तब्बल दहा लाखात या आजाराच्या रुग्णाची संख्या पोहचली असून मुत्यूचे प्रमाणही वाढत आहेत. थोडी जरी काळजी घेतली तरी अनेक जण ह्या सिकलसेल अनेमिया वाचू शकतात.

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

आज आपण सिकलसेल अनेमिया विषय माहिती जाणून घेऊयात ज्यामध्ये कोणत्या भागात आणि समुदायामध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे , इतिहास , या आजारामुळे होणारे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना अशा करता येतील व शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊन.

पार्श्वभूमी

संपूर्ण जगाचा विचार केला असता भारतामध्ये आदिवासी समुदायाचे वास्तव सर्वाधिक प्रमाणात आढळून येते आणि अनेंक इतिहासकार यांच्या प्रमाणे आदिवासी समुदाय हाच भारतातील मूळ रहिवासी आहे. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी समुदायाची लोकसंख्या एकूण भारताच्या लोकसंखेच्या 8.6 टक्के एवढी असून, जी कि सुमारे 67.8 दशलक्ष आहे. प्रामुख्याने आदिवासी समुदाय हा मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा , गुजरात, राजस्थान, झारखंड,छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटका या राज्यामध्ये आढळून येते. आणि महाराष्ट्राचा विचार केला असता अमरावती, जळगाव ,नंदुरबार, धुळे , गोंदिया,नागपूर, यवतमाळ, वर्धा , गडचिरोली , चंदपूर ,ठाणे ,पालघर,नाशिक यासारखे जिल्ह्यामध्ये आदिवासी समुदायाचे वास्तव्य आढळून येते. आदिवासी समुदाय आपल्या वैशिष्ट्य जीवनशैली,भाषा, विवाह पद्धती, स्त्री प्रमुख कुटुंब पद्धती आणि सांस्कृतिक परंपरांमुळेओळखला जातो पण अलीकडील काही वर्षात आदिवासी समुदायांची ओळख काही सामाजिक समस्या म्हणून समोर अली आहे जस कि बालमूत्यू, मातामूत्यू, कुपोषण, अनेमिया, गरिबी, बाल-विवाह , बेरोजगारी, निरक्षरता.

  • इतिहास

    १९०१ साली शिकागो मधील एका डॉक्टरने रक्ताच्या नमुन्याबद्दल पहिला वैद्यकीय पेपर प्रकाशित केला ज्यामध्ये ग्रेनेडातील एका 20 वर्षीय विद्यार्थ्यासाठी ‘सिकल-आकार आणि चंद्रकोर-आकाराच्या’ लाल रक्तपेशी दिसून आल्या, ज्याला तीव्र अशक्तपणा होता आणि वेदना अनुभवत होता.
  • संक्रमित ऋणाची संख्या
    महराष्ट्रातील विविध आदिवासी गटामध्ये सिकलसेल वाहकाचे प्रमाण 1 ते 40 टक्के पर्यत असू शकतो ज्यांची अंदाजित संख्या 9,61,492 आहे आणि रुग्णाची संख्या  67861 एवढी असून भारतात मध्य परदेशात सिकलसेल ची संख्या सर्वाधिक आहे. असाही अंदाज आहे कि राज्यातील 13,432 सिकलसेल रोगाने ग्रस्त असलेल्या गर्भधारक महिला तेवढ्याच सिकलसेल ग्रस्त बालकाला जन्म देईल आणि असेच सिकलसेलचे प्रमाण वाढत जाईल. ह्यामध्ये गोंड आणि भिल्ल आदिवासी समुदायाचे प्रमाण मोठे आहे.

