रेशन कार्ड नवीन काढणे|आपल्या कुटुंबातील लहान मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे जोडावे|आवश्यक आहे फक्त हे 5 कागदपत्रे

रेशन कार्ड नवीन काढणे : रेशन कार्ड ज्याला शिधापत्रिका या नावाने सुद्धा म्हणतात हे भारत सरकारकडून जारी केले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असून. ह्याच उपयोग फक्त सबसिडीयुक्त अन्नधान्य मिळविण्यासाठीच नाही तर सरकारच्या अनेक योजनाचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र आणि निवासी प्रमाणपत्र म्हणूनही वापरले जाते. आज या लेखामधून रेशन कार्ड नवीन काढणे आपल्या कुटुंबातील लहान मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे जोडावे आणि कोणते 5 कागदपत्रे आवश्यक आहे की ज्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याचे , लहान मुलाचे नाव अगदी सहज जोडू शकता. खाली पूर्ण माहिती दिली आहे.

रेशन कार्ड नवीन काढणे
रेशन कार्ड नवीन काढणे

rescan card document : आज भारतात एकूण 18,99,89,043 एवढे रेशन कार्ड धारक आहे तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 1,66,48,105 रेशन कार्ड धारक आहे. आणि ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत. जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये नवीन सदस्य जोडल्या जातो तेव्हा त्याव्यक्तीला रेशन कार्ड मध्ये त्याचे नाव जोडले आवश्यक असते कारण रेशन कार्ड फक्त मोफत अन्न योजना पर्यंत मर्यदित नसून रेशन कार्ड चा उपयोग अनेक ठिकाणी करता येतो, रेशन कार्ड प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. तर खाली आपण ह्याच रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी कसा अर्ज करावा कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत याविषयी सखोल माहिती दिली आहे.

रेशन कार्डचे महत्त्व

रेशन कार्ड हे केवळ सबसिडीयुक्त किंवा मोफत अन्नधान्य मिळविण्यापुरते मर्यादित नसून त्याचे अत्यंत महत्व आहे ते खालील प्रमाणे .

  1. ओळखपत्र : रेशन कार्ड हे व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरल्या जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.
  2. निवासी प्रमाणपत्र : बहुतेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक असते, जर संबधित व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडलेले असेल तर त्या व्यक्तीला रेशन कार्ड हे रहिवाशी प्रमाणपत्र म्हणून वापरता येते. अश्या काही योजना आहेत की त्या योजनाचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला रेशन कार्ड देणे बांधनकरक असते.
  3. शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र : शिष्यवृत्ती घेण्यासाठी हे समजून घेणे गरजचे असते कि विद्यार्थी कोणत्या प्रवर्गातील आहे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न काय हे समजून घेण्यासाठी रेशन कार्ड चा उपयोग करता येतो आणि त्या आधारावर शिष्यवृत्ती चा लाभ दिला जाऊ शकतो .
  4. सरकारी योजनांचा लाभ: अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते.
  5. इतर महत्त्वाचे उपयोग :- बँकेत खाते उघडण्यासाठी. नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी. मतदार ओळखपत्र काढण्यासाठी. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी. शाळेत प्रवेश घेण्यासाठी. पॅनकार्ड काढण्यासाठी. कर्ज मिळवण्यासाठी. आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी. शाळेतील शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इत्यादी यासारख्या अनेक ठिकाणी रेशन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे

रेशन कार्ड चे प्रकार आणि त्यानुसार मिळणारा लाभ

रेशन कार्डचा प्रकारवार्षिक उत्पन्नवैशिष्ट्ये
अंत्योदय अन्न योजना (AAY)सर्वात कमी उत्पन्न गट (दारिद्र्य रेषेखालील)सर्वात स्वस्त दरात धान्य, दरमहा 35 किलो धान्य
प्राधान्य कुटुंब (PHH)दारिद्र्य रेषेखालीलप्रति व्यक्ती दरमहा 5 किलो धान्य, अनुदानित दरात धान्य
पांढरे रेशन कार्डदारिद्र्य रेषेवरीलअनुदानित दरात धान्य मिळते, परंतु AAY आणि PHH पेक्षा कमी सवलत.
एपीएल(APL) रेशन कार्डवार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त.हे रेशन कार्ड सामान्य कुटुंबांसाठी आहे.
टीप :-
रेशन कार्डचे नियम आणि पात्रता राज्य सरकारांनुसार बदलू शकतात. त्यामुळे राज्यातील अधिकृत वेबसाइट भेट देऊन माहिती पाहू शकता.
रेशन कार्डसाठी अर्ज करताना, कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा सादर करणे अत्यंत आवश्यक असते.त्यावर ठरते की एखाद्या कुटुंबाला कोणते रेशन कार्ड मिळू शकते.
महाराष्ट्र राज्यात रेशन कार्डाचे रंगानुसार प्रकार पडतात. जसे कि, पिवळे, केशरी, पांढरे ( पिवळे – दारिद्र्य रेषे खालील , केशरी व सफेद – दारिद्र्य रेषे वरील )

ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज कसा करावा?

रेशन कार्ड नवीन काढणे

रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे (विशेषत: मुलाचे मुलाचे/मुलीचे ) नाव जोडण्यासाठी खालील प्रक्रियेचे पालन केल्यास तुम्ही अगदी सहज तुमचा अर्ज पूर्ण करून कुटुंबातील सदस्याचे नाव आपल्या रेशन कार्ड वॉर जोडू शकता. खाली दोन्ही प्रकरच्या प्रक्रिया दिल्या आहेत जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव ऑनलाईन पद्धतीने जोडायचे असल्यास त्याची पद्धत आणि जर ऑफलाईन जोडायचे असल्यास त्याची पद्धत सुद्धा दिली आहे .

ऑनलाइन पद्धत

  1. संबंधित राज्याच्या अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. महाराष्ट्र रेशन कार्ड
  2. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्य जोडण्याचा पर्याय निवडा.
  3. आवश्यक माहिती भरा: जस कि (कुटुंब प्रमुखाचे नाव , रेशन कार्ड नंबर,नवीन सदस्याचे नाव,जन्म तारीख,आधार कार्ड नंबर
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा : जस कि नवीन सदस्याचे जन्म प्रमाणपत्र ,आधार कार्ड,कुटुंब प्रमुखाशी नातेसंबंध दर्शविणारे प्रमाणपत्र
  5. नवीन नाव जोडणीची फीस भरा.
  6. अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांक येईल त्या अर्ज क्रमांकाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.

ऑफलाइन पद्धत

  1. जवळच्या रेशन दुकानात किंवा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयात जा. जर अर्जदार गावात राहत असतील तर आपल्या गावातील रेशन दुकानदार (स्वस्त धान्य दुकानदार ) याची भेट घ्या . किंवा तहसील कार्यलयास भेट देऊन सुद्धा अर्ज करता येतो.
  2. रेशन कार्डमध्ये नवीन सदस्य जोडण्याचा अर्ज त्याच्या कडून प्राप्त करा
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्र जोडा
  4. नवीन नाव जोडणीचा फीस भरावी लागेल.
  5. पोचपावती घ्या पुढील काही दिवसात अर्जदार कुटुंबातील लहान सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्य जोडलेले असेल

रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

वर नमूद केल्याप्रमाणे रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा कुटुंबातील नवीन सदस्य , लहान मूल यांचे नाव जोडण्यासाठी खालील 5 कागदपत्रे असणे आवश्यक असतात. खाली यादी दिली आहे .

  1. आधार कार्ड : कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्या आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
  2. निवास प्रमाणपत्र: लाइट बिल, पणीपट्टि , घरपट्टी पावती, भाडेकरार नामा पैकी कोणतेही एक दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
  3. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचे ओळखपत्र : मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड इत्यादी पैकी एक
  4. कुटुंबाचा फोटो: कुटुंबातील सर्व सदस्यांसह एक फोटो
  5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र: उत्पन्नाचा दाखला, पगार पावती, आणि जर अर्जदाता इनकम टॅक्स भरत असल्यास त्याची पावती.

सर्वाधिक वाचलेले

  1. आज पर्यन्त झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यादी pdf (1956 -2025)
  2. आईच्या मालमत्तेचा कायदेशीर वारस कोण? जाणून घ्या महत्त्वाची माहिती!
  3. अतिशय सोप्या पद्धतीने करा तुमच्या रेशन कार्ड केवायसी, ration card ekyc online maharashtra
  4. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी मध्ये झालेत हे नवीन बदल!
  5. महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी मध्ये झालेत हे नवीन बदल!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top