भोगवटादार म्हणजे काय भोगवतदारचे प्रकार किती पडतात

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आपल्या देशात जमिनी मालकीचे अनेक प्रकार पडतात त्या प्रकारानुसार त्या जमिनीचा भोगवटादार ठरतो. हे भोगवटादार म्हणजे काय , भोगवटादार चे प्रकार किती पडतात जर एखादी जमीन भोगवटादार वर्ग 2 ची आहे ती भोगवटादार वर्ग 1 मध्ये वर्ग करायची असल्यास शासन निर्णय काय आहे आणि त्याची पूर्ण प्रकिया काय आहे याविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख खास तुमच्यासाठी.

भोगवटादार म्हणजे काय

भोगवटादार म्हणजे काय असतं याची साध्या आणि सोप्या भाषेमध्ये माहिती पाहणार आहोत सोबत भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार 1 मध्ये काशी वर्ग करावी याविषयी माहिती आणि भोगवटादार ची किती प्रकार असतात याविषयी सविस्तर माहिती तर मित्रांनो शेत जमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उतार आहे गाव नमुना सात मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे दिलं गेलेलं असतं . सातबारा उताऱ्यावर भोगवटादार पद्धत देखील दिली गेलेली असते आणि यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पडण्यास मदत होते तर सर्वप्रथम आपण पाहूयात की भोगवटादार वर्ग एक भोगवटादार वर्ग 2 तिसरा प्रकारामद्धे सरकारी मालकीच्या जमिनी येतात आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे सरकारी पट्टेदार वरील प्रकारानुसार त्या जमिनीचा मालक कोण म्हणजे त्या जमीनीचा भोगवटादार कोण हे ठरते त्यालाच भोगवटादार असे म्हणतात.

भोगवटादार म्हणजे काय , भोगवटादाराचे प्रकार
भोगवटादार म्हणजे काय , भोगवटादाराचे प्रकार

भोगवटादाराचे प्रकार किती व कोणते

प्रामुख्याने भोगवटादाराचे प्रमुख चार प्रकार पडतात ज्यामध्ये भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 , शासकीय पत्तेदार व शासकीय मालकीजमिनी या सर्व प्रकाराविषयी सविस्तर माहिती पूढील प्रमाणे

  1. भोगवटादार वर्ग १
    भोगवटादार वर्ग 1 ची व्‍याख्‍या महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २९(२) मध्‍ये नमूद केल्या नुसार . ज्‍या शेतजमिनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो व त्या जमिनीचा वापर शेतीसाठी केल्या जातो अशा जमिनीस भोगवटादार-१ ची जमीन म्‍हणतात. अशा जमिनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणतीही परवानगी घ्यायची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमिनीला भोगवटा वर्ग 2 ची जमीन म्हणतात काही ठिकाणी बिनदुमाला किंवा खालसा जमीन असेही म्‍हणतात.
    या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. तो व्यक्ति कधीही आणि कुणालाही आपली शेतजमीन विकू शकतो.
  2. भोगवटादार वर्ग 2
    भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी प्रामुख्याने कोणाच्याही स्वतःच्या मालकीच्या जमिनी नसतात, भूमिहीन शेतकऱ्यांना शासनाच्या योजनामधून मिळणाऱ्या शेतजमीन , विविध देवस्थान आणि ट्रस्ट ला मिळालेल्या शेतजमीन ह्या या पद्धतीतमध्ये मोडतात , खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात. या जमिनींचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. अश्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मध्ये मोडतात. ह्या मध्ये जमिनी शासनाने भाडेतत्वावर सुद्धा दिलेल्या असतात.
    भोगवटादार वर्ग 2 मध्ये जमिनीच्या हक्काचे एकूण 16 प्रकार पडतात.
  3. शासकीय पत्तेदार
    या प्रकारामध्ये मोडणाऱ्या जमिनी ह्या शासकीय मालकीच्या असतात व त्या जमिनी भाडेतत्वावर 5, 10 , 15, 30 , 50 , 99 वर्षाकरिता देण्यात येतात. ह्या भोगवटादाराचा तिसरा प्रकार आहे.
  4. सरकारी मालकीच्या जमिनी
    ह्या प्रकरांमधील सर्व जमिनी ह्या सरकारी मालकीच्या असतात व त्या जमिनीचा उपयोग करणार मार्फत केल्या जातो. हा भोगवटादाराचा चौथा प्रकार आहे

भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 मधील फरक

भोगवटादाराचे प्रमुख दोन प्रकार पडतात या दोन्ही मधील फरक पुढीलप्रमाणे.

