डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत मिळणार 20000 ते 30000 हजाराचे वार्षिक भत्ता….

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ शासकीय विद्यापीठे व त्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे/ स्वयं अर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे वगळून) मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे ( व्यवस्थापन कोठयातील  / विद्यालय महाविद्यालय  स्तरांवरील प्रवेश वगळून ) प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी  लागू केली आहे.. अशा विद्यार्थ्यांसाठी “डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना” ( Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna)” लागू केली आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

  • ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व असंघटीत शेत्रात काम करतात किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मंजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना असून विद्यार्थी शिक्षण घेत असताना स्वतःचा शासकीय वसतिगृहामध्ये नंबर नाही लागला तर विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहनिवावता प्रतिमाह रुपये 2000 ते 3000 मिळणार.
  • ज्या विद्यार्थ्यांची अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणी करत मजूर नाहीयेत परंतु त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील दोन्ही पालकाची एकत्रित उत्पन्न 8 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना नव्याने समाविष्ट करण्यात येणार असून निवडक व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षातील दहा महिन्याकरिता प्रतिमा 3000 रुपये भत्ता देण्यात येईल. 
  • अल्पभूधारक- 
  • शेतमजूर- 
  • आर्थकदृष्ट्या दुर्बळ 
  • आदिवासी 
  • मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्ग असा समाजातील सर्वच घटकाला ह्या योजनेचा लाभ होऊ शकतो.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लाभार्थी

  • मुख्यतः बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी ही योजना राबवली जाते.
  •  विद्यार्थी अनुत्तीर्ण ( नापास )  झाला किंवा काही कारणामुळे त्याला वरच्या ( पुढील )  वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर त्या वर्षाकरिता सदरील विद्यार्थ्यास त्या वर्षाचा  निर्वाहभत्ता लाभ मिळणार नाही. जसे दुसऱ्या शिष्यवृत्ती मध्ये नियम आहेत त्याप्रमाणे. 
  •  सदरील योजना फक्त व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी असेल.  
  • शिक्षण घेत असताना महाविद्यालयात असलेल्या वस्तीगृहात ऍडमिशन मिळालं नाही अशा मुलांसाठी योजना लाभदायक ठरते. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अंतर्गत मिळणार लाभ पुढील प्रमाणे.
प्रकारप्रवेशीत अभ्यासक्रमाच्या
संस्थेचे ठिकाण
वार्षिक निर्वाह भत्ता (10 महिन्याकरीता)
ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा
नोंदणीकृत मंजूर आहेत.
मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण
क्षेत्रातील सर्व शहरे सोबत औरंगाबाद ( संभाजी नगर ) आणि नागपुर
INR 30,000.0
राज्यातील अन्य ठिकाणीINR 20,000.0
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील विद्यार्थी (
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या यात.
मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण
क्षेत्रातील सर्व शहरे सोबत औरंगाबाद ( संभाजी नगर ) आणि नागपुर
INR 10,000.0
राज्यातील अन्य ठिकाणीINR 8,000.0
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकतील विद्यार्थी (
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 ते 8  लाखाच्या यात.
मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण
क्षेत्रातील सर्व शहरे सोबत औरंगाबाद ( संभाजी नगर ) आणि नागपुर
INR 10,000.0
राज्यातील अन्य ठिकाणीINR 8,000.0

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पात्रता व अटी 

  • अर्जदाता हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. 
  • अर्जदारांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर नसावे . तहसीलदारचे उत्पन्न  प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
  • अर्जदाराची पालक जर नोंदणी करून मजूर असतील तर नोंदणीचा पुरावा..
  • अल्पभूमी धारक असतील तर त्या संदर्भातील पुरावा.
  • ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी दाखला पत्र. घर भाडेपट्टी.
  • होस्टेलमध्ये राहत नाही असा  महाविद्यायामधून  दाखला. 
  • अर्जदार ज्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहे तिथे कमीत कमी 50 टक्के हजेरी असणे गरजेचे आहे.
  • एका कुटुंबा मधून फक्त दोनच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक मी खूप गरजेचे आहे.
  • पदवी किंवा पदव्युत्तर (graduation and post graduation)  स्तरावर तांत्रिक, व्यावसायिक किंवा गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. व त्याचा पुरावा असावा. 

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कागदपत्रे 

  • अर्ज करताना विद्यार्थ्याने पुढील कागदपत्रे सादर करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि सर्व कागदपत्रे स्कॅन कॉपी असणे गरजेचे आहे. 
  • 10 वी पासून चे पुढील सर्व वर्गाच्या मार्क शिट 
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असल्याचा दाखल 
  • पालक अल्पभूधारक असल्याचा किंवा शेतमजूर असल्याचा दाखल , आर्थकदृष्ट्या दुर्बळ असल्याचे प्रमाणपत्र 
  • चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 
  • महाविद्यालायच ओळखपत्र 
  • उपस्थितीचे प्रमाणपत्र 
  • चालू आर्थिक वर्षात राहत असलेल्या किंवा राहत नसलेला दाखल  वस्तीगृहाचा दाखल ( रूम भाड्याने घेऊन राहत असल्यास घर मालकाचे प्रमाणपत्र ) ( घरभाडे करार ) 
  • शिक्षणात गॅप असल्यास त्या सबंधीचे शैक्षणिक खंड असल्याचा दाखल 
  • अधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे. याविषयी अधिक माहीती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता.  किंवा  तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना  किंवा संबधित महाविद्यालयातून माहिती मिळेल 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top