ह्या 5 पोस्ट ऑफिस योजना मधून तुम्ही मिळवू बँक पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता post yojana marathi

माहिती आवडल्यास इतरांना पाठवा

post yojana Marathi

तुम्ही शेवटी कधी गेला होतात पोस्ट ऑफिस मध्ये असा कुणी प्रश्न विचारले तर थोडा विचार करून उत्तर द्यावे लागते कारण जेव्हा पासून मोबाईल फोन आपल्या हातात आले आहेत आणि SMS , mail आणि व्हाट्स अँप चा जमाना चालू झाला आहे त्यामुळे पत्र लिहायचे काम बंदच झाले आहे. पण १ ७ ० वर्षांचा इतिहास असलेली भारतीय टपाल सेवा फक्त पत्र पाठवण्यापुरती मर्यादीत नसून पोस्ट ऑफिसतर्फे अनेक बचतीच्या योजना देखील राबवल्या जातात. त्या योजनांच्या फायदा घेऊन तुम्ही बँक पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता . या लेखातून post yojana marathi माहिती.

Post yojana marathi
Post yojana marathi

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही बँकांमधील मुदत ठेव योजनेसारखीच काम करते. ही योजना बँकांमध्ये ‘फिक्स डिपॉझिट’ आणि पोस्ट ऑफिसमध्ये ‘टाईम डिपॉझिट’ म्हणून ओळखली जाते. पण बँक पेक्षा जास्त व्याज तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेमधून मिलेल.

  • तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता. कालखंडानुसार व्याजदर वाढत जातो.
  • किमान एक वर्षासाठी 6.9% व्याज आणि 5 वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी 7.5% व्याज मिळतं. ह्या व्याजदर सुरुवातीच्या वर्षापासून मिळतो.
  • व्याजदर मोजणी दर तीन महिन्यांनी होते आणि वर्षाच्या शेवटी तुमच्या पोस्टाच्या बचत खात्यात ते व्याज जमा केले जाते.
  • जर तुम्ही बचत मुदत ठेव योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत देखील मिळू शकते. ह्या मुळे इनकम टॅक्स कडून लागणारा टॅक्स पासून तुमचा बचाव होऊ शकतो.
  • किमान एक वर्षासाठी 6.9% व्याज आणि 5 वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी 7.5% व्याज मिळतं. ह्या व्याजदर सुरुवातीच्या वर्षापासून मिळतो. ह्या मध्ये कॉन्फयुजन होता कामा नये.
  • जर या योजनेत तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांनंतर तुमच्या हातात जवळपास 1,37,500 रुपये असतील.
  • ज्या लोकांना त्यांचे पैसे FD मध्ये ठेवायचे आहेत ते बँक मध्ये न ठेवता जर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या बचत खात्यातील मुदत ठेवींमध्ये गुंतवले तर तुम्हाला बँक पेक्षा जास्त व्याज मिळेल .

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना चालू करण्यात आली आहे. भारतातील निवृत्त सरकारी ( केंद्र आणि राज्य ) कर्मचाऱ्यांना 55 वर्षांनंतर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना 50 वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • पोस्टाच्या सर्व बचत योजनांमध्ये या योजनेचा सर्वाधिक व्याजदर आहे 8.2 वार्षिक व्याजदर
  • या योजनेत कमीत कमी 1000 रूपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रूपये गुंतवू शकता. तुमच्या बचत खात्यात दर तीन महिन्यांत एकदा व्याज जमा केले जाते. वर्षातून 4 वेळा व्याज जमा केले जाईल.
  • 5 वर्षांच्या कार्यकाळासह, तुम्ही पहिल्या वर्षात योजनेतून बाहेर पडल्यास कोणतेही व्याज मिळणार नाही. मागील 3 महिन्यात व्याज जर बचत खात्यात जमा केले गेले असेल तर गुंतवणुकीच्या रकमेतून ते कमी केले जाईल.
  • तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवनुक केल्यास, तुमच्याकडे 5 वर्षांत 1,41,000 रुपये असतील. म्हणजेच, जर तुम्ही जास्तीत जास्त 30 लाखांची गुंतवणूक केलीत तर तुमच्या हातात 5 वर्षांनंतर 42,30,000 रुपये असतील. आणि पैसे 9 वर्ष ठेवले तर तुमचे पैसे दुप्पट होतील.
  • ह्या गुणतुवणुकीतून मिळणारे व्याज जर एका आर्थिक वर्षात 50,000 रूपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला तुमचे उत्पन्न समजून त्यावर इन्कम टॅक्स आकारला जाईल.
  • इन्कम टॅक्स होण्याच्या रकमेपेक्षा कमी पैसे कमावल्यास तुम्ही लवकर फॉर्म 15G/15H भरून हे शुल्क टाळू शकता. त्याचा फायदा घेऊन शकता

