fee for ration card : आपल्या देशात आहे राज्यात आर्थिक निकषावर विविध स्तर तयार करण्यात आले आहेत आणि त्यानुसार रेशन कार्ड चे प्रकार सुद्धा आहेत. एकदम सध्या भाषेत सांगायचे झाल्यास पिवळे रेशन कार्ड , केशरी रेशन कार्ड आणि सफेद रेशन कार्ड हे वार्षिक उत्पन्नाच्या निकषावर वाटप करण्यात आले आहेत. आता ह्याच रेशन कार्ड मध्ये वेळेनुसार बदल करावे लागतात त्या नुसार सरकार नेमके किती फिस घेते याविषयी सामान्य माणसाला माहिती नसते म्हणून त्याची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. या लेखमधून fee for ration card याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी प्रक्रिया I Online Ration Card Maharashtra 2024
शासनामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या रेशन कार्ड ज्याला आपण शिधापत्रिका असेही म्हणतात म्हणतात. जेव्हा एखाद्या कुटुंबासाठी शासनाकडून रेशन कार्ड दिल्या जाते तेव्हा अर्ज करताना जितक्या कुटुंबातील सदस्याचा उल्लेख अर्जात केला जातो तेवढेच नावे रेशन कार्ड मध्ये विभागामार्फत जोडले जातात पण अश्या वेळ एक व्यक्ति चे नाव जोडायचे राहिले असल्यास , किंवा लग्न करून किंवा जन्म झालेल्या सदस्याचे नाव जोडायचे असल्यास त्याचा अर्ज करावा लागतो, नावात काही बदल किंवा चूक झाली असल्यास अर्ज करावा लागतो , कुटुंबातील महिला सदस्याचे लग्न दुसऱ्या घरी गेली असल्यास नाव कमी करण्यासाठी अर्ज करावा लागतो , एका कुटुंबाचे दोन कुटुंब झाले असल्यास नवीन रेशन कार्ड चा अर्ज करावा लागतो , असेच एक ना अनेक कारणाने रेशन कार्ड संदर्भातील कामे करण्यासाठी अर्ज करावा लागतो,कोणता अर्ज करतात नेमके कोणते कागदपत्रे लागतात याविषयी माहिती असणे सोबत कोणताही अर्ज करताना सरकार दरबारी नेमकी किती फिस fee for ration card भरावी लागते याविषयी माहिती नसल्यामुळे सामान्य माणसाचे खूळ धावपळ आणि हाल होतात. या लेखात रेशन कार्ड संदर्भातील कोणत्याही कामा नुसार नेमकी किती फिस भरावी याविषयी माहिती सोबत आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आहेत याविषयी माहिती खाली दिली आहे.
fee for ration card
- नवीन रेशन कार्ड तयार करणे
- रेशन कार्डमधील नाव दुरुस्त करणे
- रेशन कार्डमध्ये नावे (१६ वर्षांपेक्षा कमी) समाविष्ट करणे
- रेशन कार्डमधील नाव काढून टाकणे
- रेशन कार्डमधील पत्ता बदलणे
- रेशन कार्डची डुप्लिकेट प्रत (सदोष/फाटलेले रेशन कार्ड असल्यास )
- रेशन कार्डची डुप्लिकेट प्रत (रेशन कार्ड हरवल्यास)

वर नमूद केलेल्या रेशन कार्ड मध्ये बदल करण्यासाठी अर्ज करायचे असल्यास अर्ज करताना नेमका किती खर्च येतो आणि कोणती कागदपत्रे लागतात याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे सोबत किती दिवसाच्या अवधि लागू शकतो याविषयी सुद्धा माहिती दिली आहे.
1. नवीन रेशन कार्ड तयार करणे
- बंधनकारक कागदपत्रे :- घरभाडे पावती/देखभाल शुल्क पावती/नोंदणीकृत रजा परवाना करार/वीज बिल/टेलिफोन बिल (जर असेल तर)
- पर्यायी कागदपत्रे :- मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक
- फिस किती लागते :- पिवळ्या रेशन कार्डसाठी ५ रुपये, केशर रेशन कार्ड २० रुपये आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी ५० रुपये.
- अर्ज कोणता करावा :- अर्ज (फॉर्म-१) अर्ज भरावा जो तुम्हाला रेशन कार्ड दुकानदार किंवा तहसील ऑफिस मध्ये मिळेल.
- लागणार कालावधी :- एकदा का अर्ज केला त्यानंतर जेव्हा तुम्ही तहसील ऑफिस मध्ये सादर कराल त्यानंतर रेशनिंग निरीक्षक/पुरवठा , निरीक्षक सहाय्यक रेशनिंग अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी रेशनिंग अधिकारी/क्षेत्रीयअधिकारी/तहसीलदार/अन्न वितरण अधिकारी अश्या विविध अधिकाऱ्यामार्फत त्यावर कार्यवाही करून 30 दिवसानंतर अर्जदारास रेशन कार्ड दिल्या जाते.
पिवळे रेशन कार्ड काढा ऑनलाईन,नवीन सेवा सुरू,लगेच करा अर्ज | Online Ration Card Maharashtra 2025
2. रेशन कार्डमधील नाव दुरुस्त करणे
- बंधनकारक कागदपत्रे :- नाव बदलाचे राजपत्र / जन्म प्रमाणपत्र (जे लागू असेल ते)
- पर्यायी कागदपत्रे :-स्व-घोषणापत्र, विवाह प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड
- फिस किती लागते :- अर्ज शुल्क रु. २/-
- अर्ज कोणता करावा :- अर्ज (फॉर्म १४)
- लागणार कालावधी :- एकदा का अर्ज केला त्यानंतर जेव्हा तुम्ही तहसील ऑफिस मध्ये सादर कराल त्यानंतर रेशनिंग निरीक्षक/पुरवठा , निरीक्षक सहाय्यक रेशनिंग अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी रेशनिंग अधिकारी/क्षेत्रीयअधिकारी/तहसीलदार/अन्न वितरण अधिकारी अश्या विविध अधिकाऱ्यामार्फत त्यावर कार्यवाही करून 8 दिवसानंतर अर्जदारास रेशन कार्ड दिल्या जाते.
