खोकला घरगुती उपाय मराठी अगदी काही दिवसात तुमचा खोकला होईल बरा..

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

खोकला हा आपल्या शरीराचा एक नैसर्गिक संरक्षणात्मक प्रतिकार असून  जेव्हा आपल्या श्वासनलिकेत धूळ कफ, किंवा इतर परतणारे पदार्थ जमा होतात, तेव्हा शरीराची ही प्रतिक्रिया असते. खोकल्याच्या माध्यमातून आपले शरीर या पदार्थांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे श्वासनलिका स्वच्छ राहते.आणि दुसऱ्या आजारापासून आपला बचाव होतो. आजच्या लेखामधून खोकला घरगुती उपाय मराठी मधून माहिती जाणून घेणार आहोत तर लेख पूर्ण वाचा आणि तुम्हाला या लेखा मुळे फायदा हॉट असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की या.

खोकला घरगुती उपाय मराठी

प्रामुख्याने खोकल्याचे मुख्य  दोन प्रकारचा पडतात.

  • कोरडा  खोकला: यात कफ बाहेर येत नाही. हा खोकला अनेकदा गळ्यात खराश किंवा चिडचिड झाल्यामुळे होतो. एकदा चालू झाली की थांबत नाही. दीर्घ काळ टिकतो. 
  • ओला  खोकला: यात कफ बाहेर येतो. हा खोकला सर्दी, फ्लू, ताप किंवा इतर संक्रमणांमध्ये होऊ शकतो. जास्त काळ टिकत नाही. सर्दी कमी झाली की खोकला पण थोड्या प्रमाणात काही होतो. ( हे सर्वांच लागू होईल असे नाही काहीना तर सर्दी गेल्यानंतर खूप दिवस खोकला त्रास देतो. औषधोपचार केल्याशिवाय बरा होत नाही. )
खोकला घरगुती उपाय मराठी
खोकला घरगुती उपाय मराठी

खोकला का बर होत असेल 

तशी खोकला व्हायची अनेक करणे असू शकता पण आपण काही सामान्य कारणे आज समजून घेऊ ज्यामुळे बहुतेकांना कोरडा व ओला खोकला होतो. ते कारणे पुढील प्रमाणे असू शकतात.  

  • सर्दी आणि फ्लू – हे सर्वात सामान्य कारण खोकला होण्याचे आहे.  या वेळी  बहुतेकांना 
  • एलर्जी :- काही व्यक्तिना काही गोष्टीची एलर्जी असते जस की त्यांना धूळ ,पाळीव जनावरांचा वास बिलकुल सहन  होत नाही त्यांना लगेश सर्दी आणि खोकला होतो. .
  • अस्थमा :- अस्थमा आजाराने  ग्रासलेल्या व्यक्तिना खोकल्याचा त्रास होऊ शकतो कारण की अस्थमा आजार हा  एक दीर्घकालीन श्वासनलिकांची समस्या आहे . ह्या आजारमुळे रुग्ण व्यक्तीच्या श्वासनलिकेस मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि परिणामी त्यामुळे खोकला होऊ शकतो.
  • धूम्रपान  :-काही लोकाना मोठ्या प्रमाणात धूम्रपान करण्याची व्यसन असते. प्रामुख्याने असे व्यसनी लोक तंबाखूयुक्त बीटी व काही प्रमाणात सिगरेट चा वापर करतात. ह्या सततच्या धूम्रपणामुळे व्यसनी लोकांच्या  श्वासनलिकांना आणि फुप्फुसला नुकसान पोहोचवते आणि खोकल्याचे मोठे कारण बनू शकते ( तुम्ही तुमच्या आजू-बाजूला पहिले असेल जे वयस्कर व्यक्ति असतात आणि ज्याना बिडी किंवा सिगरेट पिळयाची सवय असते असे लोक बहुतेक वेळा खोकत असतात..  
  • दवांचे दुष्परिणाम: काही दवांचे दुष्परिणाम म्हणून खोकला होतो , तुम्हाला जे असाध्य आजारच औषध चालू असेल तर त्या औषध चे साइड इफेक्ट म्हणून तुम्हाला सर्दी खोदला होऊ शकतो. अश्या वेळी वेळीच आपल्या डॉक्टर कडे जाऊन ते औषध बदलून हयावी.

