प्रत्येकला वाटत निरोगी जीवन जगावं. आजारापासून दूर राहावं, पण कितीही काळजी घेतली तरी कोणता कोणता तरी आजार होतोच.धकाधकीच्या आणि धावळपळीच्या जीवनात योग्य आहारचा अभाव असतो. त्यामुळे बहुतेकांचे वजन अतिशय जास्त प्रमाणात वाढते. परिणामी अनेक आजार जडली जातात आणि त्यामुळे हॉस्पिटलच्या वाऱ्या वाढतात, औषधाचे सेवन सुरू होतो. त्यामुळे काही प्रमाणात तर आजार बारा होतो तो त्या आजपासून कायमची सुटका होत नाही. त्या पासून सुटका मिळवायची असेल तर आपल्या रोजच्या आहारात आवळ्याचे सेवन वाढवा.
उपचारा पेक्षा प्रतिबंध बारा या उती प्रमाणे आजार होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल की ज्याचा वापर करून आपण एक निरोगी आणि आनंदमय जीवन जगू शकू. हो ही शक्य आहे आपण अशा औषधांबद्दल जाणून घेणार आहोत आहेत जे आपल्याला आपल्या सभोवताली मिळेल आणि अगदी माफक दरात आपण बाजारातून विकत घेऊन त्याचे आपण रोज सेवन करू शकतो. याचा अतिवापर केल्याने कोणताही दुष्परिणाम होणार नाही हे औषध लहान मुलापासून ते मोठ्या माणस सुद्धा अगदी रोज करू शकतात. तुम्ही याच्या वेगवेगळ्या रेसिपीस बनवून वापर करू शकला आणि सर्व जन अगदी आवडीने खाल. ते औषध दुसर तिसर काही नसून आवळा आहे. हो जो तुमच्या रोजच्या पाहण्यात असतो. गाडीवाला रोजच दारावर घेऊन येतो तो आवळा. चला तर मग जाणून घेऊ ह्या आवळ्याचे काय महत्व आहे.
आयुर्वेदात महत्व
हरीतकीसमं धात्रीफलं किन्तु विशेषतः। रक्तपित्तप्रमेहघ्नं परं वृष्यं रसायनम्।हन्ति वातं तदम्लत्वात्पित्तं माधुर्यशैत्यतः। कफ रूक्षकषायत्वात्फलधाञ्यास्त्रिदोषजित्।यस्य यस्य फलस्येह वीर्यं भवति यादृशम्। तस्य तस्यैव वीर्येण मज्जानमपि निर्दिशेत्।
पित्त आणि पित्त संबधित विकारांवर आवळा लाभदायक आहे. हे वृष्य (शक्ती प्रदाता) आणि रसायन (प्रतिकारशक्ती) गुणधर्मांमुळे तग धरण्याची क्षमता आणि कोणत्याही संसर्गाविरूद्ध शरीराचे संरक्षण सुधारण्यासाठी देखील कार्य करते. आंबट चवीमुळे वात संतुलित करतो, पित्तला मधुरा (गोड) आणि सीता (थंड) स्वभावामुळे संतुलित करतो.
आवळ्याचे महत्व
- एक्सपर्ट सांगतात कि, हे एक वंडर फळ आहे. आवळ्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फास्फऱस आणि पोटॅशिअम आयर्न, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे १०० आजाराचे एक औषध मानतात.
- आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व अनेक आजार मुळापासून बरे होतात. चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. आवळ्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर तेज येते. त्वचा स्वच्छ दिसते. त्वचेवरचा सुरकुत्या कमी होतात. केस काळे व दाट व चमकदार करण्यासाठी आवळ्याचा वापर केल्या जातो. आवळ्याची पावडने केस धुणे किंवा आवळ्याचे सेवन करणे.
- महिलांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असल्यास ? रक्तामध्ये लोहाचे प्रमाण कमी असल्यास? आवळ्याचे जूस पिणे फायदेशीर होते किंवा जेवणानंतर आवळा कांडी महिनाभर खाल्यास चांगला फायदा होतो.रक्तातील लाल रक्त पेशी अर्थतातच लोहाचे प्रमाण वाढते व शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.आवळ्यातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुले मासिक पाळी मध्ये होणारा त्रास हि कमी होतो. मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव होत नाही.
- आवळा अँटी- आक्सिडेंटद्वारे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करत. फ्री. रॅडिकल्सचा संबंध वय वाढल्याची लक्षणे , सुरकुत्या व त्वचेवर डागांसी असतो. अन्नपचवण्यासाठी आवळा खुप जास्त उपयुक्त मानला जातो, आवळ्याचे सेवन केल्याने पोट दुखी , गॅस, आंबट ढेकर सारख्या समस्या दूर होतात. आवळा मुरंबा, ज्यूस , चुर्ण , आवळा कांडी, आवळा मुरंबा तुम्ही सेवन करू शकता.