3. रेशन कार्डमध्ये नावे (१६ वर्षांपेक्षा कमी) समाविष्ट करणे
- बंधनकारक कागदपत्रे :- जन्म प्रमाणपत्र
- पर्यायी कागदपत्रे :- शाळेचा बोनाईड /शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड
- फिस किती लागते :- अर्ज शुल्क रु. २/
- अर्ज कोणता करावा :- Application (Form- 8)
- लागणार कालावधी :- एकदा का अर्ज केला त्यानंतर जेव्हा तुम्ही तहसील ऑफिस मध्ये सादर कराल त्यानंतर रेशनिंग निरीक्षक/पुरवठा , निरीक्षक सहाय्यक रेशनिंग अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी रेशनिंग अधिकारी/क्षेत्रीयअधिकारी/तहसीलदार/अन्न वितरण अधिकारी अश्या विविध अधिकाऱ्यामार्फत त्यावर कार्यवाही करून 8 दिवसानंतर अर्जदारास रेशन कार्ड दिल्या जाते.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा अभ्यासक्रम मराठीमधून PDF 2025
4. रेशन कार्डमधील नाव काढून टाकणे
- बंधनकारक कागदपत्रे :-कार्डधारक आणि ज्याचे नाव योग्य ओळखपत्रासह वगळायचे आहे – दोघांचीही प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे.
- पर्यायी कागदपत्रे :- शपथपत्र, विवाह प्रमाणपत्र/मतदार ओळखपत्र/आधार कार्ड
- फिस किती लागते :-अर्ज शुल्क रु. २/
- अर्ज कोणता करावा :-Application Form-9
- लागणार कालावधी :- एकदा का अर्ज केला त्यानंतर जेव्हा तुम्ही तहसील ऑफिस मध्ये सादर कराल त्यानंतर रेशनिंग निरीक्षक/पुरवठा , निरीक्षक सहाय्यक रेशनिंग अधिकारी/पुरवठा निरीक्षण अधिकारी रेशनिंग अधिकारी/क्षेत्रीयअधिकारी/तहसीलदार/अन्न वितरण अधिकारी अश्या विविध अधिकाऱ्यामार्फत त्यावर कार्यवाही करून 8 दिवसानंतर अर्जदारास रेशन कार्ड दिल्या जाते.
5. रेशन कार्डमधील पत्ता बदलणे
- बंधनकारक कागदपत्रे :-घरभाडे पावती/देखभाल शुल्क पावती/नोंदणीकृत रजा आणि परवाना करार/वीज बिल
- पर्यायी कागदपत्रे :- मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक
- फिस किती लागते :-अर्ज शुल्क रु. २/
- अर्ज कोणता करावा :-अर्ज (फॉर्म-१४) त्यानंतर पात्रता, पत्ता आणि कागदपत्रांची पडताळणी
- लागणार कालावधी :- 30 दिवस
6. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रत (सदोष/फाटलेले रेशन कार्ड असल्यास )
- बंधनकारक कागदपत्रे :- १) मूळ विद्रूप/फाटलेले रेशन कार्ड २) निवासी पुरावा- घरभाडे पावती/देखभाल शुल्क पावती/नोंदणीकृत रजा,परवाना करार, वीज बिल (कोणतेही दोन पुरावे)
- पर्यायी कागदपत्रे :- कोणतेही नाही
- फिस किती लागते :- पिवळ्या रेशन कार्डसाठी २० रुपये, केशर रेशन कार्डसाठी ४० रुपये आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी १०० रुपये.
- अर्ज कोणता करावा :- Application (Form-15) with defaced/Torn ration card
- लागणार कालावधी :- 8 दिवस
7. रेशन कार्डची डुप्लिकेट प्रत (रेशन कार्ड हरवल्यास)
- बंधनकारक कागदपत्रे :- १)_ हरवलेल्या रेशन कार्डची झेरॉक्स प्रत, पोलिस स्टेशनचा क्रमांक आणि रेशन कार्डधारकाचे प्रतिज्ञापत्र. २) निवासी पुरावा – घरभाडे पावती/देखभाल शुल्क पावती/नोंदणीकृत रजा आणि परवाना करार, विक्री करार, वीज बिल (कोणत्याही दोन)
- पर्यायी कागदपत्रे :- कोणतेही नाही
- फिस किती लागते :-पिवळ्या रेशन कार्डसाठी २० रुपये, केशरी रेशन कार्डसाठी ४० रुपये आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी १०० रुपये. अर्ज शुल्क २ रुपये.
- अर्ज कोणता करावा :- अर्ज (फॉर्म क्रमांक-१५) आणि त्यानंतर पत्ता आणि कागदपत्रांची पडताळणी
- लागणार कालावधी :- 30 दिवस
- अधिक माहिती साठी तुम्ही शासनाच्या अधिरकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. अन्न व पुरवठा विभाग व fee for ration वर क्लिक करा
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “वfee for ration card नवीन रेशन कार्ड, नाव बदलणे, वाढवणे, काढणे, नवीन रेशन कार्ड हे सर्व कामे करण्यासाठी नेमकी किती फिस लागते व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
सर्वाधिक वाचलेले