतीचा धागा करून मिळवा लाखोचे उत्पन्न
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२४! या योजनेचा लाभ कसा घ्या ?