namo shetkari yojana 7th installment date : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana मधून महाराष्ट्र शासन पात्र शेतकरी लाभार्थ्यास दरवर्षी ६००० लाभ प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यात DBT माध्यमातून देते. यालाच जोड म्हणून केंद्र सरकार मार्फत सुद्धा पी.एम किसान योजनेमधून वार्षिक ६००० लाभ प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. असे एकूण १२००० वार्षिक लाभ शेतकऱ्यांना मिळतो. याच योजेनेचा सप्टेंबर २५ च्या हफ्ता कधी येणार याच्या प्रतिक्षेमध्ये शेतकरी वर्ग सध्या आहे .

योजनेची सुरुवात कधी झाली ?
महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांनी २०२३ -२४ च्या अर्थसत्राच्या अर्थसंकल्प चालू असताना ९ मार्च २०२३ या योजेनची घोषणा केली. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी योजनेचा शुभारंभ केला आणि देशातील ८६ लाखापेक्षा जास्त लाभार्थी पात्र असलयाचे जाहीर केले. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासन मिळून १२००० हजार रुपये वार्षिक लाभ राज्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना देण्यात येत आहे .
दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
१ . अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२. अर्जदार शेतकरी यांनी PM kisan योजनेमध्ये स्वतःची नोंदणी प्रकिया पूर्ण केलेली असावी.
३ . अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाने शेतजमीन असणे बंधनकारक आहे.
४ . शेतकऱ्यांनी आपला Farmer ID काढणे आवश्यक आहे . (१५ एप्रिल २०२५ पासून सर्व शेतकऱ्यांना Farmer ID बंधनकारक करण्यात आले आहे .) Farmer ID नसेल तर शेतकऱ्यांना या योजेनचा लाभ मिळणार नाही .
५ . शेतकऱ्याचे बँक खाते आधार सीडींग आणि KYC पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
योजनेविषयी तपशील
बाब | तपशील |
---|---|
एकूण वार्षिक लाभ | १२००० (केंद्र +राज्य शासन ) |
पात्रता | महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी , PM किसान नोंदणी स्वतःच्या मालकीची शेतजमीन , farmar ID , आधार seeding बँक खाते |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
लाभाचा मार्ग | लाभार्थ्यांचा बँक खात्यात DBT माध्यमातून |
namo shetkari yojana 7th installment date
राज्यातील ९४ ते ९६ लाख शेतकऱ्यांच्या यादीची तपासणी सध्या चालू आहे. केंद्र सरकार कडून राज्यास शासनास आवश्यक ती सूचना दिली असून राज्य सरकार मार्फत अर्जाची फेरतपासणी चालू असून लवकरच तपासणी पूर्ण करून पात्र लाभार्थी यांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फ़त नमो शेतकरी 7 वा हफ्ता जमा केला जाणार आहे .
७ वा हफ्ता म्हणजे जो ऑगस्ट – सुप्टेंबर २०२५ महिन्यात जमा होणे अपेक्षित होते पण अजून काही जमा झाला नाही. मागील काही दिवसापासून केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मध्ये चर्चा चालू आहे पण अद्याप केंद्र आणि राज्य शासनाने अधिकृत कोणतीही घोषणा केला नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाना बळी पडू नये. कृपया शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइट वर जाऊन चेक करावे PM-kisan portal , maha DBT या शासनाच्या वेबसाईट वर शेतकऱ्यांना अधिकृत माहिती वेळेवर मिळेल.
लेखाच्या माध्यमातून Mahitia1.in टीमने “नमो शेतकरी 7 वा हफ्ता येणार या तारखेला ! तारीख जाहीर namo shetkari yojana 7th installment date व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group- शासकीय नोकरी & योजना ग्रुप – (लिंकवर क्लिक करून) जॉइन करू शकता. ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी, शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो
हे हि वाचा
- दादासाहेब फाळके पुरस्कार इतिहास व यादी
- अपंग व्यक्तींना प्रोत्साहन पर अपंग कल्याण राज्य पुरस्कार.
- Foreign Fellowship for women अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवर्ती योजना सन २०२५-२०२६