अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे आणि योजनाविषयी माहिती

Spread the love

महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य शासनाकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली गेली असून या महामंडळाची मुख्य कार्य हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकास हवा आणि त्यांची गरीबी मधून सुटका व्हावी आहे. आज या लेखामधून या महामंडळाला मार्फत राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या योजना समजून घेऊ सोबत त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी कोण-कोणते कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ त्यामुळे लेख पूर्ण वाचा जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार आणि सोबत लेखामध्ये शासनाच्या अधिकृत वेबसाइट ची लिंक आणि अर्जाचा नमूना दिलेला आहे त्या मुळे अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे हे लेख पूर्ण वाचा. 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे. 

या लेखामधून तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनाविषयी माहिती जाऊन घेणार आहत सोबत या योजनांमधून कसा प्रकारचा लाभ मिळतो, या योजनांचा लाभ कोण घेऊ शकते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहेत या विषयी माहिती दिली आहे तर लेख पूर्ण वाचा.

अण्णासाहेब पाटील महामंडळाची उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समजापर्यंत विशेषकरून  बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांच्या साठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबून त्यांना सक्षम बनविणे. सोबत अनेक योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिक व सामाजिक दर्जा कसा प्राप्त होईल या साठी पर्यंत करणे व आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी नेहीमीच पर्यतशील राहणे. अण्णाभाऊ पाटील महामंडळ अतिशय उपयुक्त योजना घेऊन येते परंतु राज्यातील बहुतेक लोकांना या योजनेविषयी माहिती नसल्यामुळे कुणी या योजनाचा जास्त लाभ घेऊन शकत नाही. तर आज या लेखाच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी अण्णाभाऊ पाटील  महामंडळ तर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनाची सविस्तर माहिती सोबत अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे विषयी सविस्तर माहिती पुढील लेखातून. 

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना

1998साली सुरु झालेल्या आण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फ सुरुवातीपासूनच अनेक योजना राबवल्या जातात वेळेनुसार त्या योजनामध्ये अनेक बदल करण्यात आलेत काही जुन्या योजना बंद करून नवीन योजना सुद्धा चालू करण्यात आल्या आहेत तर आज या लेखामधून सध्या चालू असलेल्या योजना खाली दिलेल्या आहेत. 

  • व्ययक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
  • गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) 
  • गट प्रकल्प कर्ज योजन ( GL-I)

अश्या तीन महत्वाच्या योजना या महामंडळाकडून चालवल्या जातात या योजना तुम्हाला प्रत्येक्ष लाभ घेणाऱ्या असून तुम्ही या योजनेचा नक्की फायदा घ्यायला पाहिजे. आता या योज्नानेचा लाभ घेन्यासाठी कोण-कोण पात्र आहे या या याविषयी सविस्तर माहिती पाहू आणि त्या नंतर त्या योजनेचा लाभ घेन्यासाठी काय-काय कागदपत्रे लागतील त्या विषयी माहिती पाहू.

