राज्यात आणि देशात शेतकरी व्यक्तीसाठी आणि कुटुंबासाठी केद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजमधून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो त्याचबरोबर त्यांना अनेक शेती उपयोगी वस्तु आणि साधने मिळतात पण ज्या व्यक्ति किंवा कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही जे कुटुंब शेतमजूर आहे अश्या शेतकार्याचे काय तर शासन त्यांच्या साठी पण विशेष योजना राबवत आहे. पण त्या योजनाच लाभ घेण्यासाठी तुमच्या कडे भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखल असणे आवश्यक आहे म्हणून या लेखातून भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी अतिशय अभ्यासपर्ण आणि सखोल लेख तुमच्यासाठी
भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे , प्रमाणपत्र काढून घ्या अनेक योजनेचा लाभ
आपल्या देशात ज्या शेतकरी कुटुंबाकडे शेती करण्यासाठी शेत जमीन नाही असे शेतकरी कुटुंब बहुदा शेतमाजुरी करतात, सालाने राहतात त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह शेतजमुरी किंवा इतर कामावर आधारलेला असतो. बहुतेक वेळा त्यांचा त्यांच्या कुटुंबास सोडून इतर शहरात मंजूरी साठी स्थळातरीत व्हाव लागत अश्यात त्या पूर्ण कुटुंबाचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान अतिशय खालच्या दर्जाचे होते. बहुतेक वेळा त्यांना आरोग्याच्या सुविधा, शिक्षण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे त्याच्या येणाऱ्या पिढीचे पण नुकसान होते. ह्या सर्व बाबीचा विचार करून केद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत भूमिहीन शेतकरी साठी अनेक योजना राबवल्या जातात पण त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे भूमिहीन प्रमाणपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून या लेखातून भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे या विषयी सखोल माहिती तुमच्या साठी लेख पूर्ण वाचा.
भूमिहीन कोणास म्हणावे
भारत देशात रहिवाशी असलेल्या व्यक्ति कडे स्वतःच्या मालकीची कोठेही , कोणत्याही गावात , शहरात , राज्यात अल्प प्रमाणात किंवा मुभलक प्रमाणात जमीन नाही व त्या सदरील व्यक्तीचा संपूर्ण उदरनिर्वाह हा दुसऱ्याच्या शेतावर मंजूरी किंवा अन्य मंजूरी किंवा कोणतेही काम करून तो उदरनिर्वाह करत असेल तर त्यास भूमिहीन म्हणतात. अशी व्याख्या शासनामार्फत करण्यात आलेली आहे.
सर्व साधारणपणे हीच व्याख्या सर्व स्थरावर करण्यात येते आणि तीच व्याख्या अतिशय योग्य असून खूप ग्रामीण भागातील लोकाना त्याविषयी माहिती नाहीये म्हणून या लेखातून याविषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे सोबत भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी सविस्तर माहिती.
भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र.
भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी माहिती जाणून घेत असताना भूमिहीन प्रमाणपत्र काढणीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात. ते पुढील प्रमाणे
ओळख पात्र ( किमान एक )
- Pan Card पॅन कार्ड
- Passport पासपोर्ट
- RSBY card आरएसबीए कार्ड
- Aadhar Card आधार कार्ड
- Voter ID card इलेक्शन कार्ड
- MREGA Job card मनरेगा जॉब कार्ड
- Driving Licence ड्रायविंग लेसन्स
- Applicant Photograph अर्जदारचा एक पासपोर्ट फोटो
- Semi-government ID card शासकीय आणि निम- शासकीय ओळखपत्र
रहिवाशी प्रमाणपत्र ( किमान एक)
- Passport – पॉससपोर्ट
- Ration Card (रेशन कार्ड ( सफेद , केशरी किंवा पिवळे )
- Rent Receipt – (भाड्याने राहत असाल तर भाडेतत्वाचा करारनामा )
- Telephone Bill – (टेलिफोन बिल )
- Driving Licence – ड्रायविंग लेसन्स
- Electricity Bill- लाइट बिल
- Water charge Bill – पानी बिल
- Voter list Extract – मतदानाचे यादीमधील अर्जदाराचे नाव असलेले यादी
- 7/12 and 8-A Extract – 7/12 व 8 अ चा अर्क उतारा
- Property Extract Receipt – मालमत्ता उतारा पावती
- Property Registration Extract – मालमत्ता नोंदणी अर्क
अनिवार्य कागदपत्र ( किमान एक)
- Self-Declaration – स्व-घोषणा
- 7/12 and 8-A Extract of the respective land – 7/12 आणि 8-अ संबंधित जमिनीचा उतारा
भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे
भूमिहीन प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र ज्या शेतकाऱ्याकडे शेती नाही अश्या शेतकऱ्यांसाठी शेती नसल्याचा पुरावा आहे . ह्या प्रमानपत्राचा वापर करून भूमिहीन शेतकरी अनेक शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यामुळे भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे हे समजून घेणे अत्यंत गरजेच आहे. भूमिहीन प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्या राज्यात दोन्ही पद्धती उपलब्ध आहेत. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने भूमिहीन प्रमाणपत्र काढू शकता. अर्ज कसा करावा हे समजून घेणीसाठी खालील लेख पूर्ण वाचा.
- ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
- संबंधित तालुका किंवा जिल्ह्यातील तहसील कार्यालयास भेट द्या.
- तहसील कार्यालयाच्या आवारात तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जाचा नमूना मिळेल तो नमूना घेणून पूर्ण व्यवस्थित भरा
- सोबत तुमचे स्व- हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. हमीपत्राचा मानुना खाली दिलेला आहे.
- सोबत खालील दिलेली कागदपत्र च्या यादीमधील तुमच्याकडे जे कागदपत्र उपलब्ध आहेत ते कागदपत्र जोडून.
- अर्ज तहशील कार्यालयात जमा कर.
- तपासणी प्रक्रिया
- तहसीलदार किंवा त्यांचे अधिकारी तुम्ही सादर केलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करतील.
- जर सर्व सादर करण्यात आलेली कागदपत्रे बरोबर असतील तर तुमच्या गावातील तलाठी अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी पाठवले जातील.
- तुमच्या गावचा तलाठी अधिकारी तुमच्या घराची आणि शेतीची पाहणी करून तहशील कार्यालयास अहवाल सादर करतील.
- सर्व माहिती खरी आणि योग्य असल्यास पुढील कार्यवाही केली जाईल आणि जर अर्जात काही त्रुटि आढळून आल्यास तुमचं अर्ज बाद करण्यात येईल किंवा अजून काही कागदपत्राची पूर्तता करण्यास सांगितल्या जाईल ( याची माहिती तुम्हाला तुमच्या तलाठी अधिकारींकडून देण्यात येईल किंवा तुम्ही तुमच्या तहशील ऑफिस ल जाऊन तपासू शकता)
- भूमिहीन प्रमाणपत्र वाटप
- तलाठी अधिकाऱ्याचा अहवाल तहसीलदार यांच्या कडे सादर झाल्यानंतर तुमचे भूमिहीन प्रमाणपत्र जारी करतील.
- प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला पुनः एकदा तहशील कार्यालयास भेट द्यावी लागेल.
- ही संपूर्ण अर्ज सादर केल्यापासून ते प्रमाणपत्र मिळेपर्यंतची प्रक्रिया 15 दिवसाची असून कधी 30 दिवस सुद्धा लागू शकतात.
ऑनलाइन पद्धत:
अनेक राज्यांमध्ये भूमिहीन प्रमाणपत्र ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित राज्याच्या सरकारच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. महाराष्ट्र राज्यात भूमिहीन प्रमाणपत्र ही प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असून पुढील प्रकारे तुम्ही अर्ज दाखल करू शकता.
- पायरी 1 – आपले सरकार या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जा
- पायरी 2 – जर तुमचे खाते नसेल तर काही माहिती भरून तुमचे खाते तयार करून घ्या. ( एक गोष्ट लक्षात घ्या खाते तयार केल्यानंतर लॉगिन id आणि पासवर्ड लक्षात ठेवणे महत्वाचे आहे )
- पायरी 3 – आपले खाते उघडून डाव्या बाजूला दिलेल्या मेनू मधून महसूल विभागाची निवड करा
- पायरी 4 – उप- विभागाची निवड करताना महसूल विभाग ची निवड करा.
- पायरी 5 – भूमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला या वर टिक करून पुढे जा हे बटन दबा
- पायरी 6 – दिलेला अर्ज पूर्ण भरा आणि आवश्यक कागदपत्र जोडा व पेमेंट करा.
- पायरी 7- अर्ज तहशील कार्यालयामार्फत तपासून तुम्हाला तुमचे भूमिहीन शेतमजूर चे प्रमाणपत्र देण्यात येईल.
वरील लेखातून भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे व ते प्रमाणपत्र काढण्यासाठी 2 अर्ज प्रणाली विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, भूमिहीन शेतमजूर कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतात त्या योजनविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट मध्ये कळवू शकता.
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून भूमिहीन प्रमाणपत्र कसे काढावे , प्रमाणपत्र काढून घ्या अनेक योजनेचा लाभ Bhumihin certificate kase kadhave व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा
- कसे पाहावे आधार कार्ड आणि पैन कार्ड लिंक आहे की नाही Adhar and pan Card Link status
- उसतोड सूतगिरणी कामगार यांना ई-श्रम कार्ड देऊन अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत . आजच जाणून घ्या ई-श्रम कार्ड चे फायदे
- श्रम योगी मानधन योजना (PM-SYM ) योजनेंतर्गत मिळणार 36000 पेंशन Sharm Yogi Maandhan Yojana
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनाअंतर्गत मिळणार 20000 ते 30000 हजाराचे वार्षिक भत्ता….
- प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजना: JSY मातृत्व सशक्त करणे आणि सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करणे