अनुकंपा म्हणजे काय आणि अनुकंपावर नोकरी साठी किती टक्के आरक्षण असते.

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

नमस्कार मंडळी आज २ १  व्या शतकात सरकारी नोकरी मिळवणं किती अवघड आहे हे सर्वांचं माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त २ टक्के लोकांना सरकारी नोकरी मिळू शकते. पण सध्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किती युवक प्रयत्न करत आहेत हे काही नव्याने सांगायला नको. सरकारी नोकरी मध्ये अनेक पदाची नियुक्त होते पण समानः श्रेणी अ , श्रेणी ब, श्रेणी क आणि श्रेणी ड  अश्या चार प्रमुख श्रेणी मध्ये सर्व पदाधीकारी विभागले आहेत .  जर श्रेणी क आणि ड मधील एखान्या कर्मचारी कामावर असताना आकस्मित मुत्यू पावला / नक्षलवादी / आतंकवादी / समाजविघातक हल्यात किंवा कारवाईत त्याचा वारसाला सरकार मार्फत नोकरी देण्याची सवलत आपल्या संविधान दिलेली आहे. त्याला अनुकंपा असे मानतात , आजच्या लेखाचा माध्यमातून आपण अनुकंपा म्हणजे काय, शासनाचा GR काय म्हणतो , नियुक्ती साठी काय निकष आहेत .  कोण अनुकंपा चा लाभ घेऊ शकत नाही या विषयी सविस्तर माहिती पाहू त्यामुळे लेख पूर्ण वाचा .

अनुकंपा म्हणजे काय
अनुकंपा म्हणजे काय

अनुकंपा म्हणजे काय

  • अनुकंपा हा शब्द बोद्ध धर्म संस्कृतीतून आला आहे. बुद्धाच्या शिकवणी नुसार अनुकंपा या शब्दाचा अर्थ  करुणा आणि सहानुभूति असा होतो. बौद्ध धर्मानुसार हि सर्वसमावेशक आणि महत्वपूर्ण संकल्पना असून ज्यामधून करुणा किंवा सहानुभूती अनुवादित होते . हे इतरांच्या दुःखाना समजून घेणे आणि त्यांच्या दुखत सहभागी होणे व त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. त्यामुळे बौद्ध धर्मात अनुकंपा खूप महत्व आहे.
  • शासकीय सेवेत असताना  श्रेणी क  आणि ड  मधील कर्मचाऱ्याचे/ निधन झाल्यास त्यांच्या  कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास हातभार लावण्यासाठी  आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा (सहानुभूती) म्हणून नियुक्ती देण त्यालाच अनुकंपा म्हणतात. 
  • अनुकंपा म्हणजे काय  समजून घेताना हे समजून घेणं महत्वाचं आहे कि अनुकंपा नियुक्ती म्हणजे वारसाहक्क नाही. अनुकंपा तत्वावर नियुक्ती म्हणजे , क आणि द श्रेणीतील राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवगंत झाल्यास / मरण पावल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक दुखात, त्यांच्या कुटुंबियाना सहाय्य करून आर्थिक मदत मिळावी यासाठी , अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेणे. यासाठी शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यू दिनांकापासून एका वर्षात अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच व काही अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या अर्जदारास शासकीय नोकरी मध्ये सामावून घेण्यात येईल. आता तुमच्या लक्षात येईल की अनुकंपा म्हणजे काय .

अनुकंपा म्हणजे काय समजून घेण्यासाठी काही महत्वाचे शासन निर्णय-

आपल्याला माहिती आहे का अनुकंपा तत्वावर नोकरी आज पासून नाही तर सुरुवातीला 1973  सालापासून अनुकंपा वर नोकरी दिल्या जात आहेत त्यासंदर्भातील आपण काही महाराष्ट्र शासनाचे GR पाहू, आणि समजून घेऊ कि काळानुसार त्यामध्ये कसे बदल झालेत.