भोगवटादार वर्ग 1 मधील जमिनी ह्या शेतकरी च्या स्वतःच्या मालकीच्या आसतात त्या जमिती खरीदी विक्री करताना शासनाचे खरेदी विक्री करताना कोणतेही निर्बंध लागत नाहीत , शेतकरी शेतजमीन अगदी सहज खरेदी विक्री करू शकता अश्या शेतजमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये येतात आणि भोगवटादार वर्ग 2 मध्ये येणाऱ्या जमिनी ह्या भूमिहीन शेतकऱ्याला योजने अंतर्गत मिळालेल्या शेतजमीनी येतात , त्याच बरोबर शासनाने एखाद्या ट्रस्ट किंव देवस्थान ला दिली आहे अश्या सर्व जमिनी भोगवटादार वर्ग 2 मध्ये येतात. अश्या जमिनी विकण्याच्या अधिकार ह्या देवस्थान , ट्रस्ट आणि भूमिहीन शेतकऱ्याला नसतो तो शासनाकडे राखीव असतो अश्या शेतजमिनी भोगवटादार वर्ग 2 मध्ये येतात. तर या दोन्ही वर्गात प्रमुख फरक हा आहे की वर्ग एक च्या जमिनी ची पूर्ण मालकी हक्क संबंधित शेतकाऱ्याकडे असतो आणि वर्ग 2 च्या जमिती चा मालकी हक्क शासनाकडे असतो. हाच भोगवटादार वर्ग 1 आणि भोगवटादार वर्ग 2 मधील मुख्य फरक आहे.

भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये काशी वर्ग करावी.

8 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र जमीन महसूल ( भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने असलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे , नियम 2019 राजपत्राद्वारे प्रसिद्ध केला गेला आहे.
या नियमानुसार , ज्या जमिनी शासनाने कृषिक , रहिवासी ट्रस्ट, देवस्थान किंवा
औद्योगिक वापरासाठी कब्जेहक्कानं अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या आहेत, अश्या जमिनींचे वर्ग 1 मध्ये रुपांतर करता येणे शक्य आहे.

त्यासाठी तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे अर्ज करता येतो.

वर्ग-2 च्या जमिनीतून हक्कसोड करण्याची प्रक्रिया थोडी विशेष आणि किचकट असते आणि ती विविध कायदेशीर पद्धतींचा अवलंबासह करण्यास आवश्यक असते. ही जमीन सरकारी मालकीची असल्यामुळे, तिच्यावर अनेक नियम आणि अटी लागू असतात. त्यामुळे त्या नियमचे पालन करून तुम्ही वर्ग मध्ये मध्ये स्थळानंतरीत करू शकता.

जमिनीवर हक्कसोड (अथवा हक्क हस्तांतरण) करण्यासाठी तुम्हाला खालील प्रचलित पद्धती चा वापर करू शकता.

  • 1. जमिनीच्या मालकी हक्काची तपासणी :- प्रथम, त्या जमिनीच्या नोंदी (7/12 उतारा) वर असलेल्या मालकी कुणाच्या नावावर आहे हे तपासणे आवश्यक आहे. तुम्ही अधिकृत भूखंडाच्या कागदपत्रांची पडताळणी करून ती जमीन वर्ग-2 चीच आहे हे निश्चित करा.
  • 2. अनुमतीसाठी अर्ज :- वर्ग-2 जमिनीच्या हक्कसोडीसाठी अथवा हस्तांतरासाठी तुम्हाला अधिकृत मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक तालुका कार्यालय तहसील कार्यालय किंवा जिल्हा महसूल अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन अर्ज करणे गरजेचे आहे त्यासाठी लागणाऱ्या अर्जाचा नमूना वर दिलेला आहे.
  • 3. अर्ज तयार करणे :- अर्जामध्ये तुमची पूर्ण माहिती, हक्कसोड करण्याचे कारण, जमीनीचे तपशील आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. अर्जाचा नमूना वर दीलेला आहे.
  • 4. आवश्यक कागदपत्रे :- अर्जाकरताना काही अत्यावश्यक कागदपत्रे जोडावे गरजेचे आहेत . त्यामध्ये 7/12 उतारा, मालकीशी संबंधित कागदपत्रं, जमिनीचा नकाशा , आणि इतर संबंधित दस्तऐवज समाविष्ट असतात , सोबत शासनामार्फत इतर काही आवश्यक कागदपत्राची मागणी केली असल्यास ते कागदपत्रे ची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  • 5. फी भरणे / नजराणा :- काही प्रसंगी हक्कसोड प्रक्रियेच्या (अधिमूल्य) नजरांना काही जमिनीच्या प्रकारा मध्ये भरणे आवश्यक आहे .
  • 6. महसूल अधिकाऱ्यांची तपासणी :- वरील सर्व कागदपत्रासोबत अर्ज सादर केल्यानंतर संबंधित महसूल अधिकारी किंवा तहसीलदार त्याची तपासणी करतील आणि तपशीलांच्या पडताळणीनंतर जर अर्ज योग्य असल्यास पुढे पटवण्यात येईल किंवा अर्जात काही त्रुटि असल्यास त्या संदर्भात अर्जदारास सूचित करण्यात येईल.
  • 7. मंजुरी मिळवणे :- मंजुरी मिळाल्यावर, ती जमीन वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये रूपांतरित होते.

ही प्रक्रिया कायदेशीर असल्यामुळे तिचे योग्य आणि व्यवस्थित पाळणे करणे महत्वाचे आहे. काळानुसार या मध्ये काही बदल झाला असल्यास संबधित कार्यालयाकडून तुम्हाला सूचित करण्यात येईल.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top