महाराष्ट्र सरकार मार्फत राबवण्यात येणारी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना मधून पूर्वी २ .५ लाख रुपयाचा विमा दिला जात होता पण आता सप्टेंबर २ ० २ ४ मध्ये या विमा रकमेत खवघवित वाढ करण्यात आली असून ती वाढ प्रति कुटुंब या नुसार असेल. राज्य शासनाने जनसामान्यांचे आरोग्य जोपासण्यास प्रथम प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध पातळीवर विविध निर्णय घेण्यात येत आहेत. या निर्णयांमध्ये उपचाराचा खर्च न पेलणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या साठी निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे जनसामान्यांना दिलासा मिळणार आहे . याशिवाय नियमित सामान्य आरोग्य तपासणी करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे . समाजातील प्रत्येक घटकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी अभियान शासन राबवित आहे. राज्याची महत्त्वाची योजना असलेल्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याचे’ प्रति कुटुंब वार्षिक मर्यादा वाढविण्यात आली आहे. या निर्णयांमुळे आज कुठलाही मोठा आजार झाल्यास उपचार करण्याची चिंता राहणार नाही. पूर्वी २ .५ लाखापेक्षा जास्त खर्च झाला तर नागरिकांना स्वतःच्या खिशातून तो पैसे भरावा लागत होता पण आता ह्या शासनाच्या निर्णयामुळे यापुढे अतिरिक्त खर्चाची चिंता नागरिकांना भेडसावणार नाही सोबत या वाढीव रक्कमेसोबत शासनारे इतर अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे या लेखामध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना रक्कमेत वाढ आणि इतर सुविधा कोणत्या दिल्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत . त्यामुळे लेख पूर्ण वाचा .
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रक्कमेत वाढ.
2012 साली जेव्हा या योजनेची सुरुवात प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील काही निवडक जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आली तेव्हा या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी योजना असे होते त्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले. 2013 नंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली. योजनेच्या सुरुवातीला कमी उत्पन्न असलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येत होता पण वेळेनुसार या योजनेचा विस्तार करण्यात आला आणि आता इतर लाभार्थी गटाला सुद्धा या योजनेमद्धे समाविष्ट करून घेण्यात आले आहे. सुरुवातीला या योजनेमधून दारिद्य रेषेखालील कुटुंबास २ .५ लाखाचा मोफत विलाज मिळत असे , सरकारी किंवा खाजगी दवाखाण्यात जरी तुम्ही विलाज घेतला तरी २ .५ लाखांपर्यत सीमा होता पण त्यापेक्षा जास्त खर्च झाला तर प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेमधून ५ लाखाचा विलाज मोफत मिळत असे परंतु जर तुमचा खर्च ३ लाख झाला तर अश्या वेळी तुम्हाला प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी नागरिक पात्र ठरत नव्हते अश्या वेळी नागरिकांना त्यांच्या खिश्यातुन पैसे खर्च करावे लागत होते पण आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रक्कमेत वाढ झाल्यामुळे त्यांची चिंता भेडसावणार नाही सोबत इतरही अनेक सुविधा मिळणार आहेत म्हणून out of pocket expenditure ( आरोग्य सेवेचा खिश्यावर पडणार इतर खर्च ) कमी होण्यास मदत होणार आहे आणि ती महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रक्कमेत वाढ नेमकी किती
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विमा संरक्षण रक्कम २ .५ लाखांहून 5 लाख रूपये एवढी करण्यात आली आहे . सर्वसामान्यांना खासगी दवाखान्यातील २ .५ लाख रुपयांची बिले देण्या पेक्षा योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत मिळत आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरील सरकारी व खाजगी दवाखाने आता या योजनेचा लाभ रूग्णांना देऊ शकणार आहेत. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेतंर्गत लाखो रूग्णांवर याअगोदर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून . कर्नाटक सीमा भागात ८ ० ० पेक्षा जास्त गावांमध्ये मराठी भाषिकांना ही योजना लागू करण्यात आली आहे. या भागातील गरजू नागरिकांना योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात आला आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचा लाभही अडीच लाखांवरून चार लाखांपर्यंत नेण्यात आला आहे. त्यामुळे यासंदर्भात जे कोणी लाभ घेऊ इच्छित असतील किंवा जे प्रतीक्षेत आहेत, हे आता ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना इतर सुविधा
- महाराष्ट्र राज्य शासनाने नुसते रक्कमेत वाढच केली नाही तर मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital ) मध्ये डायलिसीस सेवा/dialysis service , हिमोफिलीयाग्रस्त रूग्णांसाठी प्रत्येक जिल्हा रूग्णालयात ‘हिमोफिलिया डे’ केअर केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- गर्भधारणापूर्व माता व दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ ही विशेष योजना
- कमी वजनाच्या बालकांसाठी NRC ची सुरुवात करण्यात आली
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मधून तुम्ही तुमच्या शरीराच्या सर्व तपासण्या करून घेऊ शकता त्याचा सर्व खर्च शासन करेल.
- राज्यात आधुनिक उपकरणासहित व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह 1 हजार 756 ऍम्ब्युलन्स खरेदीचा निर्णयही घेण्यात आला आहे.
- यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने उपचार मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या 36 ठिकाणी उपलब्ध शववाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून 352 ठिकाणी लवकरच ही सेवा देण्यात येणार आहे. अशाप्रकारे राज्य शासनाने जनसामान्यांच्या उपचाराची काळजी घेण्यासाठी विविध निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा
- कोणतेही एक ओळख पत्र ,RGJAY/MJPJAY चे हेल्थ कार्ड , अपंगत्व असल्यास त्याचे प्रमाणपत्र , फोटो असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड , सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
- वरील सर्व कागदपत्र सोबत ठेऊन जेव्हा नागरिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पंजीकृत दवाखान्यात जाईल अश्या दवाखान्यात आरोग्य मित्र ची नेमणूक शासनामार्फत करण्यात आली आहे. हे आरोग्य मित्र तुमचा अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करतील व पुढे कोणकोणती पावले उचलावे लागतील याविषयी सखोल माहिती देतील आणि रुग्ण दवाखान्यात दाखल झाला तेव्हा पासून तर रुग्णास सुट्टी मिळेपर्यत आरोग्यमित्र मदत करेल.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिकृत दवाखाण्याची यादी कशी पाहायची
तुम्ही ज्या शहरात राहत आहेत आणि तुमचा जवळचे रुग्णालय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सोबत जोडले आहेत कि नाही ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुही अगदी काही वेळात पाहू शकता . सोबत त्या रुग्णालयात तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळतील याविषयी सुद्धा माहिती तुम्ही त्या वेबसाईट वर पाहू शकता .
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या योजनेच्या वेबसाईट वर जा
- Advanced Search असा एक बॉक्स ओपन होईल. त्या यामध्ये पुढील माहिती भरा .
- जिल्याची निवड करा .
- तालुक्याची निवड करा
- तुम्हाला जर दवाखान्याची नावे माहिती असतील तर तुम्ही नाव टाकून सुद्धा माहिती मिळवू शकता.
- वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या समोर संबंधित हॉस्पिटल ची यादी येईल यामध्ये तो हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेला आरोग्य सेवा आणि संपूर्ण पत्ता .
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रक्कमेत वाढव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.