आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या ह्या शेत व्यवसायावर अवलंबून आहे. आणि त्यांच्या पैकी ८० टक्के शेतकरी पारंपरिक शेती करतो. पारंपरिक शेती करताना बहुतेक वेळा शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून राहावं लागत. योग्य वेळी पाऊस याला तर चांगले उत्पन्न होते आणि शेतकऱ्याचा फायदा होतो पण कधी जास्त पावसामुळे ओला दुष्काळ तर कधी पाऊस न पडल्यामुळे सुका दुष्काळ पडतो त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाचे मोठे नुकसान होते परिणामी त्यांचे मोठे आर्थिक नसूनही होते. बहुतेक अप्लभूधारक म्हणजे कमी शेती असलेले शेतकरी ह्याच्या कडे पैसा नसल्यामुळे सावकार किंवा शेतमाल दुकानदाराकडून कर्ज कडून शेती करत असतो. शेतीमध्ये लागणारे बी-बियाणे , औषधी, शेती पेरण्यापासून ते शेतातील माल घरी आणण्यासाठी साठी वेगवेगळा खर्च शेतकऱ्याला लागतो. उत्पन्न चांगले झाले तर शेतकरी कर्जाची परतफेड करू शकतो पण जर दुष्काळ पडला तर त्याच्याकडून कर्जाची परतफेड होत नाही परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या हा पर्याय निवडतात. तर यावरच एक उपाय म्हणून केंद्र सरकार ने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM- Kisan योजनेची सुरुवात २०१८ केली आज ह्या लेखातून आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पी एम किसान योजना विषयी
पी एम किसान योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्याचा उद्देश लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना थेट उत्पन्नाचे समर्थन प्रदान करणे आहे. ही योजना शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण गरिबी दूर करण्यासाठीआर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट आर्थिक साहाय्य जमा केले जाते.
पी एम किसान योजना उद्दिष्टये काय आहेत .
पी एम किसान सन्मान निधी योजनेची आर्थिक साहाय्य करणे एवढा एकच उद्देश नसून अनेक बाबीचा विचार करून केंद्र सरकारने हि योजना राबवली आहे पुढे आपण या योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये पाहुयात.
१ .इन्कम सपोर्ट : शेतकऱ्यांना कृषी खर्च भागवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे. म्हणजे शेतकऱ्यावर शेती खर्चाचा बोझा पडणार नाही.
2. ग्रामीण दारिद्र्य कमी करणे : लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी आणि दुष्काळ मुले त्यांच्या मालाचे नुकसान जरी झाले तर त्यांना पैशाची चिंता भासू नये सोबत चांगले उप्तन्न जरी झाले तर तुम्हाला किसान सन्मान निधी मधून मिळणाऱ्या लाभाचा फायदा मिळतो त्या आर्थिक लाभ तुमच्या शेती व्यवसायाला मोठं करण्यासाठी करता येतो .
3. कृषी उत्पादन वाढवणे : शेती कामाच्या योग्य वेळी म्हणजे पेरणी , खुरपणी , सिंचन किंवा तर कोणतेही पीक घेतनाना लागणार खर्च करतेवेळी वेळेवर आर्थिक सहाय्य प्रदान करून, या योजनेचा उद्देश कृषी उत्पादकता वाढवणे आणि अन्न सुरक्षा वाढवणे हा आहे . उदा – तुम्हाला सूयाबीन फुवारणी वर आली ‘ आहे आणि तुमच्या कडे पैसे नाहीत अश्या वेळी जर वेळीच फुवारणी केली नाही तर त्याचा सरळ परिणाम येणाऱ्या पिकावर होतो . पीक कमी होते अश्या वेळी पीएम किसान सन्मान निधी मधून तुम्हाला एक हप्ता भेटला तर तुम्ही सहज तुमची फुवारणी करून घ्याल व तुमच्या सूयाबीनचे उत्पादन वाढेल.
4. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण : शेतक-यांना शेती आणि कृषी पद्धतींबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आवश्यक संसाधने आहेत याची खात्री करून त्यांना सक्षम करणे. जर त्यांना तशी माहिती मिळत नसेल तर त्या माहितीची पूर्तता करून शेतकऱ्यांना नवीन कृषी पद्धतीचा अवलंब करण्यास प्रवृत्त करून त्यांना सक्षम करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे .
पी एम किसान योजना साठी कोण पात्र आहे
जसे प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष असतात तसेच या सुद्धा योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष आहेत. पुढील निकष अतिशय काळजीपूर्वक वाचा.
अशा शेतकरी ज्यांची स्वतःच्या नावावर जास्तीत जास्त २ हेक्टर शेत जमीन असेल ( बागायत / जिरायत ) असा अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. शासन दरबारी असलेल्या नोंदीद्वारे जमिनीच्या मालकाची पडताळणी शासनामार्फत करून तुमची पात्रता ठरवण्यात येईल.
अपवाद – खालील श्रेण्या लाभांमधून वगळल्या आहेत – संस्थात्मक जमीनधारक , सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये सदस्य असलेले शेतकरी कुटुंब ज्या व्यक्तींचे निव्वळ करपात्र उत्पन्न वार्षिक ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
पी एम किसान योजना कोणाला लाभ घेता येणार नाही .
