युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी आजच करा अर्ज

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

भारत देशातील तरुण युवकांसाठी रोजगारची सुवर्ण संधी विकास आयुक्त कार्यालय (MSME), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांनी 93 तरुण व्यावसायिकांना कराराच्या आधारावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला असून पात्र आणि इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागावण्यात येत आहेत. पदवी पूर्ण केलेल्या आणि स्पर्धा परीक्षा च्या अभ्यास करणाऱ्या व मंत्रालयात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.

युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी
युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी

युवकांना मंत्रालयात नोकरीची संधी

सदरील रोजगार भरती विकास आयुक्त कार्यालय (MSME), सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येत असून या भरतीमध्ये 93 तरुण व्यावसायिकांना करारा तत्वावर घेण्यात येणार आहे. दिल्ली आणि मोठी शहरे कामाची ठिकाणे असल्यामुळे पगार सुद्धा चांगला देण्यात येणार आहे.

पदाबद्दल संक्षिप्त माहिती

पदाचे नाव  Young Professional (तरुण व्यावसायिक)
वयोमार्यादा कमाल ३२ वर्षे (०१.०१.२०२४ पर्यंत)
एकूण पदे 93
नोकरीचे ठिकाण भारतातील सर्व राज्यात कुठे पद नियुक्ती होऊ शकते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय चे कार्यालय
मानधन 60, 000 प्रती महिना
सदरील नोकरीचा कालावधी सुरुवातीला दोन वर्षांसाठी, कामगिरी आणि गरजेनुसार तीन वर्षांपर्यंत वाढवता येईल. वेळेवर निर्णय घेण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • आवश्यक :– कोणत्याही मानविकी विषय/क्षेत्रातील व भारतातील कोणत्याही विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech. CS किंवा IT किंवा MCA मध्ये अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमधून किमान 1 वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव असणे अत्यावश्यक असून त्याशिवाय या पदासाठी अर्ज करता येणार नाही.
  • इतर :- सॉफ्टवेअर मध्ये माहिती गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे कौशल्य , संशोधन विषयातील ज्ञान , प्रोग्रामिंग, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट इत्यादींचा अनुभव असल्यास प्राधान्य.

इतर आवश्यक बाबी

  • प्रतिबद्धता MSME मंत्रालयाच्या HR मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या पालन करावे लागेल
  • मोबाईल/टेलिफोन आणि ईमेलवर उपलब्ध असणे अनिवार्य आहे. सोबत या सर्व बाबीचा वापर करता येणे सुद्धा आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा व वेळेवर कोणताही बदल करण्याचा अधिकार कार्यालयाकडे राखीव ठेवण्यात आला आहे त्याचा उमेदवारानी दखल घ्यावी.
  • इच्छुक उमेदवारांनी वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत विहित अर्जाच्या नामुन्याचा वापर करून ईमेल (estt-hqrs@dcmsme.gov.in) द्वारे त्यांचे तपशील सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
  • प्रत्यक्ष कार्यालयात येऊन केल्या जाणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारिनी घ्यावी.

अर्जाचा नमूना

  1. नाव : name
  2. वडिलांचे नाव : Father Name
  3. आईचे नाव : Mother Name
  4. जन्मतारीख/वय : Date of Birth and Age
  5. लिंग : Gender
  6. शैक्षणिक पात्रता : Education qualification
  7. अनुभवाचा तपशील : Work expriance
  8. काढलेले शेवटचे वेतन : last down salary
  9. रिझ्युम (सपोर्टिंग दस्तऐवज संलग्न करणे आवश्यक आहे) Resume/ Biodata
  10. वरील सर्व माहिती एका नमुन्यात भरून मेल वर जोडणे आवश्यक आहे

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  1. अर्ज करताना estt-hqrs@dcmsme.gov.in याच mail id वर करावा इतर कोणताही मेल id नाही
  2. अर्ज करताना तुम्ही जो मेल लिहीत आहात त्यालाच अर्जाचा मुख्य भाग समजला जाईल ( त्यामुळे अर्ज करताना मेल मध्ये तुमच शिक्षण , कामाचा अनुभव नमूद करणे आवश्यक आहे सोबत तुम्हालाच या पदासाठी का निवड करावी याची काही वास्तव्यवादी कारणे सुद्धा देणे ज्यामुळे निवड होण्याच्या शक्यता वाढतात. )
  3. ‘अतिरिक्त दस्तऐवज-उमेदवाराचे नाव (10 MB पेक्षा जास्त नसावी याची काळजी घ्यावी ) फाइल नावासह सर्व संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे एकल PDF फाइल म्हणून मेल सोबत जोडावी.
  4. रेझ्युमे-उमेदवाराचे नाव’ (2 MB पेक्षा जास्त नाही) नावाच्या PDF फाईलच्या रूपात resume/ BIodata मेल सी जोडा.
  5. सादर करण्याची अंतिम मुदत: ही जाहिरात वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या राहील याची नोंद घ्यावी.
  6. अर्ज करताना वयाचा दाखला , शिक्षणाचे कागदपत्रे , अनुभव प्रमाणपत्र व शेवटच्या पगाराची पावती जोडणे आवश्यक आहे जर तुम्ही अनुभवी नसाल तर संबंधित कागदपत्रे जोडायची गरज नाही
  7. अर्ज करताना कोणतीही अडचण असल्यास किंवा इतर कोणत्याही मदत हवी असल्यास कोणत्याही चौकशीसाठी, दूरध्वनीवरील उपसंचालक (प्रशासन) यांच्याशी संपर्क साधा. क्र.- 011-23061430 किंवा estt-hqrs@dcmsme.gov.in वर ईमेलद्वारे.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top