महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 – महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 , 27 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना जाहीर करण्यात आली आहे . या योजनेचा मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांच्या कर्जा चा बोजा कमी करणे. महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 या योजनेने अनेक शेतकऱ्यांना दिलासा दिला, परंतु अंमलबजावणीच्या प्रक्रियेत काही आव्हानेही उद्भवली आहेत. ते खाली दिले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 रूपरेषा
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना या योजनेअंतर्गत, अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय सरकार ने जुलै 2022 मध्ये घेण्यात आला होता. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. योजनेच्या पात्रतेसाठी 2017-18, 2018-19, आणि 2019-20 या तीन आर्थिक वर्षांचा विचार करण्यात येणार आहे. ( ह्या मध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सर्वानी अधिकृत वेबसाइट चेक करत राहावी)
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024
योजनेचे नाव | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी कोण ? | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
कधी सुरुवात झाली | 2024 |
लाभ | 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी |
अर्ज कसा करावा | ऑफलाइन |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
What’s App channel | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
कोण पात्र आहे ?
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात ते खालील प्रमाणे.
- वरील तीन आर्थिक वर्षांपैकी किमान दोन वर्षांमध्ये अल्पकालीन पीक कर्ज घेतलेले असावे. ( मार्च 2017 – एप्रिल2018 ते मार्च 19- एप्रिल 20
- घेतलेले कर्ज शेतकाऱ्यांने वेळेवर अर्जाची परतफेड केलेली असावे.
- एकाच आर्थिक वर्षात एकापेक्षा जास्त वेळा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर घेतला असते तर तो शेतकरी या योजनेसाठी अपात्र होईल.
अपात्र कोण ?
- महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी, अधिकारी (चतुर्थ श्रेणी वगळता)
- सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँक, सहकारी सूतगिरणी यांचे संचालक मंडळ आणि या संस्थांमधील 25000 हून अधिक मासिक वेतन काढणारे अधिकारी हे अपात्र आहेत .
- रु.3000 पेक्षा जास्त पेन्शन प्राप्त करणार्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहे.
- कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे करणारे आणि जोडधंदे करणारे कर्मचारी जे इनकम टॅक्स
- केंद्र आणि राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी (मासिक पगार 25 हजारांपेक्षा जास्त) (चतुर्थ श्रेणी वगळता) बाकी सगळे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत .
लाभ काय मिळेल
- सरकार कर्जमुक्तीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात भरणार आहे.
- शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाणार आहे.
- शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सोपी आणि पारदर्शक पद्धत शासन मार्फत तयार करण्यात आली.
- 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आणि पुनर्रचित पीक कर्ज माफ केले जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 कागदपत्रे
या योजनेंतर्गत अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजनेंतर्गत, सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सोबत ऊस, फळे यासह इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. त्या साठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- बँक अधिकारी फक्त त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
या लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने ” महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024 तुम्ही पात्र आहात की अपात्र ” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- महाज्योती mahajyoti अंतर्गत मिळणार मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक लाभ
- काय आहे आषाढी वारी चा इतिहास आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक एवढी गर्दी का करतात
- नगर वन उद्यान योजना! वन जमिनीवर निर्माण होणार ‘200’ नागरी जंगले
- महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ज्या मधून तुम्हाला मिळेल आर्थिक लाभ
- अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे