केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! या नागरिकांचे रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल reshan card E-KYC

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेत केद्र सरकार मार्फत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी/ रेशन कार्ड  (सफेद , केशरी आणि पिवळे )  ई-केवायसी/ Reshan card E-KYC प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आली  असून,ही Reshan card E-KYC प्रक्रिया ३१ ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक  राहील असा शासनाने निर्णय घेतला आहे . या महत्त्वपूर्ण निर्णयामागील कारणे आणि प्रक्रियेची सविस्तर माहिती खालील लेखातून जाणून घेऊ. 

Reshan card E-KYC
Reshan card E-KYC

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना ही देशातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अत्यंत कमी दरात धान्य पुरवठा केला जातो. मात्र, या योजनेत काही प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बनावट लाभार्थी, मृत व्यक्तींच्या नावावर धान्य घेणे, अपात्र व्यक्तींना लाभ मिळणे अशा समस्या दिसून येत आहेत.

Reshan card E-KYC

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (National Food Security Act, NFSA) ही भारतातील एक महत्त्वाची योजना आहे. ही योजना भारतातील गरीब आणि दुर्बल वर्गातील लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.पात्र कुटुंबाना ह्या योजनेमधून अतिशय कमी दरात किंवा मोफत जीवन आवश्यक अन्न धान्य जसकी गहू, तांदूळ आणि ज्वारी यांसारखे अन्नधान्य पुरवले जाते. व इतर गोष्टी पुरवल्या जातात सोबत जे पात्र कुटुंबे आहेत त्याच्या साठी रेशन कार्ड असते हे एक दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र आहे त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील अनेक योजनेचा लाभ घेण्यासाठी या रेशन कार्ड चा उपयोग होतो मात्र,मागील काही वर्षांपासून असे दिसून आले आहे की या योजनेत काही प्रमाणात गैरव्यवहार होत आहेत. बनावट लाभार्थी, मृत व्यक्तींच्या नावावर धान्य घेणे, अपात्र व्यक्तींना लाभ मिळणे सोबत एकच व्यक्ति 2 ठिकाणी सुद्धा लाभ घेतानाचे दिसून आल्याचे खूप समस्या शासनासमोर आल्यामुळे शासनाने सर्व  शिधापत्रिकाधारकांसाठी/ रेशन कार्ड  (सफेद,केशरी आणि पिवळे)  ई-केवायसी/ Reshan card E-KYC प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात  आली आहे 

रेशन कार्ड ई-केवायसी का आवश्यक? Reshna-card E-KYC 

शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यामागे पुढील महत्वाचे कारणे आहेत :

  1. पारदर्शकता: धान्य वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी, व योग्य लाभार्थी पर्यन्त लाभ पोहचव्या साठी , बनावट रेशन कार्ड मुळे जे लाभार्थी काही वर्षा पूर्वी पात्र होते पण मागील काही वर्षात त्यांची आर्थिक परिस्थिति चांगली झाली आणि आज ते या योजनेसाठी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेत असतील त्याची ओळख पटवणे. 
  2. बनावट लाभार्थी : या योजनेमधून अनेक बनावट लाभार्थी लाभ घेत आहेत जस की वर सांगितल्या प्रणामे योजनेस पात्र नसताना देखील रेशन कार्ड कडून लाभ घेणे, एकाच कुटुंबाचे दोन दोन रेशन कार्ड असणे, आणि कुटुंबातील व्यक्ति मृत पावली तरी तिला जीवंत दाखाऊन तिच्या नावाचा लाभ योजनेतून घेणाऱ्या बनावट लाभार्थी सोधण्यासाठी e-kyc ई केवायसी करणे आवश्यक आहे. 
  3. अचूक वितरण:फक्त  पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, आपात्र लाभार्थी ओळखून त्याचे रेशन कार्ड बद्दल निर्णय घेणे. 
  4. डिजिटल व्यवस्था :सध्या शासनाच्या सर्व प्रणाली  वितरण व्यवस्था डिजिटल करण्यात येते आहे. याचा फायदा प्रत्येक्ष लाभार्थी आणि सरकार सुद्धा होईल. 

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ?Reshna-card E-KYC

 

रेशन कार्ड ई-केवायसी Rehsna-card E-KYC प्रक्रिया अत्यंत सोपी आणि निःशुल्क/मोफत आहे ती  कसी यासाठी खालील माहिती पूर्ण वाचा.  