सिकल सेल रोग हा आनुवंशिक  असून तो लाल रक्तपेशी विकारांचा समूह आहे जो रक्तातील  हिमोग्लोबिनवर परिणाम करतो, शरीरात ऑक्सिजन वाहून नेणारे प्रथिन.
सामान्यतः, लाल रक्तपेशी चकती-आकाराच्या (विळ्याच्या) असतात आणि रक्तवाहिन्यांमधून सहज हलवण्याइतपत लवचिक असतात. तुम्हाला सिकलसेल रोग असल्यास, तुमच्या लाल रक्तपेशी चंद्रकोर- किंवा ‘सिकल’-आकाराच्या असतात. या पेशी सहजपणे वाकत नाहीत किंवा हलत नाहीत आणि तुमच्या शरीराच्या उर्वरित भागात रक्त प्रवाह वाहण्यास अडथळा आणतात. शरीरातील रक्त प्रवाह अडवल्याने  गंभीर समस्या उद्भवू शकतात, ज्यात स्ट्रोक, डोळ्यांच्या समस्या, संक्रमण, शारीरिक वेदना आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू शकतोसिकलसेल आजार हा आजीवन आजार आहे. सिकलसेल रोगावर सध्या रक्त आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एकमेव उपचार असून तो  प्रचंड महागडा आणि वेळखाऊ आहे सोबत तो विलाज केल्यानंतर खात्रीशीर विलाज होईल कि नाही याची शाश्वती नाही परंतु असे काही प्रभावी उपचार आहेत जे लक्षणे कमी करू शकतात आणि आयुष्य वाढवू शकतात.

सिकलसेल आजार परसण्याचे माध्यम

सिकलसेल हा एक आजार जो आजीवन त्या व्यक्तीसोबत असतो ज्याला झाला सोबत तो व्यक्ति अनुवंशकतेने येणाऱ्या पिढीला ला पण देत असतो. बाधित  व्यक्ती ने योग्य काळजी घेतल्यास त्या व्यक्तीला होणारा त्रास कमी होतो, आणि जर आपल्याला ह्या आजाराला प्रतिबंधित करायचा असल्यास प्रसार होण्याचे  कारण समजणे अत्यंत महत्वाचे आहे. हा आजार फक्त अनुवांशिकतेने  येणाऱ्या दाम्पत्यालाच होतो (जन्माला येणारे दांपत्य ऋण किंवा वाहक जन्माला येऊ शकते )  दुसऱ्या कोणत्याही मार्गाने सिकलसेल आजराचा प्रसार होत नाही. 

जन्माला येणारे बाळजन्माला येणारे बाळजन्माला येणारे बाळ
आईवडीलवाहकरुग्णसामान्य
वाहकरुग्ण50%50%0
रुग्णरुग्ण0%1000
वाहकवाहक50%25%25%
रुग्णसामान्य100%0%0%
वाहकसामान्य50%0%50%
वरील तक्त्याप्रमामे जन्माला येणारे बाळ सिकलसेल बाधित जन्माला येऊ शकते

चिन्हे आणि लक्षणे

सिकलसेल मध्ये दोन प्रकारचे व्याधिग्रस्त पाहायला मिळतात पहिला रुग्ण आणि दुसरा म्हणजे वाहक , वाहकच काम फक्त फिकलसेल आजाराला वाहत नेने आणि आपल्या पुढील पिढीस देणे आणि मुख्य म्हणजे वाहकास याचा जास्त शारीरिक त्रासही होत नाही आणि ठळकपणे कोणतीही लक्षणे हि आढळून येत नाहीत पण रुग्ण सिकलसेल व्यक्तीस असह्य वेदना होतात आणि ह्याचे लक्षणे सहज आढळून येतात.

सिकलसेल आजाराचे लक्षणे व्यक्तीप्रत बदलू शकतात. पण काही सामान्य लक्षणे आहेत जी बहुतेक सिकलसेल ग्रस्त व्यतींमध्ये आढळून आले आहेत ते पुढील प्रमाणे

  • त्वचा आणि डोळे पिवळे या सफेद पडणे
  • अशक्तपणामुळे थकवा किंवा गडबड
  • हात आणि पायांना वेदनादायक सूज
  • भूक मंदावते
  • कितीही औषधे भेटले तरी रक्ताची मात्र वाढत नाही.
  • रुग्ण व्यक्ती कायम आजारी पडतात
  • गर्भवती महिला प्रसवादरम्यान अधिक रक्तस्त्राव होऊन मुत्यू पावते ( महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये मुत्यूदर अधिक आहे )
  • बहुतेक नवजात बालकामध्ये सुरुवातीच्या काळात कोणतेही लक्षणे आढळून येत नाहीत पण जेव्हा ते 5 ते 6 महिन्याचे होते  तेव्हा लक्षणे आढळून येतात.

उपाय योजना 

  • विवाहापूर्वी सिकलसेल ची चाचणी करून घेणे ( शासकीय रुग्णालयामध्ये मोफत करून दिल्या जाते उपजिल्हा रुग्णालय , जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महालविद्यालय मध्ये उपलब्भ आहे ) 
  • जर सिकलसेल चाचणी सकारात्मक आल्यास ( Positive) आपल्यास काहीही केल्यास आपण ह्या आजारापासून सुटका मिळवू शकणार नाही म्हणून त्याचा स्वीकार करण्याचा पर्यंत करावा. ( शासकीय रुग्णालयांमध्ये याविषयी समुपदेशन केल्या जाते)
  • एका सिकलसेल बाधित व्यक्तीने दुसऱ्या सिकलसेल बाधित व्यक्तीसोबत लग्न करायचे टाळावे.

सिकलसेल बाधित व्यक्तीने कोणती काळीज घेतली पाहिजे

  • जास्तीत जास्त पाणी प्यावे
  • दरदिवशी एक फॉलिक ऍसिड (५ मिली ग्राम ) घ्यावी जेणेकरून रक्तामध्ये नवीन लाल रक्तपेशी तयार होतील आणि बाधित व्यतीला कमी त्रास होईल.
  • जर बाधित व्यक्तीला जुलाब- उलटी झाली तर तात्काळ डॉक्टर कडे घेऊन जावे.
  • बाधित व्यक्तीने तंबाधु , गुटखा , दारू यासारख्या आणि अन्य कोणत्याही वास्तूचे सेवन करू नये.
  •  कोणतीही शारीरिक परेशानी जेवल्यास तात्काळ हॉस्पिटल मध्ये घेऊन जावे.सर्वात महत्वाचे 
  • सिकलसेल बाधित व्यक्तीने संतुलित आहार घ्यावा जेणेकरून शरीराला योग्य घटक मिळतील आणि शरीरात रक्ताची कमी होणार नाही आणि बाधित व्यक्तीला जास्त त्रास होणार नाही.
  • बाधित व्यक्तीने प्रत्येक ३ महिन्याला आपल्या रक्ताची चाचणी करून घावी.

गर्भवती महिलांसाठी विशेष

  • गरोदर महिलांनी आरोग्य केंद्रात सिकलसेल तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
  • जर गर्भवती महिलेची सिकलसेल चाचणी पॉझिटिव्ह आली तर तिच्या पतीनेही त्वरित सिकलसेल चाचणी करून घ्यावी.
  • जर नकळत दोन्ही पालक सिकलसेल पॉझिटिव्ह असतील आणि स्त्री गर्भवती असेल तर गर्भाचे निदान करणे योग्य होईल. ज्यावरून येणारे बाळ सिकलसेल ऍनिमिक आहे की नाही याची माहिती मिळू शकते. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करता येतो.
  • सिकलसेल ऍनेमिया  जन्मदात्या आई-वडिलांनी, कुटुंबातील इतर सदस्य आणि दूरच्या नातेवाईकांनी सिकलसेल चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
  • हा आजार अनुवांशिक असल्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल, असा कोणताही उपचार नाही. परंतु चांगल्या उपचाराने व्यक्ती वेदनामुक्त आणि दीर्घ आयुष्य जगू शकते.
  • जेव्हा वेदना होतात (विशेषतः सांधे), तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक औषध घ्या आणि त्या काळात इतर कोणत्याही रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स घ्या.
  • गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करा आणि त्याच्यावर उपचार करा.
  • रक्त तयार होण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक असिड नावाचे औषध घ्या.
  • या प्रकारच्या रुग्णांमध्ये साधारणपणे लोहाची कमतरता असते, की नाही हे जाणून घेतल्याशिवाय लोहाच्या गोळ्या घेऊ नका.
  • या आजाराच्या रुग्णाला केवळ हाडांचे दुखणे समजून उपचार करू नका.

या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून सिकलसेल अनेमिया  आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top