आताच जाहीर झालेल्या माझी लाडकी बहिण योजना महिला वर्गासाठी अतिशय महत्वाची योजना समजली जात आहे आणि संपूर्ण महाराषट्रातील प्रत्येक घरात याच योजनेची चर्चा आहे. सुरुवातीला या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी शासनाने अर्ज भरण्यास मुदत वाढ दिली आहे सोबत लागणाऱ्या कागदपतत्रामध्ये सुद्धा मोठी सूट दिली आहे आता तुम्हाला काही वेगळी कागद पत्र काढायची गरज भासणार नाही आणि मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज ,आणि अतिशय महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणत्याही सेतु सुविधा केंद्रावर जायची गरज नाही , तालुक्यावर जायची गरज नाही.व कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडण्याची गरज नाही त्यासाठी शासनाने या योजनेचा अर्ज आपल्याला आपल्या मोबाईल वर उपलब्ध करून दिला आहे .आता आपण आपल्या घरी बसून अर्ज भरू शकता पुढील पूर्ण लेख वाचून तुम्ही अगदी सहज लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता.
काय आहे लाडकी बहीण योजना ?
पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प २०२४ साधार केला यामध्ये विविध योजनाचा त्यांनी अंमलबजावणी केली आहे शेतकरी, महिला ,व सर्यांवसामान नागरिकाला त्याचा लाभ मिळणार आहे यामधील एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना घोषणा केली आहे. मध्यप्रदेश च्या धर्तीवर या योजनेची रचना आहे मध्यप्रदेश मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी लाडली बहेना योजना सुरु केली होती.महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील समबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 60 टक्के व स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे ही महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील समबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 60 टक्के व स्त्रियांची टक्केवारी 28.70 टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेने खूप कमी असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर मोठा परिणाम होत आहे सदर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने आज दिनांक 28 मे 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत सर्व महिलांना मासिक 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा वाचा खालील लेख.
मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
- सर्वात अगोदर आपली मोबाईलवर आप स्टोर वर जाऊन नारी शक्ती हे अप्लिकेशन डाउनलोड करा. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाइट असून त्या वर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व महिलांचे अर्ज भरू शकता.
- मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
- हे app चे वरील स्क्रीन आहे.
- app डाउनलोड केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमच पूर्ण नाव टाकून नोदणी पूर्ण करावे लागणार आहे , ( नाव नोदणी करताना तुम्ही मोबाईल वरून लाडकी बहिण योजनेचा फोर्म भरत नाहीयेत फक्त त्या app मध्ये तुम्ही स्वतःची नोदणी करत आहात .
- नोदणी केल्यानंतर वरील स्क्रीन तुम्हाला दिसेल. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यावर क्लिक करून अर्जामध्ये प्रवेश होतो.
- मुख्य अर्ज
- महिलेचे पूर्ण नाव ( आधार कार्ड प्रमाणे ) ( ) हा पहिला प्रश्न असेल त्या मध्ये तुम्ही तुमच्या अर्जदार महिलेचे आधार कार्ड मध्ये जसे नाव आहे तसेच नाव भरा.
- पतीचे / वडिलाचे नाव ( ) विवाहित महिलेचे लग्नानंतर चे नाव आधार कार्ड वर बदलले असेल तर तुमच्या वडीलचे पूर्ण नाव इथे भरा.
- जन्म दिनांक ( ) जेव्हा तुम्ही जन्म दिनांक भरण्यासाठी क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एक टेबल दिसेल त्यामधून तुम्ही अर्जदार महिलांची जन्म तारीख निवडा , लक्षात ठेवा जन्म तारीख दिनांक /महिना /वर्ष यास्वरुपात असावे . ( जसी तुम्ही योग्य जन्म तारीख नमूद कराल लगेच तिथे अर्जदार महिलेचे वय येईल. मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज ,
- अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती
- अर्जदाराचा सपूर्ण पत्ता ( ) पत्ता भरत असताना आधार कार्ड वर असलेला पत्ता टाकावा
- जन्माचे ठिकाण ( ) ह्या मध्ये आपल्या ज्या ठिकाणी जन्म आला त्या ठिकाणच्या जिल्ह्याची निवड करायची आहे.
- तालुका ( ) ठिकाण निवडल्यानंतर लगेच तालुका सुद्धा निवडावा.
- गाव / शहर ( ) जन्म गाव किंवा शहर निवडायचा आहे .
- ग्राम पंचायत / नगरपंचयत/ नगरपालिका ( ) आपल्या ग्राम पंचायत / नगरपंचयत/ नगरपालिका चे व्यवस्थित नाव भरा .
- पिन कोड ( ) आपल्या आधार कार्ड वर असेल तो पिन कोड त्यामध्ये भरा
- मोबाइल नंबर ( ) अर्जदार महिलेच्या आधार कार्ड वर रजिस्टर असलेला मोबाइल नंबर येथे भरा .
- आधार क्रमांक ( ) 12 अंकी आधार कार्ड नंबर येथे भरा.