वरील वाचलेल्या अश्या अनेक कारणाने खोकला जरी होत असेल तर आपण काही घरीच उपाय योजना करून खोकला बरा करू शकतो. तर या लेखामधून खोकला घरगुती उपाय मराठीमधून जाणून घेणार आहत तर लेख पूर्ण वाचा. 

खोकला घरगुती उपाय मराठी मधून 

कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवणीसाठी / आराममिळवन्यासाठी  अनेक  घरगुती उपाय आहेत परंतु त्यापैकी अतिशय कारगर आणि उपयुक्त असलेले उपाय आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

  1. खोकल्यापासून आराम मीवण्यासाठी मधाचा वापर –  मधमाशीच्या पोलातून काढलेला नैसर्गिक मध हा अतिशय उपयुक्त असून तो अनेक आजारपसून बचाव करण्यासाठी त्याचा उपयोग केल्या जातो. त्या मागचे कारण आहे की मधामध्ये असलेले  नैसर्गिक प्रतिजैविक आणि जखमा बरे करण्याचे गुणधर्म. ह्या गुणधर्माचा वापर करून तुम्ही खोकल्यावर उपाययोजना करू शकता.
    • मधचा वापर करताना रोज 1, 2 चमच मध ( ज्या वर कोणतेही प्रकिया केलेली नाही असा मध उपयोगात घ्यावा. ) 
    • मध काढल्यानंतर उरलेले जाड थर ज्याला मेन म्हणतात त्या मेणाचा वापर सुद्धा करू शकता. 
    • मध आणि आंबे हळद ( नसेल तर आपल्या घरातील हळद सुद्धा चालेल ) हळद तव्यावर भाजून त्याचे मधामध्ये छोटे छोटे गोळे करायचे आणि जिभेवर ठेऊन चघळून घ्यायचे त्यामुळे सुद्धा तुम्हाला खात्रीशीर फायदा होईल. हे छोटे गोळे तुम्ही कोरडा, खोकला आणि ओला खोकला या दोन्ही खोकल्या साठी वापरू शकता.
  2. कोमट खारट पाण्याच्या गुळण्या –  कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे  हा कोरड्या खोकल्यासाठी एक सोपा आणि प्रभावी घरगुतीउपाय असून त्यापासून तुम्हाला नक्की फायदा होईल.
    • मीठ हे सुजलेल्या घशातील ऊतींमधून श्लेष्मा आणि द्रव बाहेर काढण्यास मदत करते परिणामी  घशातील सूज कमी होऊन तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळतो. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाणी आणि त्या एक चतुर्थांश मीठ टाकून गरम करा व पाणी थोडे कोमट झाले की त्याचा गुळण्या करा. हा उपाय शकतो सकाळी सकाळी करा त्याचा जास्त फायदा होईल तस तुम्ही या उपाय दिवस भारून 3, 4 वेळा करू शकता त्यामुळे जास्त लाभ होतो आहे खोकल्या मुळे होणारा त्रास कमी होतो.
  3. खोकला घरगुती मध्ये अद्रक आहे महत्वाची
    • अद्रक मध्ये  जिंजेरॉल नावाचे संयुगे असतात जे वायुमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी ओळखले जातात. नेमके खोकल्यामुळे स्वसनमार्ग ला विजा झालेली असते. गरम पाण्यात ताजे किसलेले आल्याचे तुकडे किंवा / सुकलेले आले ज्याला सूट असे म्हणतात त्या सूट भिजवून मसालेदार आले चहा बनवा किंवा इतर हर्बल चहाच्या मिश्रणात आले घालून चहा घेतल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो. आज चहा नेहमीच घेत राहिल्याने खोकला त्रास तर कमी होतो आणि पुन्हा खोकला होत नाही. 
