माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल. वाचा पूर्ण लेख

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आताच  जाहीर झालेल्या माझी लाडकी बहिण योजना महिला वर्गासाठी अतिशय महत्वाची योजना समजली जात आहे आणि संपूर्ण महाराषट्रातील प्रत्येक घरात याच योजनेची चर्चा आहे. सुरुवातीला या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी 1 जुलै ते 15 जुलै या 15 दिवसातच अर्ज करायचा पण थांबा मागील 2 दिवसात या योजनेमध्ये राज्य शासनामार्फत महत्त्वपूर्ण बदल करुन योजनेला अजून परिपूर्ण बनवण्याचा पर्यत करण्यात आला आहे. माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल झाले आहेत वाचा पूर्ण लेख..

माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल
माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल

माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल

  •  जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी फक्त १५ दिवसाची मुदत देण्यात आली होती परंतु कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी येवढा वेळ पुरेशा नसल्याने आणि विविध स्तरावरून मागणी झाल्याने राज्य शासनाने सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत मुदत वाढ दिली आहे.
  • लाभार्थी महिला दिलेल्या मुदतीमध्ये म्हणजेच ०१ जुलै २०२४ ते 3१ ऑगस्ट २०२४ पर्यंत कधीही अर्ज करत असेल तर या महिलेला ०१ जुलैपासूनच लाभासाठी ग्राह धरले जातील जाणार आहे.
  • पूर्वी या योजनेच्या पत्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आहे होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी पांढरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे गरजेचे आहे
  • माझी लाडकी बहिण योजनेत पूर्वी पाच एकर शेतीची अट ठेवण्यात आली होती आता ती सुद्धा वगळण्यात आली आहे त्यामुळे ज्यांच्याकडे ५ एकर पेक्षा जास्त शेती आहे त्या महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • माझी लाडकी बहिण योजनेत पूर्वी लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा कमीतकमी २१ आणि जास्तीत जास्त ६० अशी ठेवण्यात आली होती आता त्यामध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे कमीत कमी वयाची मर्यादाकायम ठेवत जास्तीत जास्त वयोमर्यादेत बदल करून ते ६० वर्षावरून ६५ वर्ष करण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र अन्य दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रतील रहिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा महिलांना त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे असा शासनाने निर्णय घेतला आहे. माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल.
  • ज्या लाभार्थी महिलेकडे २.५ लक्ष उत्पन्नाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसेल आणि कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्याच्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सुत देण्यात येत आहे.
  • माझी लाडकी बहिण योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
  • माझी लाडकी बहिण योजनेत अर्ज करताना कोणतेही शुल्क द्यायची गरज नाही आणि तसी कुणी मागणी केल्यास तुम्ही त्याची तक्रार करू शकता जिल्हा पातळीवर एक समिती गठीत करण्यात येईल ती समिती तत्काळ तक्रारीचे निवारण करेल.

माझी लाडकी बहिण योजनेत कोण आहे पात्र

  • महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांना याचा लाभ मिळणार
  • माझी लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट २१ ते ६५ वर्ष आहे.
  • माझी लाडकी बहिण योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • माझी लाडकी बहिण योजनेत लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहिण योजनेत लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक

  1. १. ऑनलाईन अर्ज ( अर्ज करताना  अर्जदार स्वतः समोर असणे बंधनकारक आहे )
  2. अर्जदाराचे  आधार कार्ड.
  3.  अर्जदाराचे बँक पासबुक
  4. डोमासाइल किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा १५ १५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
  5. उत्पनाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड ( उत्पन्नाचा दाखला  रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावा )
  6. फोर्म भरताना एवढेच कागदपत्रे लागतील

अधिक माहिती साठी तुम्ही महिला व बाल कल्याण च्या वेबसाईट भेट देऊ शकता महिला व बाल कल्याण 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल. वाचा पूर्ण लेखव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top