- आवळ्यात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन पासून लढण्याची क्षमता असते. त्यामुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे गरजेचे आहे, जर आवळ्याचे सेवन रोज केले तर आपण आजारापासून दूर राहू.
- डायबीटीस रुग्णांसाठी आवळा अमृतासारखा आहे. आवळ्यात क्रोमियम तत्व आढळतात. जी इन्सुलिन हार्मोन्स मजबूत करून शुगरची पातळी / लेव्हल नियंत्रणात ठेवतात. तुम्हाला डायबीटीस असेल तर ज्यूस मध्ये थोडासा मध घालून प्या.
- आवळ्यातील क्रोमियम ह्र्दयासाठी फायदेशीर असत. याने ह्र्दय मजबूत आणि हेल्दी राहते. आवळ्यात बॅड कोलेस्ट्राल नष्ट करून गुड कोलेस्ट्राल तयार करते.
- खाल्याने हाडे मजबूत होतात. त्यात भरपूर कॅल्शियम असत. आवळ्याचा ज्यूस डोळ्यांसाठी चांगला मानला जातो, रोज सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात. मोतीबिंदू लवकर होत नाही.
शुगर साथी हिरवा आवळा
- शुगर / मधुमेह असलेल्या व्यक्तीने हिरव्या आवल्याचे सेवन केल्यास फायदा होतो. जास्त फायद्या साथी रसाचे सेवन करावे. आवळात विरघळणाऱ्या फायबर चा साठा मोठ्या प्रमाणात असतो. तो पचनास मदत करतो. रक्तप्रवाहातील साखर हळूहळू कमी करण्यास मदत करतो.
आवळ्याच्या विविध रेसिपी
हिरव्या आवळा ज्यूस
- हिरवा रंग असलेला मोठ्या आकाराचा आवळा निवडून त्याचा रस बनवावा आणि त्यात थोडे पानी आणि काळे मीठ घालावे. आणि सकाळी त्याचे सेवन करावे.
- बाजारात मिळणाऱ्या रस चा वापर करणे टाळावे त्यात केमिकल्स आणि रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेल्या असतो.
मूराबा
- 1 किलो आवळा
- अर्धा किलो साखर/ गूळ
- 2 चमचे रासायनिक चुना
- 10 कप पानी
- 2 चमचे लिंबू रस
- 5 विलायची दाणे
- थोडे काळे मीठ
- आवळा चांगला धुऊन साफ करावा रात्र भर चुन्यात फिजून ठेवावा.
- सकाळी काढा आणि चांगला धुवा आणि परत चुन्याच्या पाण्यात शिजवा. उकळून घ्या.
- पानी थंड झाल्यानंतर पाण्यातून काढून बाजूला ठेवा.
- साखरच्या पाण्यात , लिंबू पाणी , विलायची पुढ आणि काळ मीठ घालून सीरप तयार करा.
- 2 दिवस आवळा त्या सीरप मध्ये हवा बंद डब्यात घालून ठेवा.
- 2 दिवसानंतर तुम्ही आवळ्याचे सेवन करू शकता.
यकृताचे कार्य सुधारण्यासाठी आवळा लोणचे
- 150 ग्रॅम आवळा
- 4 चमचे तेल
- २ चमचे मोहरी
- १ मोठा लिंबू
- 3 ते 4 चमचे लाल तिखट
- 1 किंवा अधिक टीस्पून मीठ
- ¼ टीस्पून हळद
- 1 मोठी लसूण पाकळी, चिरलेली चिमूटभर मेथीचे दाणे
- नीट धुवून स्वच्छ कापडाने वाळवा.
- चाकू वापरून काही यादृच्छिक चीरे करा.
- मोहरी आणि मेथीचे दाणे घ्या, त्यांची बारीक पावडर करा.
- थोडे तेल घेऊन हलका सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- लसूण घालून गॅस बंद करा. काही काळ राहू द्या. लिंबाचा रस अपेक्षित इतर सर्व साहित्य जोडा.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घाला.
- हे सर्व नीट मिसळा आणि मीठ तपासा.
- एका काचेच्या कंटेनरमध्ये स्थानांतरित करा आणि दोन ते तीन दिवस विश्रांती द्या.
- कोरड्या चमच्याने पुन्हा मिसळा आणि आवश्यक असल्यास, आणखी थोडा लिंबाचा रस आणि मीठ घाला. भातासोबत किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.
या लेखमधून Mahitia1. in टीमच्या मुख्य लेखनातून आवळ्या खाण्याचे फायदे व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.