  1. शासकीय सेवेत असताना बेपत्ता , दिवंगत झालेल्या किंवा क्षय/ कर्करोग इत्यादि गंभीर आजारमुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातवाईकांस नेमणूक देण्यासबंधी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची योजना शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग . क्र. एनआरव्हि-1076/12, दिनांक 23 एप्रिल 1973 अन्वये कार्यान्वित करण्यात आली व त्यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले. ( सुरुवातीला या कायद्यानुसार बेपत्ता झालेले व टीबी आणि कॅन्सर मुळे आजारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाना नोकरी मिळत असेल आता त्यामध्ये बदल झाला आहे ते आपण त्यानंतर आलेल्या GR प्रमाणे पाहू )
  2. वरील GR मध्ये शासनाला काही त्रुटी आढळल्या म्हणून त्यात बदल करण्यासाठी शासनाने ६  ऑक्टोबर १ ९ ८ ९  साली सुधारणा GR काढला त्यानुसार
    • शासकीय कर्मचारी बेपत्ता झाल्यापासून सहा महिन्यानंतर अथवा पाच वर्षाच्या आत त्यांच्या कुटुंबियाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक राहील
    • बेपत्ता कर्मचारी हजार झाल्यास सेवेत नियुक्त केलेल्या कुटुंबातील सदस्य नोकरीवरून कमी करण्यात येईल.
    • कर्मचारी बेपत्ता होण्यापूर्वी त्याने दत्तक घेतलेला मुलगा / अविवाहित मुलगी ही या नियमानुसार नेमणुकीस पात्र नातवाईक मानण्यात येतील.
  3. मागील काही वर्षात अनेक gr आले सध्या 2024 नुसार शेवटचा GR २ ० २ २  रोजी आला त्या GR मधील महत्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे.
    • जर कर्मचारी बेपत्ता असेल तर जो पर्यंत न्यायालय त्या व्यक्तीला मयत घोषित करत नाही तो पर्यत तुम्ही अनुकंपा साठी अर्ज करू शकत नाही .
    • अनुकंपा योजनेअंर्गत शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास 1 वर्षाच्या आत कुटुंबातील पात्र सदस्यांपैकी एका व्यक्तीला त्याने धारण केलेल्या अहणतेनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करावा लागतो. गट-क वर्गासाठी अर्हता ही पदवी असल्यामुळे अनुकंपाधारक प्रतिकशसूचिवर नाव घेतेवेळी गट -क पदाची अर्हता धारण करीत असल्यास त्यांना गट ड पडसाठीच अर्ज करावा लागतो. प्रत्यक्षात गट-ड च्या प्रतीक्षासूचितून नोकरी मिळेपर्यंत काही अणुकांपाधारक गट-क ची अर्हता धारण करतात. परंतु गट-ड च्या प्रतीक्षासूचिवरील नाव गट-क च्या प्रतीक्षासूचित घेण्याची तरतूद प्रचलित धोरणात नसल्याने त्या अनुकंपाधारकाचे नाव गट-क च्या प्रतीक्षासूचित समाविष्ट करता येत नाही, यास्तव गट-ड मधून गट-क प्रतीक्षासूचित नाव अंतर्भूत करण्याबाबत तरतूद करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी निर्णय घेऊन बदल करू शकतो.
    • गट-क च्या ज्या ज्या पदावर टंकलेखक पदासाठी तांत्रिक अर्हता आवश्यक आहे. नियुक्तीच्या अगोदर जर ती अर्हता असेल तर काही अडचण नाही परंतु नेमणूक घेऊन जर ती अर्हता नसेल तर नेमणुकीनंतर पूर्वी ६  महिने कालावधी देणार येत होता आता सुधारित GR नुसार २  वर्षाचा कालावधी देण्यात येत आहे .  या २  वर्षाच्या कालावधीत उमेदवारास टंकलेखकांची परीक्षा देऊन प्रमाणपत्र जमा करावे लागेल. वेळेत प्रमाणपत्र जमा केल्यास नियुक्ती कायम राहील आणि जमा नाही करू शकल्यास त्या नियुक्त उमेदवारास नोकरीवरून कमी करण्यात येईल .  त्याचबरोबर वेळेचे नियम महाराष्ट्र शासन कधीही बदलू शकते याची नोंद घ्यावी .
    • या GR नुसार अनुकंपाधारक आपले गट बदलण्याची मुभा देत्यात आली आहे जर तुमची शैक्षणिक अर्हता गट – क व गट ड या दोन्ही पैकी कोणतीही गटास अर्ज करू शकता.