  1. स्थान :- ई केवायसी करण्यासाठी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जा किंवा  तुम्हाला ज्या रेशन दुकानदाराने कार्ड बनवून दिलेले आहे जे दुकानदार दर महिन्याला तुम्हाला रेशन देतात त्यांना भेटा. 
  2. आवश्यक कागदपत्रे :- दुकानात जाताना सोबत तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेऊन जा. सर्वात अगोदर कुटुंब प्रमुखाची ई केवायसी करणे आवश्यक आहे आणि जर दुकानदार म्हणत असेल की कुटुंबातील सर्व व्यक्तीची ई-केवायसी करणे आवश्यक आहे तर सर्व लाभार्थी सदस्य यांची करून घेणे.  आणि आधार लिंक मोबाइल 
  3. प्रक्रिया:
    • दुकानातील ई-पॉस मशीनमध्ये तुमचा आधार क्रमांक टाकेल 
    • बायोमेट्रिक पडताळणी करेल त्यावेळ तुमचं हाताचा अंगठा द्यावा लागेल. किंवा एक otp सुद्धा देण्याची गरज भासू शकते. 
    • ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटात पूर्ण होईल आणि रेशन कार्ड दुकानदार यांच्या कडून ई केवायसी पूर्ण झाल्याचे कळवण्यात येईल. 

काही महत्त्वाच्या सूचना

  1. मोफत सेवा: ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत  आहे
  2. पैसे मागणे बेकायदेशीर: कोणी रेशन दुकानदार पैसे मागितल्यास ते बेकायदेशीर असून तुम्ही तालुका स्थरावर किंवा जिल्हा स्थरावर त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकता. 
  3. स्थलांतरित कुटुंबे : कुटुंब जरी स्थलांतरित असेल तरी ज्या ठिकाणी   वास्तव्य करत असलेल्या ठिकाणच्या रेशन दुकानात जाऊन प्रक्रिया करू शकतात. 
  4. सर्व सदस्यांसाठी : कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी Reshan card E-KYC आवश्यक
महत्त्वाची तारीख
  • अंतिम मुदत: ३१ ऑक्टोबर
  • प्रभावी तारीख: १ नोव्हेंबर पासून
ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम:
  1. रेशन कार्डवरून नाव वगळले जाईल परिणामी लाभ मिळणार नाही. 
  2. स्वस्त धान्य मिळणे बंद होईल
  3. शिधापत्रिका रद्द होऊ शकते आणि संबधित सर्व लाभ बंद होऊ शकतात. 
विशेष सूचना
  1. तक्रार नोंदवणी: जर रेशन दुकानदार पैसे मागत असेल किंवा अन्य समस्या असल्यास तालुका किंवा जिल्हा स्थरावर तक्रार करू शकता त्यासाठी तुम्हाला तालुका स्थरावर तहशीलदार आणि जिल्हा स्थरावर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करावी लागेल. 
  2. मदत : प्रक्रियेत अडचण आल्यास अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संपर्क साधून मदत मिळवू शकता. 
  3. कागदपत्रे: आधार कार्ड व रेशन कार्ड आणि आधार नोंदणीकृत असलेला मोबाइल नंबर 
  4. संपर्क – आधिक माहिती साठी आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानदार यांच्याशी संपर्ण साधावा. 

ई-केवायसी/ Reshan card E-KYC ही डिजिटल युगातील एक महत्त्वाची पायरी आहे. याद्वारे अन्न सुरक्षा योजनेचा लाभ योग्य व्लाभार्थीपर्यंत पोहोचेल आणि गैरव्यवहार रोखला जाईल हा शासनाचा मानस आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी/ रेशन कार्ड धारकांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी , जेणेकरून त्यांचे रेशन कार्ड सुरू राहील आणि धान्य पुरवठा दर महिन्याला होत राहील त्यात कोणतीही बाधा येणार नाही. 

या प्रक्रियेमुळे भविष्यात धान्य वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल. योग्य लाभार्थी पर्यन्त योग्य लाभ पोहचेल आणि शासनाला निर्णय घेण्यास मदत होईल.  शासनाच्या ह्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे आणि आपली ई-केवायसी/ Reshan card E-KYC वेळेत करून घ्यावी. 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून रेशन कायमचे होऊ शकते बंद आजच करा हे दोन महत्वाचे बदल   व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top