राज्यात बहुतेक विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्याच्या साठी कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे अत्यंत महत्वाचे असते शासनाने प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रम बहुतेक विद्यार्थ्याना समजून घेण्यास अवघड जातो म्हणून खास विद्यार्थ्यांसाठी mpsc combine prelims syllabus 2025 in marathi संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2025 मराठी मधून या लेखाच्या माध्यमातून घेऊन येत आहोत. तर लेख पूर्ण वाचा व आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना पाठवा.
संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : एक संपूर्ण माहिती mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
संयुक्त पूर्व परीक्षा ही गट ब या पदासाठी विविध सरकारी नोकऱ्यांसाठी प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब परीक्षेमार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक या तीन पदांची भरती करण्यात येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आयोजित केलेली एक महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा महाराष्ट्र शासनातील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड करते. या परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत असून त्यात सामान्य ज्ञान, भारतीय राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विज्ञान यासारखे विषय समाविष्ट असतात या लेखात महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बद्दल विस्तारित माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम mpsc combine prelims syllabus 2025 in marathi , तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल ही अधिक माहिती या लेखाद्वारे सांगितली आहे.
परीक्षेचे टप्पे
संयुक्त पूर्व परीक्षा ही 3 टप्प्यात होते.
पूर्व परीक्षा | पूर्व परीक्षा ही विविध पदाकरीता एकत्रितरित्या होते.संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुणाची असते व त्या पेपर मध्ये नकारात्मक गुण पद्धत अवलंबली जाते |
मुख्य परीक्षा | संयुक्त पूर्व परीक्षा पास झाल्यावर संयुक्त मुख्य परीक्षा ही सुद्धा विविध पदाकरीता एकत्रितरित्या होते.या मध्ये 2 पेपर असतात व ते प्रत्येकी 200 गुणासाठी असतात व एकूण 400गुणाची ही परीक्षा असते |
मुलाखत | पूर्व व मुख्य परीक्षा पात्र झाल्यावर मूल्य तपासणीसाठी मुलाखत घेतली जाते या साठी एक विशेष मंडळ नेमले जाते मुलाखत ही 40 गुनासाठी असते. |
शारीरिक चाचणी | पोलीस उपनिरीक्षक(PSI)या पदाकरीता उमेदवाराची पूर्व व मुख्य परीक्षा पात्र झाल्यावर शारीरिक चाचणी घेतली जाते.शारीरिक चाचणी एकूण 100 गुणसाठी असते परीक्षा योजना कशी असते? |
परीक्षा योजना कशी असते ?
mpsc combine prelims syllabus 2025 in marathi संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2025 मराठी समजून घेताना हे ही समजून घेणे गरजचे असते की परीक्षा योजना नेमकी कसी असते.
- संयुक्त पूर्व परीक्षा मध्ये सामान्य क्षमता चाचणी चा बहुपर्यायी स्वरूपाचा एकच पेपर असतो त्यामध्ये प्रश्नांची एकूण संख्या 100असते
- 100 प्रश्र्नला प्रत्येकी 1 गुण आसून एकूण 100 मार्काचा हा पेपर आसतो
- या पेपर साठी पदवीधारक विद्यार्थी पात्र असतील
- संयुक्त पूर्व परिक्षचे स्वरूप मराठी व इंग्लिश आहे म्हणजेच तुम्ही मराठी व इंग्लीश या दोन्ही भाषांमध्ये देऊ शकता.
- परीक्षेचा एकूण कालावधी हा 1 तासाचा असतो
- या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून त्या मध्ये तुम्हाला चार पर्याय दिले जातात त्यातील तुम्हाला बरोबर पराय निवडून उत्तरपत्रिकेत गोल करायचा आहे
नकारात्मक गुणदान पद्धती
नकारात्मक गुणदान म्हणजे काय ?
- नकारात्मक गुणदान म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी तुमच्या एकूण गुणांमधून काही गुण वजा करणे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एक प्रश्न चुकीचा सोडवला, तर त्यासाठी तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि अतिरिक्त काही मार्क्सही वजा केले जातील.
- नकारात्मक गुणदानामुळे उमेदवारांना अचूक उत्तर निवडण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
- यामुळे उमेदवार अंदाज लावून प्रश्न सोडवण्यापासून रोखले जाते.
- नकारात्मक गुणदानामुळे स्पर्धा वाढते आणि सर्वोत्तम उमेदवार निवडणे सोपे होते.
- संयुक्त पूर्व परीक्षेत नकारात्मक गुणदानाची पद्धत सामान्यतः, संयुक्त पूर्व परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/4 किंवा 25% गुण वजा केले जातात. म्हणजेच, जर एका प्रश्नाला 4 गुण असतील आणि तुम्ही तो प्रश्न चुकीचा सोडवला तर तुमच्याकडून 1 गुण वजा केला जाईल.
संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
या परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरूपाचा आहे mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
इतिहास | इतिहास हा विषयामध्ये आधुनिक भारताचा इतिहास व त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारतात |
नागरिकशास्त्र | भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन). |
भूगोल | (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. |
भारतीय अर्थव्यवस्था | राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. |
शासकीय अर्थव्यवस्था | अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी. |
सामान्य विज्ञान | भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene) |
बद्धिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. |
अंकगणित | बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी. |
संयुक्त पूर्व परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे. परंतु, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने ही परीक्षा उत्तीर्ण करता येते. ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. – MPSC
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून mpsc combine prelims syllabus 2025 in marathi व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे ही वाचा