ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी.

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे भारतातील स्त्रियामध्ये प्रमाण दिवसेदिवस वाढत चलेले आहे 2018 च्या एका अभ्यास अहवालानुसार ब्रेस्ट  कॅन्सर  चे प्रमाण 14 टक्के असून दर चार मिनिटांनी एक भारतीय महिलेला स्तनच्या कॅन्सर चे निदान होत असल्याची नोंद होत आहे. भारताच्या ग्रामीण आणि शहरी भागात कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे.शहरातील प्रत्येकी 20 बायकांमध्ये एका महिलेला तर खेड्यात ३० बायकांमध्ये एका महिलेला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असून, त्यापैकी ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ वय असलेल्या महिलेस होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये काही अंशी अनुवांशिकता असल्याचे सुद्धा दिसून आले आहे. 2018 च्या अहवालानुसार सरासरी 1 लाख 63 नवीन रुग्णाची नोंद करण्यात आली आहे आणि 87 हजार मृत्यू ची नोंद झाली आहे.

ब्रेस्ट कॅन्सर
ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव

ब्रेस्ट कॅन्सर एक अशा आजार आहे जो वेळीच काळजी घेतली तरी तुम्हाला कधीही हा आजार होणार नाही. स्तनाचा कर्करोग रोखण्याचा कोणताही खात्रीशीर मार्ग नसला तरी, आपल्या रोजच्या जीवनशैलीतील काही बदल आणि काही खाली गोष्टी ची काळजी घेतली तरी तुम्हाला breast cancer कधीही होणार नाही.

ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव  करा पुढील उपाय योजना

  • निरोगी वजन ठेवा :-
    • जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे स्तनाच्या कॅन्सर चा धोका महिलामध्ये मोठ्या प्रमाणात आहे . तुमचे निरोगी वजन आहे की नाही ही समजून घेण्यासाठी तुमच्या BMI चे मापन केल्यास वयानुसार , ऊंचीनुसार वजन किती असलेला पाहिजे ही सजमते.
  • शारीरिक हालचाल ठेवा :-
    • दिवसभरात किमान एक तास मध्यम-तीव्रतेचा व्यायाम किंवा साप्ताहिक 2 तास जोमदार-तीव्रतेचा व्यायाम करण्याचे करण्याचे लक्ष ठेऊन नियमित व्यायाम करा कीव शारीरिक हालचाल ठेवा. नियमित शारीरिक हालचाल ठेवल्यास वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते सोबत मन प्रसन्न राहते आणि कॅन्सर चा धोका कमी होतो.
  • अल्कोहोल सेवन – सध्याच्या काळात महिलांचे अल्कोहोल/ मद्यपानाचे सेवन वाढत आहे. नियमित सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर च्या धोका वाढतो त्यामुळे सेवनाने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. अल्कोहोलचे सेवन मर्यादित करणे किंवा ते पूर्णपणे बंद करणे कधीही चांगले.
  • नियमित संतुलित आहार घ्या – फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्य असलेल्या आहारावर भर द्या आणि नियमित सेवन करा. लाल मांस, मेलेले प्राण्याच्या मासचे प्रक्रिया केलेले मांस आणि साखरयुक्त पेये मर्यादित करा.
  • स्तना बद्दल विचार करा – शक्य असल्यास, स्तनच्या कोणत्याही क्षत्रक्रिया डॉक्टर च्या सल्ला शिवाय करू नका आणि डिलीवरी नंतर जास्त दिवस बाळाला स्तनवर दूध वजा त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर चा धोका टाळतो.
  • हार्मोन थेरपीच्या जोखमींबद्दल चर्चा करा – जर तुम्ही रजोनिवृत्तीच्या लक्षणांसाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) चा विचार करत असाल, तर तुमच्या डॉक्टरांशी संभाव्य धोके आणि फायदे, विशेषत: स्तनाच्या कर्करोगाबाबत पूर्ताह शहानिशा करून घ्या व पुढील निर्णय घ्या एक छोटी चूक मी तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकते.
  • परिवार नियोजनाचा विचार करा – तुमच्या डॉक्टरांशी परिवार नियोजनाच्या विविध सुरक्षित पर्याय बद्दल विचार. दोन अपत्य च्या जन्मानंतर तुम्ही तत्काल परिवार नियोजन करू शकता. दीर्घकाळ एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असलेल्या गोळ्याचे सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो, विशेषतः वयाच्या 35 नंतर स्तनाच्या कॅन्सर होण्याची शक्यता असते.

कॅन्सरचा इतिहास असल्यास काय काळजी घ्यावी :-

    •  तुमच्या कुटुंबात पूर्वी कुणाला स्तन कॅन्सर असल्यास तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे अतिरिक्त जोखीम घटक आणि संभाव्य प्रतिबंधात्मक उपायांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. नियोजन करून संबधित वेळीच चाचण्या करून घ्या.

Also Read 

नियमित तपासणी :- 
    • आपल्या स्तनात कोणताही बदल दिसून येत असले स्तनातील कोणत्याही भागाला गाठी नंतर स्पर्श केल्यानंतर संवेदना होत नसेल /काहीच जाणवत नसेल तर अश्या वेळी थोडा ही वेळ वाया न घालत तत्काल तपासणी करणे महत्वाचे आहे. तुमचे वय आणि जोखीम घटकांवर आधारित तुमच्या डॉक्टरांनी सुचविल्यानुसार नियमित मॅमोग्राम चाचणीचे नियोजन करा.

लक्षात ठेवा :

  • स्तनात झालेला अगदी लहान बदल देखील कॅन्सर होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही हे फक्त आपण पाहून सांगू शकत नाही त्यामुळे असलेली कोणतीही गाठ असल्यास तत्काल आपल्या डॉक्टर चा सल्ला घ्यावा. 
  • आणि वर सांगितल्या प्रमाणे सर्व काळजी घेतल्यास तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजारपासून बचाव होऊ शकतो.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून  ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी. व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या  व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

Also Read

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top