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते ही बचत योजना असून या योजनेमधून दर महिन्याला व्याज मिळते.

  • तुम्ही योजनेत जास्तीत जास्त 9 लाखांची गुंतवणूक करू शकता, ज्यावर 7.4% व्याज मिळते. संयुक्त/ जॉइंड खाते असल्यास तुम्ही 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
  • या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाहीत. एक वर्षानंतर किंवा तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, गुंतवणुकीतील 2% कपात केली जाईल. आणि बाकी रक्कम तुम्हाला परत केली जाईल.
  • या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांत एकूण 37,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजे एकूण रक्कम 1 , 37, 000 रुपये.
  • या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये असल्यास, तुम्हाला व्याज म्हणून 5,55,000 रुपये मिळतील. आहे की नाही बँक पेक्षा जास्त व्याज

महिला सन्मान बचत योजना (महिला सन्मान पत्र)

महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही एक विशेष योजना राबवण्यास सुरुवात केली असून. या योजनेचा कालावधी कमीतकमी दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी 7.5% व्याज मिळते.

  • पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत, ही योजना कमी मुदत मध्ये जास्त व्याज देणे ,पोस्ट ऑफिस च्या जवळपास सर्वच योजणाची कमीत कमी 5 वर्षाची मुदत आहे. फक्त याच योजनेची मुदत फक्त 2 वर्षाची आहे.
  • किमान गुंतवणूक रूपये 1000 ते 2,00,000 लाख रुपये.
  • उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,16,022 रुपये असतील.
  • आणि जर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रूपये गुंतवले तर दोन वर्षांच्या शेवटी 2,32,000 रूपये तुमच्या हातात येतील.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बचत योजना

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ह्या 5 वर्षांच्या कालावधीचा सर्वसमावेशक कार्यक्रम असून. या योजनेत कमीत कमी 1000 रूपये आणि जास्तीची कोणतीही मर्यादा नाही.
  • ह्या योजनेमधून 7.7% चक्रवाढ व्याजदर मिळते आणि पाच वर्षांच्या शेवटी एक रकमी व्याज दिले जाते. या योजनेतील व्याजदरात कोणताही बदल होत नाही. हे व्याजदर फिक्स आहे.
  • खातेदाराचा मृत्यू झाला किंवा संयुक्त खाते असलेल्या जोडप्याचा घटस्फोट झाला तरच या योजनेतून मुदतपूर्व बाहेर पडता येते. तुमचे तेवढ्या काळवधीचे व्याज तुम्हाला मिळेल.
  • उदाहरणार्थ, जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात 1,44,903 रुपये व्याजसाहित येती. याचा अर्थ, तुमची गुंतवणूक रक्कम 40% पेक्षा जास्त वाढलेली असेल. या योजेनच्या गुंतवणुकीस तुम्ही इन्कम टॅक्स च्या कारापासून वाचण्यासाठी उपयोग करु शकता. कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत उपलब्ध आहे.
  • अधिक माहिती साठी तुम्ही इंडियन पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता . भारतीय डाक

या लेखाच्या माध्यमातून  Mahitia1.in टीमने “ह्या 5 पोस्ट ऑफिस योजना मधून तुम्ही मिळवू बँक पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता post yojana marathi” व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता.  ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.

हे हि वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top