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजेनेचा लाभ घेत आहात का ? ( ) जर अर्जदार महिला आर्थिक लाभच्या योजेनचा लाभ घेत असेल तर होय या बाटणवर दाबावे आणि घेत नसेल तर नाही या बाटणवर दाबावे .
- जर अर्जदार महिला इतर आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याची रक्कम पुढील रकण्यात भरावी. इतर आर्थिक लाभाच्या योजना उदा. संजय गांधी निराधार योजना, श्रवण बाळ योजना व पेशन योजना )
- महिला व बाल विकास मंत्रालय ( ) लाभार्थी योजना / गरजू व्यक्तीची समस्या / इतर योजना मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना असे अगोदरच दिलेले असेल तुम्हाला काही करायची गरज नाही.
- वैवाहिक स्थिती ( ) वर क्लिक केल्यावर अनेक पर्याय येतील ( अविवाहित , विवाहित , विधवा, परितक्त्या , निराधार , घटस्फोटीत ) त्यापैकी अर्जदार महिला ज्या पर्यायामध्ये बसत असेल त्यावर क्लिक करावे .
- महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ( ) महिला विवाहित , विधवा, परितक्त्या ,घटस्फोटीत असेल तर लग्नापूर्वीचे नाव टाकावे आणि अर्जदार महिला अविवाहित असेल सध्या असलेले नाव भरावे , नाही भरले तरी चालेल कारण हा प्रश्न बधानकारक नाहीये .
- महिलेचा जन्म परप्रातींयात झाला आहे का ? ( ) होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे . जर अजर्दार महिलांचे जन्म महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यात झाला असेल तर होय या बटनावर लिंक करा.
- अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील
- बँकेचे नाव ( ) अर्जदार महिलेच्या ज्या बँक मध्ये खाते आहे त्या बँकचे पूर्ण नाव रकान्यात भरा .
- बँक खाते धारकाचे नाव ( ) अर्जदार महिलेचे बँक पासबुक वर आसेलेले पूर्ण नाव टाका.
- बँक खाते क्रमांक ( ):अर्जदार महिलेच्या बँक पासबुक वर असलेला खाते क्रमांक रकान्यात प्रविष्ट करा.
- IFSC कोड ( ):ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचा IFSC कोड येथे टाका.
- आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का ?:याचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्याचे आहे .आधार कार्ड जर बँक खात्याला जोडले असेल तर होय आणि जोडले नसेल तर नाही हा पर्याय निवडावा .अर्जदाराने आधार कार्ड बँक खात्याला जोडणे आवश्यक आहे .आधार कार्ड बँकेशी सलग्न झाल्यानंतरच फोर्म भरावा. मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
13.खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी :या पर्यारा खाली दिलेल्या रकान्यात कागदपत्राचे फोटो टाकायचे आहेत त्यामाडते खालील प्रमाणे रकाने आहेत. मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
- पहिल्या रकान्यात आधार कार्ड चा फोटो अपलोड करावा
- दुसर्या रकान्यात रहिवासी प्रमाणपत्र /जन्माचे प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला (टी सी ) यापेकी एकाचा फोटो अपलोड करा
- तिसऱ्या रकान्यात उत्पन्न् चे प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एकाचा फोटो टाका
- चौथ्या रकान्यात अर्जदाराचे हमीपत्र टाकावे .त्याचा नमुना मोबाईल अप्लिकेशन मध्ये दिला आहे तो तुम्ही कोर्या कागदावर लिहून किवा त्याची झेरोक्स काढून त्याचा फोटो येथे टाका
- त्या खालच्या रकान्यात बँक पासबुक च्या पाहिल्या पानाची झेरोक्स टाकायची आहे
- महिलेचा जन्म जर परराज्यातील आसेल तर तिच्या पतीचे महाराष्ट्र मधील रहिवासाचे कागदपत्र येथे टाकावेत
- सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो या पर्याय वर क्लिक करून अर्जदाराचा फोटो काढावा.
- शेवटी दिलेल्या हमिपत्र या पर्याय मध्ये जाऊन उत्पन किवा शासकीय नोकरी ,शासकीय योजना याबद्दल दिलेल्या आटी वाचून सर्वात शेवटी दिलेला स्वीकारा हा पर्याय क्लिक करावा
हे सगळे व्यवस्थित व अचूक भरून झाल्यानंतर तुम्ही माहिती जतन करा या पर्याय वर क्लिक करून सबमीट करा आता तुमचा फोर्म भरून झाला आहे त्यानंतर तुम्हाला त्या फोर्म चे स्टेटस दिसेल व SMS द्द्वारे अर्ज सफलता पूर्व प्रविष्ट झाला असे कळवण्यात येईल.
मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज पूर्ण झाला .
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून आता करा आपल्या मोबाईल वरून लाडकी बहीण योजनेचा अर्जव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल. वाचा पूर्ण लेख
- शबरी आदिवासी घरकुल योजना:आता मिळणार सर्वाना आपल्या स्वप्नातील घर !
- काय आहे आषाढी वारी चा इतिहास आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक एवढी गर्दी का करतात
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने योजना समाज कल्याण विभाग २०२३
- कसे पाहावे आधार कार्ड आणि पैन कार्ड लिंक आहे की नाही Adhar and pan Card Link status