  4. खोकल्यापासून आराम मिळवणीसाठी हळद आहे अतिशय उपयुक्त – हळद आपल्या स्वयंपाक घरातील अतिशय महत्वाचा घटक असून जसे   हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, ज्यामध्ये दाहक राहक आणि  विषाणूविरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी लढण्याचे  गुणधर्म असतात. त्यामुळे  कोरडा खोकला व ओला खोकला कमी होण्यास मदत होतो.
    • एक चमचा हळद पावडर आणि 1/8 चमचा काळी मिरी थंड संत्र्याच्या रसामध्ये मिक्स करून प्या.  त्याचबरोबर आंबे हळद किंवा साधी हळद लोखंडी तव्यावर हळद भाजून , गुळा सोबत छोटे छोटे गोळे करून रात्री झोपताना चोकून खायचे , खायला थोडी तुरट आणि गोड चव लागेल पान तुम्हाला रात्री खोकला येणार नाही. पुढील 4,5 दिवस रोज रात्री हे हलदीचे गोळे खाल्ले तर कोणताही खोकला असू द्या कमी होतो.
  5. मसाला चहा – मसाला चहा त्याच्या चविमुळे अतिशय प्रसिद्ध असून तो जेवढा चविष्ट आहे तेवढाच आरोगीसाठी लाभदायक ठरू शकतो जर त्यामधील वापरण्यात येणारे निवडक पदार्थ असतील तर. हाच मसाला चहा खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे.
    • त्यासाठी मसाला चहा मध्ये पुढील पदार्थ असणे अतिशय गरजेचे आहे, खोकल्या पासून सुटका मिळवणीसाठी जो मसाला चहा आपण बनवणार आहोत त्या चहा मध्ये  लवंग, वेलची आणि दालचिनीसारख्या मसाल्यांमधील ऑक्सिडंट्सचा हेगुणधर्म असलेले पदार्थ असणे आवश्यक आहे. लवंग कफ पाडणारे औषध म्हणून काम करते, ज्यामुळे श्लेष्माचा स्राव कमी होतो. दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे घसा आणि वायुमार्गातील सूज कमी करण्यास मदत करून तुमचा  खोकला काही दिवसात च कमी होईल. 
    • निलगिरी च्या पानापासून बनवण्यात येणार चहा पान खूप लाभदायक आहे. त्यामुळे सुद्धा खोकला कमी होण्यास मदत होतो. चहापती  सोबत निलगिरी चे ओले किंवा सुकलेले 2 पाने टाकायची. आणि साखर टाकायची चविसाठी अतिशय उत्तम असलेला हा चला सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. 

वरील लेखातून खोकला घरगुती उपाय मराठी मधून माहिती जाणून घेतली.  तसे अनेक उपाय आहेत जे ह्या लेखात मांडले नाहीत त्यामागचे कारण फक्त एवढेच आहे की त्या उपायमधील सामग्री आगदी सहज प्रत्येकाच्या घरी उपलब्ध नसते त्या मुळे वर सुचवलेले उपाय असेलच आहे ज्यांची  सामग्री घरी सहज उपलब्ध असते. सोबतच लेखकाने स्वतः अनेक वर्ष या घरगुती उपायांचा वापर करून आपली व आपल्या कुटुंबाचे सर्दी आणि खोकला बरा केला आहे आणि त्यांना हा घरगुती उपाय त्यांच्या पूर्वकडून म्हणजे त्यांचा माय ( आजी ) कडून मिळाला आहे. 

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून खोकला घरगुती उपाय मराठी अगदी काही दिवसात तुमचा खोकला होईल बरा..व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे ही वाचा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top