आपल्या कुटुंबातील 5 वर्षाखालील मुलांचे आधार कार्ड आज बनवणे अत्यंत गरजेचे आणि विविध शासकीय योजना आणि कामासाठी बंधनकारक आहे. लहान मुलांचे आधार कार्ड काढणे अत्यंत सोपे असून ते वेळीच तयार करून घेतले तर जास्त कागदपत्र लागत नाही आणि वेळ सुद्धा वाचतो, चला तर मग जाणून घेऊ की लहान मुलाचे (5 वर्षाखालील मुलाचे)आधार कार्ड कसे काढावे . आणि त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची गरज आहे. new aadhar card of child
आजचा च्या काळात आधार कार्ड राष्ट्रीय स्थावर जेवढे प्रौढ़ व्यक्ति साठी महत्वाचे आहे तेवढेच ते लहान मुलासाठी सुद्धा महत्वाचे झाले आहे. सरकारी योजनेचा लाभ, ओळख पत्र, विमानतळ आणि महत्वाच्या ठिकाणी ओळख तर म्हणून या कागदपत्राचा वापर आज मोठ्या प्रमाणात केल्या जातो.
लहान मुलाचे आधार कार्ड बनवल्याचे फायदे आणि काही महत्वाचे उपयोग
- शाळेत प्रवेशासाठी मदत :- अंगणवाडी पासून ते प्राथमिक शाळेच्या प्रवेशासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य असून इतर कागदपत्रांसोबत आधार जोडणे जरगेचे आहे. सर्वच शैक्षणिक संस्थान मध्ये नावनोंदणी आणि प्रवेश करताना आधार तपशील देणे आवश्यक आहे.
- लाभार्थी ओळखा :- आधार कार्ड हे सर्वत्र भारतभर ओळखीचा पुरावा म्हणून काम करते सोबत इतर अनेक महत्वाच्या कामाच्या ठिकाणी आधार कार्ड ही ओळख पत्र म्हणून अत्यंत महत्वाचे जरी असले तरी लहान मुलाच्या बाबतीत प्रामुख्याने ओळख पटवण्यासाठीची उपयोग केल्या जातो आणि त्याच्या आधार कार्ड सोबत पालकांचे आधार जोडल्या जाते लहान मुलांचे बँक खाते उघडायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक असते. लहान मुलांचा पासपोर्ट काढण्यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे. पण सोबत पालकांचे आधार कार्ड सोबत जोडणे सुद्धा गरजेचे आहे.
- सरकारी योजनाचा लाभ :-राज्य शासन आणि केंद्र शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व योजना खास करून लहान मुलांच्या योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास योजनेचा अर्ज करताना आधार कार्ड जोडणे गरजेचे आहे ह्या योजनेमध्ये प्रामुख्याने पोषण,आरोग्य, आर्थिक व इतर लाभाचा समावेश होतो
लहान मुलांचे आधार कार्ड कसे काढवे ?
- आपल्या पाल्याची आधार कार्ड साथी नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांना आई किंवा वडील यांना आधार नोंदणी केंद्रास भेट देणे आवश्यक असून संबधित कागदपत्राचा पुरवठा करणे अनिवार्य आहे.
- नाव नोंदणी करताना पुढील माहिती मागवल्या जाऊ शकते.
- नाव, जन्मतारीख, लिंग आणि पूर्ण पत्ता सोबत काही पर्यायी माहिती सुद्धा आवश्यक आहे पालकांचा मोबाइल नंबर आणि ईमेल सोबत पालकांचे आधार कार्ड आणि रहिवाशी पत्ता सुद्धा अनिवार्य आहे.
- 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या मुलांसाठी आधार कार्ड साठी अर्ज करताना जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- वरील सर्व माहिती आधार नोंदणी केद्र यांच्या कडून प्राप्त अर्जामध्ये समाविष्ट करून आवश्यक कागदपत्र सोबत जोडून अर्ज करावा.
- ऑपरेटर अर्ज करून झाल्यावर अर्जाची पोचपावती सह सर्व कागद पत्र वापस करतील.
- ऑपरेटर कडून मिळालेल्या पोचपावती मध्ये नावनोंदणी आयडी क्रमांक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची, नावनोंदणी आयडी क्रमांक हा 16 अंकी असून त्याला इंग्रजी मध्ये Enrolment ID Number सुद्धा म्हणतात.
- तुम्ही भारतात कुठेही अधिकृत आधार नावनोंदणी केंद्रात तुमची ओळख व पत्त्याच्या पुराव्यासह जाऊ शकता आणि आपल्या लहान मुलाच्या आधार कार्ड साठी अर्ज करून आधार कार्ड काढू शकता.
- सध्या मुलांचे आधार कार्ड नवीन नोंदणी विनामूल्य (मोफत) आहे.
लहान मुलांचे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे ?
आपण वरील लेखात वाचले की लहान मुलाचा आधार कार्ड कसे काढायचे किंवा त्यासाठी अर्ज कसा करायचे सोबत आधार कार्ड काढण्यासाठी कोणकोणते अनिवार्य आणि आवश्यक कागदपत्रे आणि माहिती आवश्यक आहे. आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची. आता पुढील लेखात आपण पाहुयात की आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे.
- आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जाऊ शकता किंवा आपल्या कडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप असल्यास तुम्ही घरी सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करू शकता. जर तुम्ही स्वतः डाउनलोड करत असाल तर त्यावर सही योग्य येत नाही म्हणून पर्यन्त करावा की आधार नोंदणी केंद्रा जाऊनच आपल्या घरातील लहान मुलाचे आधार कार्ड डाउनलोड करावे.
- आधार कार्ड डाउनलोड करताना Enrolment ID Number / नावनोंदणी आयडी क्रमांक 16 अंकी नंबर आवश्यक आहे.
- Child Aadhar Card Online मुलांचे आधार कार्ड ऑनलाईन काढण्यासाठी ऑपरेटर ला 16 अंकी नंबर घेऊन आपले आधार कार्ड मिळवावे.
- अर्ज केल्याच्या 15 दिवसानंतर आधार कार्ड तयार होण्यासाठी शक्यता जास्त आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आधार कार्ड डाउनलोड करायला जात असताना त्याची काळजी घ्यावी.
- मुलांचे आधार कार्ड कसे काढावे अधिक पाहिती साठी तुम्ही माय आधार वेबसाइट ला भेट देऊ शकता तसेच youtube वर माहिती पाहू शकता link
या लेखमधून Mahitia1.in टीमच्या लेखनातून लहान मुलांचे आधार कार्ड कसे काढवे child aadhar card व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( लिंक वर क्लिक करून ) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो