आपल्या भारत देशात आज अनेक नवनवीन योजना, प्रकल्प राबवले जातात , निवडणुकी जवळ आल्या कि आपल्या देशातील तरुण किती बेरोजगार आहे यावर भाष्य केल्या जाते ज्यांच्या हातात सत्ता होती हे सरकार आपली आकडेवारी मानते आम्ही एवढ्या बेरोजगारांना रोजगार दिला पण खरच ती आकडेवारी खरी असते का ? तर नाही सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) नुसार जून 2024 पर्यंत, भारताचा बेरोजगारीचा दर 9.2% होता. मे 2024 मधील 7% वरून ही झपाट्याने वाढ झाली आहे . महिलांसाठी बेरोजगारीचा दर जून 2024 मध्ये राष्ट्रीय सरासरी 18.5% पेक्षा जास्त होता, तर पुरुषांसाठी दर 7.8% होता. शहरी आणि ग्रामीण भारतामध्ये बेरोजगारीचा दरही वाढला आहे, शहरी भागात ८.६% वरून ८.९% आणि ग्रामीण भागात ६.३% वरून ९.३% पर्यंत वाढला आहे. हि बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनामार्फत अनेक पाऊले उचलेली जात आहेत त्यापैकी एक म्हणजे National Career service , चला तर मग जाणून घेऊ काय आहे हि संस्था आणि त्यामधून कश्या सेवा पुरवल्या जातात.
National Career service ची सुरुवात
भारताचे सद्याचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जुलै 2015 रोजी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालया अंतर्गत National Career service राष्ट्रीय करियर सेवा या संस्थेची स्थापना केली या संस्थेला भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या रोजगार प्रशिक्षण महासंचालनालयाद्वारे निधी आणि व्यवस्थापित पुरवल्या जाते आणि या संस्थेचा धोरणात्मक बेरोजगार युवक , युवतींना करिअरशी संबंधित सेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.
काय आहे National Career service चा उद्देश
सर्व हितधारकांसाठी सुलभ आणि कार्यक्षम पूर्तता सक्षम करण्यासाठी सर्व जॉब इच्छूक आणि संभाव्य नियोक्ते यांना एकाच पोर्टलवर एकत्र आणणारे सर्वसमावेशक राष्ट्रीय वेब आधारित जॉब प्लॅटफॉर्म तयार करणे.
National Career service चे फायदे काय आहेत
- रोजगार देवाणघेवाण माहिती करिअर केंद्रांचे परिवर्तन जे समुपदेशन, नोकरी सूचना, स्वयं-मूल्यांकन साधने, संधी सुधारून स्थानिक सेवा प्रदान करतात.
- या सर्व प्रकियेमध्ये कोणीही मध्यस्थ नसल्यामुळे सेवा द्यायला उशीर होत नाही आणि फसवणुकीचे कोणतेही प्रकार घडत नाहीत.
- कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार आपल्या नागरिकांकडून गोळा केलेल्या विविध डेटाचे विश्लेषण करू शकते आणि त्याचा योग्य उपयोग करून आपली सेवा विस्तारित आणि सुयोग्य बनवते
- बेरोजगार युवक , युवती ना करिअर संबधी समुपदेशन सेवा प्रदान करते. हि सेवा फोन वरून किवा समोर समोर दोन्ही माध्यमातून पुरवल्या जाते.
- बेरोजगार यांना करिअर माहिती सोबतच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन पुरवते.
- समाजातील अशिक्षित- वंचित वर्ग, अनुसूचित जाती , जमाती व मुख्य प्रवाह पासून वंचित घटक यांना नोकरीच्या नियुक्ती साठी मार्गदर्शन देऊन ब्लू कॉलर नोकरी मिळून देण्यास मदत करते .
- भिन्न क्षमता असलेली व्यक्ती (PWDS, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक इ. सर्व सेवा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातात.
- आधार किंवा पॅन नंबर वापरून नोकरी शोधणाऱ्या बेरोजगारांची सत्यता पडताळली केली जाते
- LIN, TIN, MCA नोंदणी क्रमांक वापरून नियोक्त्याची सत्यता सत्यापित केली.
National Career service चा लाभ कसा घेता येईल.
- ऑनलाइन www.ncs.gov.in या वेबसाइट वर जाऊन आपले प्रॉफिल तयार करून तुम्ही लाभ घेऊ शकता.
- टेलिफोन ( मंगळवार ते रविवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध तुम्ही समोरासमोर बसून सेवा मिळवू शकता ) त्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या मॉडेल करिअर सेवा केंद्राला भेट देऊन या सेवेचा लाभ घेऊ शकतात.
- फोन नंबर 1514
- ऑगस्ट २०२४ नुसार आज भारतामध्ये ४०० मोडल कॅरियर केंद चालू आहेत.
National Career service अंतर्गत मिळणाऱ्या सेवा
- Job seeker
- Employer
- Government Employer
- Placement Organisation
- Career Center
- International Jobs
- Counsellors
- Employment Exchange
नोकरी देणारे आणि ज्यांना नोकरी पाहिजे असे दोन्ही नोदणी करू शकतात. National Career service च्या आकडेवारी नुसार 31,52,229 एवढ्या शासकीय निमसरकारी व खाजगी संस्था आणि कंपनी नोकरी देण्यासाठी National Career service नोदणीकुत आहेत व त्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये 17,51,486 नोकरीच्या जाहिराती website वर उपलब्ध आहेत.
Agriculture , ApparelAutomotive BFSI Beauty and wellness , capital goods and Manufacturing, Construction, Electronics , Gems & Jewellery, Health care, IT etc अश्या 52 शेत्रात National Career service मार्फत नोकरी , समुपदेशन पुरवल्या जाते. आज रोजी महाराष्ट्र राज्यामधून भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त 9.28 टक्के लोकांनी या website वर नोदणी केली आहे आणि त्यापकी किती लोकांना रोजगार मिळाला याची कोणतीही आकडेवारी शासनामध्ये या वेबसाइट वर नमूद केली नाही.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून काय आहे National Career service, मिळेल का नोकरी ?व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.