अनुकंपाच्या आधारावर कोण नोकरी मिळू शकते.

अनुकंपा हा शासनाने चालू केलेली एक योजना आहे ज्यामधून शासकीय अधिकाऱ्याची नोकरीच्या ठिकाणी मुत्यू झाल्यास , बेपत्ता झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एक पात्र सदस्याला सरकारी नोकरी देउन त्याला दुःखातून सावरण्यासाठी साहाय्य करणे, हा मूळ हेतू आहे. जेव्हा हि योजना आली तेव्हा या योजनेतील निकष व अटीशर्ती खूप वेगळ्या होत्या आता आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला .  सध्या चालू असलेल्या अनुकंपा योजनेमधून लाभ कोण घेऊ शकते किंवा या लाभासाठी कोण पात्र आहे याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे.अनुकंपा म्हणजे काय

  • शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीचा कामाच्या ठिकाणी मुत्यू झाला किंवा तो काही
  • दिनांक एक मार्च 2013 च्या महाराष्ट्र शासन नियमानुसार , प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 टक्के अनुकंपा नियुक्तीने भरली जातात. प्रत्येक वर्षात रिक्त झालेल्या व रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांची एकत्रित गणना करून त्याच्या 10 टक्के इतकी पदे अनुकंपा तत्वावर भरली जातील. कोणत्याही करणास्तव 10 टक्के पेक्षा जास्त पदे भरता येणार नाहीत.
  • दिनांक 26-2-2013 च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ,अनुकंपा तत्वावर नियुक्ती देतांना , मुलीनं देखील नेमणूक देण्याचे शासन धोरण आहे. अनुकंपा च्या नियुक्तीसाठी जर पात्र कुटुंबियामध्ये दिवंगत / मरण पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची पती /पत्नी मुलगा किंवा अविवाहित मुलगी आस्था मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेल्या मुलगा/ अविवाहित मुलगी , दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर आणि त्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून , केवळ अविवाहित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा अविवाहित बहीण तसेच घटस्फोटीत/ परित्यक्ता/ विधवा मुलगी /बहीण ही नियमानुसार पात्र नातवाईक मानण्यात आले आहेत.अनुकंपा म्हणजे काय
    • दिनांक 17 नोहेबर 2016 च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र नातवाईकांच्या यादीमध्ये सुधारणा करण्यात आली असून खाली नमूद केलेले नातवाईक अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. पती/पत्नी . मुलगा / मुलगी ( विवाहित/ अविवाहित ) मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी( विवाहित/ अविवाहित ) मृत्यू पावलेला कर्मचारी जर राज्य शासकीय कर्मचारी असेल तर कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हीच एकमेव आपत्य असल्यास किंवा त्यांचे फक्त त्या विवाहित मुलीवरच अवलंबून असेल तर अशा प्रकरणी मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहील.
      • मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा इतर कोणताही नातवाईक नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याच सन पात्र होईल.
      • घटस्फोटीत/ परित्यक्ता / विधवा मुलगी किंवा बहीण
      • केवळ अविवाहित शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणार भाऊ किंवा अविवाहित बहीण.
    • अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबधितांकडून मृत्यू कर्मचाऱ्यावर सर्वस्वी अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीचा सांभाळ करण्याबाबत स्टंप पेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्यात येते.
    • शासनाचे GR  वाचण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता. अनुकंपा म्हणजे काय  हे समजून घेण्यासाठी GR आवश्य वाचा अनुकंपा नियुक्ती धोरणात महत्वाचे बदल 

तुम्हाला हा लेख कसा वाटला आपली प्रतिक्रिया नक्की कालवा .

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अनुकंपा म्हणजे काय आणि अनुकंपावर नोकरी साठी किती टक्के आरक्षण असते.व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे  ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top