  1. कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
    • अर्जदार महाराष्ट राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे 
    • अर्जदार उमेदवार यांचे वयोमार्यादा पुरुषांसाठी जास्तीत-जास्त वय 50 व महिलांसाठी जास्तीत-जास्त 55 वयवर्ष असावे. त्यापेक्षा जास्त वय असलेला उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही. 
    • अर्जदार उमेदवारने महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर नोंदणी करणे गरजेच आहे. ( महा स्वयम )
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे ( 8 लाखापेक्षा कमी ) 
    •  सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 
    • अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र अर्जसोबत जोडणे अनिवार्य आहे. 
    • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पुन्हा अर्ज करता येणार नाही. 
    • दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जसोबत जोडणे  अनिवार्य असून त्यात कोणतीही सुत शासनाने दिली नाही. 
    • या योजनेचा लाभ घेन्यासाठी तुम्ही शासनाच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
    • अर्जदार महाराष्ट राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
    • अर्जदारउमेदवाराचे  बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे अनिवार्य.
    • अर्जदार उमेदवार यांचे वयोमार्यादा पुरुषांसाठी जास्तीत-जास्त वय 50 व महिलांसाठी जास्तीत-जास्त 55 वयवर्ष असावे. त्यापेक्षा जास्त वय असलेला उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
    • अर्जदार उमेदवारने महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर नोंदणी करणे गरजेच आहे. ( महा स्वयम )
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे ( 8 लाखापेक्षा कमी ) 
    • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अजर्दार उमेदवाराने  महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 
    • अर्जदार उमेदवारावर गट कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावी. 
    • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. पुन्हा त्याच किंवा दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
    • अर्जदार उमेदवाराव दिव्यांगा असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. 
  3. गट प्रकल्प कर्ज योजना  ( GL-I)
    • अर्जदार महाराष्ट राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 
    • अर्जदारउमेदवाराचे  बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे अनिवार्य. ( आधार लिंक आहे कि नाही तपासा )
    • अर्जदार उमेदवार यांचे वयोमार्यादा पुरुषांसाठी जास्तीत-जास्त वय 50 व महिलांसाठी जास्तीत-जास्त 55 वयवर्ष असावे. त्यापेक्षा जास्त वय असलेला उमेदवार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
    • अर्जदार उमेदवारने महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर नोंदणी करणे गरजेच आहे. ( महा स्वयम )
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेत असावे ( 8 लाखापेक्षा कमी ) 
    • सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अजर्दार उमेदवाराने  महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 
    • अर्जदार उमेदवारावर गट कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावी. 
    • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. पुन्हा त्याच किंवा दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
    • अर्जदार उमेदवाराव दिव्यांगा असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य.
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनाअंतर्गत मिळणारा लाभ
    • अण्णासाहेब पाटील मह्मंडळ कडून ३ पैकी कोणत्याही योजनेमधून तुम्हाला १५ लाखापर्यत बँक अर्ज मिळेल.
    • हे बँक अर्ज शेती आधारित व्यवसाय ( जोड धंदा ) करण्यासाठी असू शकते त्याचबरोबर इतर काही व्यवसायाचा समवेश करण्यात आला आहे ते पुढील प्रमाणे 
    • ब्युटीपार्लर , ट्रॅक्टर खरेदी , हॉटेल उभारणी व साधन सामग्री ,नवीन   व्यवसाय , व्यवसायाच्या मशीन खरेदी साठी , वाहन खरेदी साठी , किराणा दुकान चालवण्यासाठी , पशू खरेदी करण्यासाठी. 
    • या वरील सर्व व्यवसायासाठी जर तुम्ही १५ लाखापर्यत कर्ज घेतले तर त्या कर्जावर बँकमार्फत लावण्यात येणाऱ्या व्याज ( ३ लाखापर्यंत ) या योजेनीमधून मिळणार. 
    • म्हणजे फक्त तुम्हाला फक्त मूळ रक्कम बँकेला परत करावी लागणार. बाकी  कर्जाचे व्याज योजनेमधून बँकेला मिळेल.
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे
  • अर्जदाराचा फोटो आणि आधार आधार क्रमांक असेलेली बाजू )
  • राहवासी पुरवा ( लाईट बील , गॅस कनेक्शन पुस्तक अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत यापैकी एक )
  •  चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (सदरील दाखला तहसील मधून काढलेला असावा. )  
  •  उत्पन्नाचा दाखला नसेल तर इन्कमटॅक्स ची मागीलवर्षाची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची 
  • जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक खाते स्टेटमेंट 
  • व्यवसाय नोंदणी पूरावा
  •  व्यवसाय प्रकल्प अहवाल 
  • व्यवसाय चा फोटो

अर्जदार उमेदवारास अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे शासनाच्या वेबसाईट अर्ज करताना उपलोड करावे लागतील सोबतच बँक मध्ये जमा करावे लागतील. दोन्ही ठिकाणी जमा करताना एक-दोन कागदपत्रे कमी जास्त होऊ शकतात ते बँक आणि शासन यांनी वेळेवर नियमात केलेल्या बदलावर आवलंबून असेल याची अर्जदार उमेदवारांना नोंद घ्यावी. 

सोबत ऑनलाईन अर्ज कसा करावा या यीषयी माहिती पाहिजे असल्या तुम्ही आम्हला आपल्या प्रतिक्रिया comment मध्ये कवळू शकता. तर आम्ही अर्जाचा सविस्तर लेख तुमच्या साठी घेऊन येऊ.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे आणि योजनाविषयी माहितीव आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top