- संस्थात्मक जमीनधारक आणि उच्च आर्थिक स्थिती असलेले खालील श्रेणीतील लाभार्थी प्रधानमंत्री किसान योजनेसाठी पात्र नाहीत:
- संविधानिक पदांवर विद्यमान किंवा माजी धारक शेतकरी
- आजी-माजी मंत्री, महानगरपालिकांचे महापौर, जिल्हा पंचायतींचे सभापती
- राज्य किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी
- विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSE), स्वायत्त संस्था आणि सरकारच्या अंतर्गत स्थानिक संस्थांसाठी काम करणारे कर्मचारी
- ₹10,000 पेक्षा जास्त मासिक पेन्शन असलेले निवृत्त शेतकरी
- अभियांत्रिकी आणि वैद्यक यांसारख्या व्यवसायांशी संबंधित लोक आणि जे शेती सुद्धा करतात असे शेतकरी
- मागील वर्षापासून आयकर ज्यांनी भरले आहे ते शेतकरी
पी एम किसान योजना साठी आवश्यक कागदपत्र आणि अर्ज प्रकिया
पी एम किसान योजना लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत.
- आधार कार्ड (पोर्टलद्वारे नोंदणी करताना हे आवश्यक आहे) त्या आधार कार्ड ला तुमचा चाली मोबाइल नंबर जोडलेला असायला पाहिजे. ) त्याच बरोबर आधार आणि बँक खात्याचे आधार सिडींग असायला पाहिजे) तुमचे आधार सिडींग कसे करावे या साठी
- शेती तुमच्या नावावर आहे त्याचे पुरावे ७/१२उतारा किंवा इतर कागदपत्रे
- वाहन चालविण्याचा परवाना ,मतदार ओळखपत्र ,नरेगा जॉब कार्ड या पैकी कोणतेही सरकारने जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्र असणे गरजचे आहे.
- नोंदणी – पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्य सरकारमार्फत PM-KISAN पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे आणि इतर पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही या योजनेचा लाभ पाहिल्याचं घेणार आहात तर तुम्हाला स्वतःची नोंदणी करणे गरजेचे आहे त्या साठी पुढील वेबसाईट पीएम किसान योजना वर जाऊन आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करू शकता.
- या अगोदर तुम्ही तुम्ही या योजनांचे फायदा घेतला असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी E-KYC करावी लागते त्यासाठी E-KYC पीएम किसान योजना या वेबसाईट वर जाऊन आधार नंबर टाकून तुमचा अर्ज प्रकिया पूर्ण करू शकता.
पी एम किसान योजना मधून लाभ
या योजनेमधुन अल्पभूधारक शेतकऱ्यास प्रत्येक ४ महिन्यास २ ० ० ० असे एकूण वार्षिक ६ ० ० ० रुपये मिळतात. त्याच बरोबर राज्य शासन प्रत्येक ४ महिन्यास २ हजार असे ६ ० ० ० रुपये निधी देतो तर दोन्ही मिळून वार्षिक १ २ ० ० ० प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळतो .
पी एम किसान योजना यादी मराठी
पी एम किसान योजना मंजूर लाभार्थी यादी पाहण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन थोडी माहिती भरली कि १ मिनिटात तुमच्या पूर्ण गावाची माहिती तुमच्या समोर असते त्यासाठी पुढील लेख वाचा आणि असे सांगितले आहे तशीच माहिती भरा एकही चूक झाली यतर चुकीची यादी डाउनलोड होईल आणि तुमचे नाव तुम्हाला यादीमध्ये सापडणार नाही.
- पी एम किसान योजना यादी मराठी या शासनाच्या वेबसाईट वर जा
- तुमचे राज्य निवडा
- तुमचा जिल्हा निवडा
- तुमचा उपजिल्हा निवडा ( तालुक्याची निवड करा )
- पुन्हा एकदा तुमच्या तालुक्याची निवड करा
- तुमचे नाव निवड ( येथे तुमच्या ग्राम पंचायतीची निवड करायची गरज नाही शासनाने या योजनेच्या लाभार्थाची गावानुसार दिलेली आहे त्याच बरोबर प्रत्येक गावासाठी एक कोड सुद्धा दिलेला आहे.
- गावाची निवड केल्यानंतर गेट रिपोर्ट / get Report हे बटन दाबा तुमच्या समोर तुमच्या गावातील संपूर्ण पात्र शेतकऱ्याची यादी असेल.
निष्कर्ष
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारताच्या कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी आणि लहान शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यात याने भरीव योगदान दिले आहे. या योजेनचा लाभ आज भारतातील ९० टक्के अप्लभूधारक घेत आहेत. तुम्हाला हा लेख कसा वाटलं आम्हला नक्की सांगा
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून पी एम किसान योजना आणि यादी मराठी २ ० २ ४व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
अनुकंपा म्हणजे काय आणि अनुकंपावर नोकरी साठी किती टक्के आरक्षण असते.
आपल्या जमिनीचा digital satbara काढा काही मिनिटात ते पण तुमच्या मोबाइलवरून